पहलगाम येथील अतिरेकी हल्ला आणि त्यानंतर मोदी यांचा पाकिस्तानला " शिकवलेला धडा " या सर्व घटनांनी प्रधानमंत्री मोदी , सरकार आणि भारतीय मिडीया यांची अगदी " ग्लोबल" बेइज्जती होत आहे.त्यातून ३३ देशात जी ७ प्रतिनिधी मंडळे पाठवली त्याचेही देशात आणि जगात हसेच होत आहे. स्वार्थी धार्मिक मंडळी जे एखाद्या दगडाला शेंदूर थापून तो देव आहे , ब्रह्मांडनायक आहे असे सांगून एक " चैतन्य मूर्ती " उभी करतात तशी ही मोदी नामक " गुरूमुर्ती " आज पार सर्वत्र आडवी झाली आहे. भक्त - समर्थक आज हवालदिल झाले आहेत. मिडिया हा धक्का सहन करू शकत नाही आणि तो त्यांना .... सांगताही येत नाही. मिडियाने या चार दिवसाच्या " तथाकथित युध्द " काळात ज्या अतिरंजित बातम्या प्रसारित केल्या ते निस्तरताना आमचे १५ दिवस वाया गेले असे सी.डि.एस. ( Combined Defence Services ) अनिल चौहान यांनी " ब्लूम बर्ग " या ग्लोबल चॅनलला मुलाखत देताना सांगितले. दुसरे वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल यांनीही " रायटर " या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला आपली मुलाखत दिली . ANI या भारतीय पण आंतरराष्ट्रीय संस्थेला नव्हे ....म्हणजे आज आपल्या देशाच्या लष्कर प्रमुखांचाही आजच्या या दलाल मिडियावर किंचितही भरोसा राहिला नाही ! इतकी अधोगती या मिडियाची झाली आहे .
C.D.S चौहान यांनी तर आपल्या मुलाखतीत
" भारत - पाकिस्तान यांच्यात" आण्विक युध्द हे तसूभरही शक्य नव्हते " असेही ठामपणे स्पष्ट केले . उभय देशांचे निकराचे युध्द झाले तरीही ते शक्य नाही अशीही पुस्ती त्यांनी जोडली आहे. मूळात या अशा स्थितीत हे सांगण्यासाठी थेट " लष्करा " ला समोर यावे लागते याचा अर्थ पडद्याआड काय काय लपविले जात आहे याचा जरा प्रत्येकाने गांभीर्याने विचार केला पाहिजे. आण्विक युध्दाची शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावताना C.D.S. यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाही खोटं ठरवलं आहे , तेही ' आंतरराष्ट्रीय ' मंचावर, हेही लक्षात घेतले पाहिजे. म्हणूनच " मोदी - ट्रम्प यांच्यात नेमके काय डिल झाले " हा प्रश्न आता उघडपणे उपस्थित झाला आहे. या पूर्वीही कॉंग्रेसच्या सत्ता काळात युध्दे झाली आहेत. १९७१ च्या युध्दाची माहिती जनरल माणेक शॉ यांनी सरकारच्या दूरदर्शनवर दिली . संसदेत त्या संदर्भातील माहिती मांडली गेली . १९६५ ला ताश्कंद करार होत असताना इकडे भारतात तत्कालीन जनसंघ म्हणजे आजची भाजपा यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या घराला चक्क घेराव घातला होता ! त्या धक्क्याने शास्त्रीजींचा ताश्कंद येथे मृत्यू ओढवला असे काही तज्ज्ञांचे मत आहे. आणि वर कांगावा करून त्याच मृत्यूचे याच पक्षाने कित्येक वर्षे सार्वजनिकरित्या भांडवल केले हे कोणाला आज आठवत नसले तरी यांची इतिहासात नोंद आहे . आज सरकार - मिडिया जनतेच्या अविश्वासाला पात्र ठरले आहेत एवढे खरे ! आणि हा इतिहास नव्हे तर .... वर्तमान आहे .
धन्यवाद
0 टिप्पण्या