डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने स्थापन झालेली पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही संस्था शिक्षण क्षेत्रातील एक प्रकाशस्तंभ ठरायला हवी होती. मात्र गेल्या अनेक वर्षांत या संस्थेचे रूपांतर एका सत्तालोलुप गटाच्या कुरघोड्यांत झाले आहे. हे फक्त दुर्दैव नव्हे, तर व्यवस्थेवरचा एक मोठा कलंक आहे. वनि २०१० मध्ये कायदेशीर अध्यक्ष के. एच. रंगनाथ यांच्या नियुक्तीने आयटी विभागातील प्रा. डॉ. राहुल ब्राह्मणे यांना प्रभारी प्राचार्यपद मिळाले. पण या नियुक्तीला डॉ. वाडेकर, प्रा. एम.एम. देशपांडे, डॉ. एस.पी. गायकवाड यांनी खोट्या अध्यक्षांच्या संगनमताने विरोध केला. यानंतर डॉ. राहुल ब्राह्मणे यांचा पगार थांबवला, पीएफ बंद केला, खोटे आरोप लावले गेले आणि शेवटी त्यांना तुरुंगात पाठवले गेले. न्यायव्यवस्थेने शेवटी डॉ. ब्राह्मणे यांना खोट्या गुन्ह्यांतून निर्दोष मुक्त केले,
पण त्यानंतरही १३ वर्षे उलटून गेली तरी त्यांना नोकरी, पगार, न्याय काहीच मिळालेले नाही. सर्वात गंभीर बाब म्हणजे, १४ नोव्हेंबर २०२२ रोजी सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी मोरे यांना बेकायदेशीर अध्यक्ष ठरवले, तरीही वाडेकर गटाने नियमबाह्यपणे सत्ता चालवणे सुरूच ठेवले आहे. यावर शासन, धर्मदाय आयुक्त आणि शिक्षण खाते थंडपणे बघ्याची भूमिका का घेत आहे, हा मोठा प्रश्न आहे. दोषींवर कठोर कारवाई करणे आणि पीईएसमध्ये पुन्हा कायद्याचा अंमल प्रस्थापित करणे, या आणि इतर अनेक बाबींसदर्भात ७ जुन रोजी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लिगल PES ट्रस्टींची बैठक झाली. त्यामध्ये ठरविण्यात आले की, जी घुसखोरी झाली आहे आणि ज्यांनी स्वतःला स्वयंघोषित अध्यक्ष म्हणून संस्थेवर कब्जा केला आहे, अशा लोकांना कायदेशीर कारवाई करून बाहेर काढावे. तसेच, संस्था पुन्हा एकदा सुरळीत चालावी, चेअरमन डॉ. एस. पी. गायकवाड, ट्रस्टी भंते उपगुप्त महाथेरो, भीमराव आंबेडकर, आयु. विठ्ठल खाडे, सी. आर. सांगलीकर, अनिल गायकवाड, श्रीमती शीला राणी हे ट्रस्टी या बैठकीला उपस्थित होते
0 टिप्पण्या