Top Post Ad

ठाण्यात मनसेचा रेल्वे प्रशासनाच्या विरोधात धडक मोर्चा

  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज ठाण्यातील दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान एक धडक मोर्चा काढला. या मोर्चा अंतर्गत रेल्वे प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध व्यक्त करण्यात आला, विशेषतः मंगळवारी घडलेल्या दुर्देवी अपघाताच्या पार्श्वभूमीवर मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी विविध मागण्या मांडल्या आणि रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या धडक मोर्च्यात कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन रेल्वे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार आक्रोश केला. मनसे नेते तथा पालघर ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी या मोर्चाच्या माध्यमातून सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सेवेसाठी आवश्यक बदल करण्याचे आवाहन केले.


   मनसेच्या प्रमुख मागण्या; राजसाहेब ठाकरे यांच्या सुचनेप्रमाणे रेल्वे गाड्यांमध्ये प्रवेश व निर्गमनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी, दिवा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी लोकल सेवा सुरू करण्यात यावी, रेल्वे स्थानकाच्या हद्दीतील फेरीवाले हटवून प्रवाशांचा प्रवेश व निर्गमन सुसह्य करावा, संभाव्य अपघातांची माहिती सादर करावी, मुंबई लोकलमधील आसन क्षमतेचा तक्ता उपलब्ध करावा, अपघात नुकसान भरपाई २५ लाख रुपये करावी, प्रलंबित अपघात केसेसची माहिती मिळावी, प्रवाशांच्या नियमावली सादर करावी, मुंबई लोकल सेवेतून उत्पन्न आणि खर्चाची माहिती द्यावी, स्वतंत्र मुंबई लोकल बोर्ड स्थापनेसाठी निर्णयाची माहिती मिळावी, सुरक्षा उपाययोजनांची माहिती द्यावी, फलाटावर चेंगराचेंगरीसदृष्य परिस्थितीवर उपाययोजना करावी.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या आंदोलनामुळे रेल्वे प्रशासनाच्या धोरणांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे, तसेच प्रवाशांच्या सुरक्षा आणि सोयीसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची मागणी मनसेच्या मोर्च्याच्या माध्यमातून करण्यात आली. संबंधित सर्व मागण्यांवर येत्या आठ दिवसात उपाययोजना केल्या नाहीत तर मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा मनसे कडून देण्यात आला.

रेल्वे स्थानकांमधील खाद्यपदार्थ आणि पेपर स्टॉल्स येत्या आठ दिवसांत काढून टाका. अन्यथा मनसे हे स्टॉल्स उखडून टाकेल असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला.या समयी श्री प्रकाश भोईर माजी आमदार श्री रविंद्र मोरे ठाणे शहर अध्यक्ष श्री मनोज गुळवी श्री संदीप राणे श्री राहुल कामत आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com