सततच्या मोर्चे, आंदोलन, धरणे यांना बगल देत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दक्षिण मुंबई जिल्हा कुलाबा तालुक्याने एक अभिनव उपक्रम राबविला. याबाबत सर्वत्र कौतूक आणि चर्चा होत आहे. पक्षाच्या वतीने दिनांक 24 मे व 25 मे रोजी भव्य कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. तुषार पालवे विजय शेट्टी यांच्या हस्ते झाले, सुमारे 200 स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवला. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पक्षाच्या वतीने राबवण्यात आलेला पहिलाच प्रयोग अर्थात कॅरम स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यामध्ये प्रथम क्रमांक वाजिद अन्सारी, द्वितीय क्रमांक विकास धारिया, तृतीय क्रमांक सुरज कुंभार, चतुर्थ क्रमांक संतोष जाधव यांनी पटकावले, तसेच ५ ते १६ क्रमांकासह तीन उत्तेजनार्थ पारितोषिके देखील स्पर्धकांना देण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम भाऊ सोनवणे यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल गायकवाड, कुलाबा तालुका अध्यक्ष विजय जाधव, दक्षिण मुंबई जिल्हा सचिव दादासाहेब जाधव, दीपक वाघमारे, सेफ कुरेशी, विनायक गवांदे, सचिन आठवले, विषेश सहकार्य संजय बर्वे, अमोल शिंदे, संकेत खरात व दक्षिण मुंबई जिल्हा सरचिटणीस शिरीष चिखलकर यांच्या विशेष परिश्रमाने या स्पर्धा यशस्वी पार पडल्या.
0 टिप्पण्या