स्क्रिप्ट बुद्ध ला चूक दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करते पण बुद्ध तत्वज्ञान उफाळी मारून मारून वर येते. आम्हाला तिथेही उत्तर देता आले असते, पण म्हटले विचाराला विचाराने उत्तर देऊ. मुळात बुद्ध तत्वज्ञान कसा वाईट होते हाच धागा पकडून ओढून ताणून बनवलेले हे स्क्रिप्ट आणि मूळ पुस्तक हे तकलादु शौर्याच्या बाता आहे.तर काय म्हणे बुद्धाला दोन नर्तकी नाचत गात असताना निर्वाणाची कल्पना सुचते. हे स्वतः बुद्ध सांगतात. बुद्धाला सफेद चीवर मध्ये दाखवले गेले आहे. बुद्धाचा हातात भिक्षापात्र न देता कमंडलू दाखवणे हे डायरेक्टरच्या कच्च्या अभ्यासाचे लक्षण आहे. ब्राह्मण नवरा बायको का येतात आणि जातात तेच कळत नाही. कदाचित मनुवादी छुपा अजेंडा स्त्रियांना हीन दाखवण्याचा अजेन्डा यात बेमालून पणे राबवला गेला आहे. स्त्रिया ह्या पायातील बेड्या आणि परपुरुषाकडे पाहणाऱ्या असतांत हे दोन प्रसंगातून ठळकपणे दाखवले गेले आहे. स्त्रियांबद्दलचा नीच दृष्टीकोन दाखवला गेला आहे.
भिक्खू संघाला बदनाम करण्याचे षडयंत्र पहिल्या अंकात डावलले जाते पण मध्यानंतरनंतर ब्रह्मन् पुजारी आणि सैनिक यांच्या संवादामध्ये अत्यंत हीन दर्जात भिक्कू आणि भिक्कूनी बद्दल गलीछ आरोप करतात. भिक्कू संघाला कामवासनेने व्याकुळ झालेले दाखवण्याचा प्रयन्त केला आहे. सुंदर भिक्कूणीसाठी संघात सामील होण्यास तयार आहे अश्या प्रकारचे संवाद दोघात घडतो. तसेच अनेक लैगिक टीका भिक्कू भिक्कूनी वर केल्या गेल्या आहेत.
यानंतर एक भिक्कू दान मागण्यासाठी आल्यावर पोटभर जेवण भेटतो म्हणून आम्ही भिक्कू आहोत असे वाक्य त्याच्या तोंडी दिले आहे. बुद्धाची बदनामी करता करता लेखक ब्राह्मणांची बदनामी करत आहेत. ब्राह्मणाला ऐतखाऊ दक्षिणा उकळणारा बायकोवर संशय घेणारा दाखवण्यात कोठेही लेखक आणि डायरेक्टर कमी पडत नाही.
बुद्धांना लोकांना दबाव करून भिक्कू संघात प्रवेश करायला लावतात असे दाखवण्यात आले आहेत जे चुकीची आहेत. लोकांनी स्वतः हुन धम्म दीक्षा घेतली आहे. समकालीन कोणत्याही साहित्यात नाटकतील या काल्पनिक प्रसंगाचा उल्लेख येत नाही.
सेनापती विक्रमसिंह भिक्खू बनतो. आणि राज्यावर विद्युतगर्भ आक्रमण करतो तेव्हा लढन्यासाठी पुन्हा खड्ग हाती घेतो. जनतेला वाचवण्यासाठी शाक्यकुलीन राजे हे कुचकामी आणि विक्रम हाच मोठा शूर आहे हे डायरेक्टर आणि लेखक बिंबवतो, यांनी यात हिंसेचा भयानक समर्थन दाखवणायत आलेले आहे. बुद्ध आणि सेनापती याचा संवाद तर बुद्धाला खाली दाखवण्यासाठीच लिहिलेले दिसत आहे. तसेच खड्ग हातात घेतल्यावर विक्रम सपशेल हरतानाच दिसत आहे. त्याच्या खड्गाचा चमत्कार शेवट पर्यंत चालतच नाही. शेवटी त्याची सून येऊन शौर्य दाखवते आणि सर्व सैन्याला हुरूप चढतो. सेनापती म्हणून विक्रम हा कुचकामी ठरतो. आपली सून आणि मुलगा याला सुद्धा वाचवू न शकणार विक्रमसीह हा शूरवीर नसून गलितगात्र दिसतो. शेवटी सर्व मेल्यावर कसाबसा विरोधकाला मारतो आणि सर्वात शेवटी बुद्ध आणि विक्रम याचे संवाद दाखवून हिंसा कशी श्रेष्ठ आहे हेच दाखवण्यात येऊन नाट्य थांबते.
भिक्खू संघाची अनेक बदनामीकारक वाक्य आहेत. ज्यामध्य ऐतखाऊ, दुसयांच्या जीवावर
महान भिक्कूची परंपरा असणाऱ्या संघात एक भिक्खू एकदम बालिश दाखवले जेव्हाकी भिक्कू सांध्यामध्ये कडक नियमानंतरच प्रवेश दिला जायचा. उदा. सैनिक व्यक्तीला भिक्कू म्हणून घेतले जात नसत.
सेनापती पुत्र आणि त्याच्या पत्नीमध्ये कामदेव पूजेचा विधी करण्याचा संवाद दाखवला गेला जी निव्वळ फेकाफेक आहे. खरंच अशी कोणती प्रथा हिंदू समाजात होती का हाच प्रश्न येतो .
बुद्ध आणि त्याचा विचार याला पराजित दाखवन्यापायी हे खड्ग एव्हढे गंजले कि युद्ध प्रसंगी शेवटी सेनापती बोलतोय का गांजा पियुन आलेला चरशी बोलतोय हेच समजत नाही.
बाकी डायरेक्टर ने अधे मध्ये नुत्य आणि संगीत घालून प्रेक्षकांना मोहित ठेवून हिंसावादी विचारधारा मस्त पाजली आहे. बुद्धाला बदनाम करण्याच्या नादात ब्राह्माणांना ऐतखाऊ , दक्षिणा उकळणारे आणि बायकांना घरात डांबणारे दाखवले आहे, यावर समोर बसलेले प्रेक्षक निखळ हसतात पण आपल्याच समाजाला डायरेक्टर आणि लेखक बदनाम करत आहे हे विसरून जातात. यावर ब्राह्मण समाजाने योग्य पाऊल उचलावे नाहीतर तुम्ही हे मानता हेच दिसेल. स्त्रिया ह्या पायातील बेड्या सारख्या संवाद येऊन सुद्धा महिला प्रेक्षक त्यावर हसतात आणि नकळतपणे स्वतः ला दिलेल्या हीन वागणुकेला मान्यता देतात. बुद्ध मानणार्यांमुळे देश कसा मागे राहतो हेच मुळात काल्पनिक आहे आणि त्यामुळे हे संगीत नाट्य फेल होते आहे. बुद्ध मानणारे जपान चीन सारखे देश आज कित्येक पटीने पुढे आहेत. आणि गेली १२ वर्ष पासून RSS विचारधारेवर चालवणारे लोकांमुळे भारत हा दिवसेंदिवस प्रत्येक आघाडीवर मागे पडत आहे. सुज्ञ आणि लोकशाही, समतावादी प्रेक्षकांनी विचार करून असल्या हिंसावादी नाटकाचा तात्काळ निषेध करावा...
Arjun Kate
------------------------------------------------
विनायक दामोदर सावरकर लिखित "सन्यस्त खड्ग" नावाचं नाटक आज पाहिलं! या नाटकात लेखकाने "सिद्धार्थ गौतम बुद्ध" यांचा उल्लेख "अडाण्यांचा आचार्य" असा केलाय!
असा उल्लेख असतानाही हे नाटक रंगभूमीवर सादर होतंय, याचंच मला नवल वाटतंय.
यातही अजब बाब म्हणजे या नाटकाचा पहिला प्रयोग १९३१ साली झाला आहे.
आज इतके वर्ष उलटून देखील कुणालाही हा शब्दप्रयोग अद्याप खटकला नाही, याचं देखील मला राहून राहून आश्चर्य वाटतंय!
ते काहीही असो!
मी या नाटकाचा आणि या नाटककाराचा या संदर्भात जाहीर निषेध करतोय!
जगातील पहिल्यावहिल्या तत्त्वचिंत्तकाचा असा उल्लेख करणं म्हणजे, माझ्यालेखी लेखकाच्या वैचारिक दिवाळखोरीचं लक्षण आहे!
- सांध्य.
ता. क. - नाट्यप्रयोगाचे परीक्षण लिहिण्याची माझी इच्छा हा प्रयोग पाहिल्या नंतर मेली आहे!
0 टिप्पण्या