2014 साली विधिमंडळात कायदा पारित करून होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथी परवानगी व एमएमसी रजिस्टर मध्ये श्येड्युल 28 अंतर्गत सीसीएमपी कोर्स रजिस्ट्रेशन बाबत कायदेशीर अधिकार. मिळाले . परंतु I.M.A. संघटनेच्या दबावाला व दिशाभुलीच्या राजकारणाला बळी पडून दि 11 जुलै रोजी राज्य सरकारने एमएमसी रजिस्ट्रेशन व एफडीए परिपत्रक रद्द केले. याविरोधात दिनांक 16 जुलैपासून आझाद मैदान येथे होमिओपॅथी डॉक्टर बाहुबली शहा आमरण उपोषण करणार आहेत. तसेच होमिओपॅथी डॉक्टरांच्या इतर संघटना न्याय मागण्या मान्य होईपर्यंत दरदिवशी शेकडोंच्या संख्येने धरणे आंदोलन करणार आहेत. याबाबत आज मुंबई मराठी पत्रकार संघ पत्रकार भवन येथे प्रसार माध्यमांना माहिती देण्यात आली. यावेळी डॉ.संतोष अवचार, डॉ.जयंत रांजणे, डॉ.निलेश जाधव, डॉ.शिवदास भोसले, डॉ.सोमनाथ गोसावी, डॉ.प्रतिक तांबे, डॉ.नितीन गावडे, डॉ.सुरेखा फासे, विद्याधर गांगण, डॉ.अब्रार इनामदार, डॉ.निलेश गावंड, डॉ.राजेश पाटील यांच्यासह अनेक होमिओपॅथिक डॉक्टर उपस्थित होते.
दि 9 जानेवारी 2014 रोजी मंत्रिमंडळाने मंजुरी देऊन राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीची परवानगी व एमबीबीएस कॉलेजमध्ये एक वर्षाचा सीसीएमपी कोर्स सुरू केला. जुन 2014 च्या अधिवेशनामध्ये याला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाने मंजुरी दिली. यामध्ये होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर ऍक्ट 1960 मध्ये बदल करत होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीची परवानगी व एमबीबीएस कॉलेजमध्ये एक वर्षाचा सीसीएमपी कोर्स करण्यासाठी परवानगी देण्यात आली. सोबतच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ऍक्ट 1965 मध्ये सुधारणा करत जे होमिओपॅथी डॉक्टर्स एमबीबीएस कॉलेजमधुन एक वर्षाचा सीसीएमपी कोर्स पूर्ण करतील त्यांच्यासाठी शेड्युल 28 अंतर्गत स्वतंत्र नोंदणी पुस्तिका ठेवण्यात येईल व त्यांची नोंदणी या स्वतंत्र नोंदणी पुस्तिकेमध्ये करण्यात येईल असा कायदा संमत करण्यात आला. दि. 1 जुलै 2014 पासुन हा कायदा राज्यामध्ये अमलात आला. दि. 8 जुलै 2024 रोजी राजपत्रांमध्ये हा कायदा प्रसिद्ध झाला. परंतु गेल्या दहा वर्षापासुन ही नोंदणी मिळत नव्हती. दि 15 जुलै 2025 पासुन ही नोंदणी देण्यात येणार होती. मात्र राज्य सरकारने अचानक निर्णय घेत नोंदणी रद्द केली व एफडीएचे परिपत्रक हे रद्द केले.हा राज्यातील एक लाख होमिओपॅथी डॉक्टरांवरती मोठा अन्याय आहे. यासंदर्भात 16 जुलै 2025 पासुन आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करण्यात येणार आहे. यामध्ये विविध जिल्हे आणि तालुक्यातील सर्व होमिओपॅथिक असोसिएशन तसेच होमिओपॅथिक महाविद्यालये, राज्यातील हजारो होमिओपॅथिक डॉक्टर्स सामील होणार असल्याचे बाहुबली शहा यांनी सांगितले.आय.एम.ए. संघटनेचे पदाधिकारी सी.सी.एम. पी. कोर्स पास झालेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांची बदनामी करणारी, दिशाभूल करणारी खोटी माहिती सोशल मीडिया मधून प्रसारीत करत असून, जनतेची, त्यांचा सदस्याची व सरकारचीही दिशाभूल करत आहेत. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. महाराष्ट्रातील जनतेला चांगली वैद्यकीय सेवा मिळावी ह्या उदात्त उद्देशाने जेथे एग. बी. बी. एस. डॉक्टर्स पोहचू शकत नाहीत किंवा जाऊ इच्छित नाहीत अश्या भागातील नागरिकांना चांगली वैद्यकीय सेवा मिळावी ह्या उद्देशाने विविध संघटना व संस्थानी केलेल्या मागण्यानुसार, शासकीय कमिट्या तयार करून त्याचा सखोल अभ्यास करून, शासकीय समित्यांच्या शिफारशी प्रमाणे, विधीमंडळात विधेयक सादर करून, एम. एम. सी. अॅक्ट १९६५ व एम. सी. एवं अॅक्ट १९६० मध्ये बदल मंजूर करून, १ जुलै २०१४ रोजी गा. राज्यपाल महोदयांच्या सहीने कायद्यात बदल मंजूर करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नियमानुसार विविध कमिट्या मध्ये सखोल संशोधन व अभ्यास करून होमिओपॅथी डॉक्टरांना मॉडर्न मेडिसिनचा उपचार करण्यासाठी सक्षम वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी अभ्यासक्रम तयार करून जेथे एम.बी.बी.एस. विद्यार्थी शिक्षण घेतात. फक्त त्याच वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षित करण्यात आलेले आहे.
फार्माकोलॉजी बरोबरच इतर विषयाचे प्रशिक्षण देऊन त्याची परीक्षा घेवून, उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कायद्याप्रमाणे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदे मध्ये वेगळ्या परिशिष्ट मध्ये नोंदणीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने कायद्यातील तरतुदी प्रमाणे कार्यवाही करण्यासाठी दि. ३० जून २०२५ रोजी आदेश निर्गमित केला हा निर्णय सर्वश्री महाराष्ट्रातील जनतेला दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्यासाठीच घेण्यात आलेला आहे. खरे तर मोठमोठ्या हॉस्पिटल मध्ये बहुतांशी आर. एम. ओ. हे आयुष डॉक्टर्स आहेत तेच डॉक्टर आय.सी.सी.यू. मध्ये २४ तास कार्यरत असतात तेव्हा मात्र हे होमियोपॅथी डॉक्टर्स सक्षम असतात परंतु त्याची कायद्यातील तरतुदी प्रमाणे एम. एम. सी. मध्ये नोंदणी करताना आय.एम.ए. चे पदाधिकारी वेगळी भूमिका मांडतात असे दुटप्पी धोरण आय. एम.ए. चे पदाधिकारी करतात. महाराष्ट्र शासनाने आय. एम.ए. या संघटनेच्या दिशाभूल करणाऱ्या दबावाला बळी न पडता, कायद्यातील तरतुदी प्रमाणे दहा हजार पेक्षा जास्त सी.सी.एम.पी. पास डॉक्टर्सना महाराष्ट्र वैद्यकीय परीषदेत नोंदणी करण्यासाठी प्रक्रिया राबवावी या मागणीसाठी राज्यातील होमिओपॅथी डॉक्टर सातत्याने लढा देत आहेत.


0 टिप्पण्या