विधानभवनाच्या लॉबीमध्ये गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तूफान हाणामारी झाली. आव्हाड आणि पडळकर यांच्यातील वादाला आता गंभीर वळण लागले आहे. आज विधानभवनात आव्हाड आणि समर्थक थेट भिडले. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली, तर एकमेकांची कॉलरही पकडण्यात आली. त्यामुळे विधानभवनाच्या लॉबीत राडा झाल्याचे पाहायला मिळाले. पण विधिमंडळाच्या सुरक्षारक्षकांनी वेळीच धाव घेतल्याने वेळीच परिस्थिती स्थिर झाली. गोपीचंद पडळकर यांनी धर्मांतरणाच्या मुद्द्यावरुन वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरुन जितेंद्र आव्हाडांनी पडखळकरांना विधानसभेतील चर्चेदरम्यान घेरले होते. तसेच बुधवारच्या सत्रादरम्यान विधानभवनाच्या गेटवर आव्हाड आणि पडळकर यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर आज आव्हाड-पडळकर समर्थक भिडले. त्यामुळे विधानभवनाच्या लॉबीमधील वातावरण तापले होते.
मुख्यमंत्र्यांशी वेगळ्या विषयावर भेट झाली त्यावेळी विधिमंडळातील हाणामारीचाही विषय निघाला. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण घटना शांतपणे ऐकून घेतली आणि त्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं की, जे घडलं ते योग्य झालं नाही. मोक्काचे आरोपी जर विधिमंडळात येऊन बसणार आहेत. तर मला या विषयावर काही बोलायचं नाही. मला मारण्याचा प्रयत्न फसल्यानंतर माझा कार्यकर्त्या नितीन देशमुख यांना मारण्यात आलं. यापेक्षा वाईट गोष्ट नाही. गेल्या तीन दिवसांपासून मी पाहतोय, हे लोक मला डोळे वटारून पाहत होते. यावेळी तर यांनी सीमा पार केली आहे. माझा सभागृहातील भाषण झाल्यावर मी त्वरित बाहेर पडून गाडीत बसणार तोच मला फोन आला की नितीनला मारलं आणि मी परत आलो. मी तिथे आल्यावर जी काही घटना कळली आणि व्हिडीओ पाहिला. त्यात नितीन देशमुख यांच्यावर सरळ सरळ हल्ला झाल्याच दिसून आला आहे. त्यांचं प्लॅनिंग मला मारण्याच होतं. कोण आहेत ही माणसं? हे काय कार्यकर्ते होते? हे सगळे खूनातील, दरोडे आणि मोक्कातील आरोपी आहेत. मोक्कातील आरोपी विधिमंडळात येतात आणि हल्ले करतात. 'विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनात आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार' विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड संतप्त सुरात म्हणाले, 'हल्ला कोणी केला... बोला ना पडळकरांनी केला, कशाला प्रश्न विचारताय? अख्ख्या महाराष्ट्राला समजलं हल्ला कोणी केला. तुम्ही विधानभवनात गुंडांना प्रवेश देणार असाल, तर आमचे जीव सुरक्षित नाही आहेत. आई बहिणीवरुन शिव्या दिल्या. मारून टाकण्याची धमकी दिली.' मी भाषण झाल्यावर मोकळी हवा घेण्यासाठी बाहेर आलो होतो, हे मलाच मारण्यासाठी आले होते. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आणि भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आहे आमचा? असा संतप्त सवाल आव्हाडांनी उपस्थित केला. विधानभवन परिसरात शिव्या दिल्या जातात, असंसदीय शब्द वापरले जातात, आता करुन टाका शिव्यांना पण संसदीय शब्द. सत्तेचा एवढा माज का... असा संताप आ. जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.
0 टिप्पण्या