Top Post Ad

विद्यार्थ्यांच्या दिंडीत आयुक्त गगराणी झाले वारकरी

आषाढी एकादशी वारीनिमित्त छोट्या वारकर्‍यांच्या दिंडीचे आयोजन शाळेत करण्यात आले होते. या दिंडीत छोट्या वारकऱ्यांसोबत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी केलेल्या वेशभूषेची गगराणी यांनी आवर्जून विचारपूस केली. तसेच दिंडीत सहभागी झालेल्या  विद्यार्थ्यांसोबत त्यांनी छायाचित्रही घेतले.  महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना "आनंददायी शनिवार" या उपक्रमाअंतर्गत अक्षर दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. 

महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना गणित आणि इंग्रजी यासारख्या विषयाची गोडी लागावी तसेच विषयाच्या संकल्पना सोप्या पद्धतीने समजून घेणे शक्य व्हावे यासाठी तंत्रज्ञानाची जोड लाभणार आहे.  बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या शिक्षण विभाग आणि संपर्क फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपर्क स्मार्ट शाळा शिक्षक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी आज ५ जुलै  गोखले रोड (दादर) महानगरपालिकेच्या शाळेत सुरू असलेल्या प्रशिक्षण वर्गखोल्यांना भेट दिली.याप्रसंगी शिक्षण अधिकारी (प्राथमिक)  संदीप सांगवे, प्रशासकीय अधिकारी (‌शाळा)  स्नेहलता डुंबरे तसेच विविध शाळांचे शिक्षक उपस्थित होते. 

 स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांच्या बुद्धीमत्ता वाव मिळेल. तसेच सोप्या पद्धतीने संकल्पना आत्मसात करणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.  प्रशिक्षणार्थींसोबत संवाद साधताना  गगराणी म्हणाले की, अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग अधिकाधिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी करावा. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक संकल्पना सहजपणे कळाव्यात यासाठी तंत्रज्ञानाची मदत घ्यावी, असे आवाहन त्यांनी शिक्षकांना केले. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १८१ शाळांमध्ये १८१ स्मार्ट टेलिव्हिजन तसेच ‌शैक्षणिक संकल्पना आधारित उपकरण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गणित तसेच इंग्रजी भाषेतील संकल्पना चलचित्रपटाच्या माध्यमातून स्मार्ट टेलिव्हिजनवर मांडणे शक्य होणार आहे. दोन दिवसीय प्रशिक्षणासाठी १८१ शाळांमधील प्रत्येकी एक यानुसार शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. प्राथमिक विभागाच्या शिक्षकांची निवड या प्रशिक्षणासाठी करण्यात आली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com