Top Post Ad

19 जुलै रोजी आझाद मैदान मुंबई येथे महाराष्ट्र राज्यव्यापी लेणी अस्मिता आंदोलन

वर्तमानात महाराष्ट्र सह भारतातील सर्व प्राचीन बौध्द लेण्यावरील वास्तूंची अत्यंत दयनीय बिकट व विदारक अशी अवस्था निर्माण झालेली आहे.कदाचित ही अवस्था बदलली नाही तर या वास्तू कोणत्या धर्माशी निगडित आहेत हे ओळखणे ही कठीण होऊन जाईल...भारतातील पुरातन प्राचीन गौरवशाली बौद्ध धम्म येथील कर्मठ जातीवादी वर्ण वर्चस्ववादी पिलावळांनी हिंसेच्या माध्यमातून संपवला. बौद्ध धम्माच्या साहित्यात विचारात मिलावट केली आणि आता राहिलेल्या पुरातन वास्तू लेण्या यांचं देखील मोडतोड आणि विद्रूपीकरण अतिक्रमण सुरू आहे आमचा ठाम विश्वास आणि खात्री आहे हे अनावधानाने होत नसून हे हळूहळू जाणीवपूर्वक घडून आणलं जात आहे जवळपास 80 ते 90% बौद्ध लेण्यावरती विद्रुपीकरण करून अतिक्रमण करण्यात आलेल आहे हे तात्काळ प्रभावाने काढून टाकण्यात यावं ही आमची प्राथमिक मागणी आहे

दुष्ट प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी जाऊन विद्रुपीकरण करत आहेत हे ते करत आहेत कारण त्यांना हा समतेचा बंधुभावाचा न्यायाचा आणि ज्ञानाचा सत्याचा विचार नको आहे परंतु ज्यांना मानवता न्याय सत्य बंधुभाव प्रेम अहिंसा यांचा विचार हवा आहे ते काय करत आहेत.. एका बाजूला हा विचार नष्ट करणारी यंत्रणा कामाला लागलेली आहे तर दुसऱ्या बाजूला आपण आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी देखील संघटित होत नाही एकत्र येत नाही ही आमची एक मोठी अडचण आहे.. बांधवांनो वेळ घरात बसण्याची नाहीये तर आपली ओळख अस्तित्व कायम ठेवण्याची आहे.बांधवांनो वेळ आणि काळ संकटाचा आहे आपण आता या कार्याला वाहून घेण्यासाठी निष्ठेने मैदानात उतरायला हवं जर ह्या समता मानवता दर्शवणाऱ्या वास्तु टिकल्या तर तो समतेचा विचार चिरकाल टिकू शकेल
समाजाला लोकांना बांधवांना जागृत करून या महान कार्यासाठी तयार केलं पाहिजे यासाठी जागर अभियान चालवुन मेळावे परिषदा चर्चासत्र याचे निरंतर शृंखलाबद्द अभियान गावोगावी आयोजित केले गेले पाहिजेत आणि या विचाराचे समर्थक वाढवले पाहिजे तर आणि तरच आपण या संविधानिक मार्गाने आपला लढा विजय करू शकू आपला दुश्मन आणि शत्रू खूप शातिर आहे तो आपली रणनीती आधीच ओळखून ती नेस्थानभूत करण्यासाठी कामाला लागतो यावर आपण देखील थोडे इंटरॅक्च्युअल होऊन कार्यक्रम प्रोग्राम नियोजन केले पाहिजे आणि त्या दृष्टीने येणाऱ्या काळात डावपेचात्मक रणनीती आखून कार्यक्रम राबवले पाहिजेत असाच एक सूत्रबद्ध नियोजनबद्ध कार्यक्रम आपण महाराष्ट्रात 19 जुलै 2025 रोजी आझाद मैदानात लेणी अस्मिता आंदोलनाच्या अनुषंगाने बौद्ध लेणी संवर्धन समितीच्या वतीने आयोजित केलेला आहे
यात प्रत्यक्षरीत्या जवळपास महाराष्ट्रातील 30 ते 35 सक्रिय लेणी अभ्यासक संघटना एकत्रित आलेल्या असून अप्रत्यक्षरीत्या 100 बौद्ध संघटनांनी यात आपलं समर्थन दर्शवलेल आहे बौद्ध लेणी संवर्धन समितीच्या वतीने 19 जुलै रोजी होणार हे लेणी अस्मिता आंदोलन महाराष्ट्रातील बौद्ध चळवळीला नक्कीच गती देणार ठरणार आहे.यानिमित्ताने आपणास विनंती करतो कि या लेणी अस्मिता आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी सढळ हस्ते तन मन धनाने सहकार्य करावे व हे आंदोलन यशस्वी करावे तसेच आपण देखील आपल्या प्रभागातून आपल्या भागातून शहरातून गावातून या आंदोलनासाठी निश्चित यावं संविधानिक मार्गाने आपल्या मागण्या मांडाव्यात आणि संविधानिक मार्गाने कुठलाही अनुचित प्रकार न करता शांतपणे आपल्या गावी जाऊन या कार्याबद्दल जनजागृती निर्माण करून मोठी संघटित शक्ती निर्माण करावी.. हीच दुश्मनांना दिलेली मोठी चपराक ठरेल आशा करतो आपण या महान कार्यात सहभागी व्हाल आणि महाराष्ट्रातील बौद्ध चळवळ गतिमान करण्यात आपलं योगदान द्याल.  *प्राचीन बौध्द पूर्वजांचे आम्ही वारसदार आमचा वारसा जतन करण्यासाठी आम्ही लेणी अस्मिता आंदोलन यशस्वी करू*
  • प्रा.अमोल सोनवणे
  • प्रचारक सनातन धम्म

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com