Top Post Ad

....अखेर भुजबळांच घोडं गंगेत न्हालं!

इंडिया आघाडीवर मात करून (इव्हीएमचा प्रताप हा वेगळा विषय असू शकतो) महायुतीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली .मात्र प्रत्यक्षात मंत्री होण्याची वेळ आली तेंव्हा भुजबळ यांच्या सारख्या ओबीसी नेत्याला  डावललं गेलं होत .बेकीच्या राजकारणाने भुजबळांचा बळी घेतला . त्यांनां सत्तेपासून रोखण्यात आलं. कॅबिनेटने मंत्रिमंडळात वर्णी लागणार याची  शंभर  टक्के   खात्री असलेले छगन भुजबळ  गाफील राहिले आणि  ऐनवेळी  दगाबाजी झाली ..१५ डिसेंबर 20२४  रोजी देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा शपथ विधी  सोहळा पर पडला होता .पण मंत्रिमंडळाच्या  यादी त्यांचं नाव  नव्हतं ही बाब  भुजबळांच्या  जिव्हारी लागली .  खुर्चीची ऊब लागलेले भुजबळ अधिक अस्वस्थ   झाले होते. खेर तर हा अखिल ओबीसी समाजाच्या अवमान होता .अंगाचा तिळपापड झालेल्या भुजबळांनी  अजित दादा पवार सारख्या पक्षनेतृत्वाला ही   दूषणं दिली  .सत्तेची भूक त्यांना स्वस्थ बसू देईना . 

  जहा नहीं चैना वहा नहीं रहेना . म्हणत डोळ्यात   थिजलेल्या आसवांना वाट मोकळी करून  देत  सैरभैर झालेल्या छगन भुजबळांनी  भाजपची दाढी  धरली . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तीनदा भेट  घेतली .या भेटीगाठी वाढत गेल्या .दरम्यान  मराठा आरक्षणावर  मनोज जरांगे यांनी रान  उठवलं .मात्र त्याचा फारसा परिणाम कुठंही जाणवला नाही.उलट महाराष्ट्रात  महायुतीची सत्ता आली . मेहनतीचे फळ पदरात पाडून घेण्यासाठी भुजबळांनी   कंबर कसली .त्यासाठील त्यांनी मराठा आरक्षण लढ्याला आव्हान देत ओबीसी आरक्षण लढ्याला बळ देण्याचा प्रयत्न केला .आणि भाजपला ही  हेच हवे होते . मनोज जरांगेना आव्हान देत राज्यात ओबीसी  जननायक म्हणून उभे केले गेले.  भाजपने   छगन भुजबळांचा वापर करून घेतला आहे. सत्य कोणीही नाकारू शकत नाही.तसा. भुजबळांचा  इतिहास फटाफूटीचाच अधिक आहे .

१९९१ साली  छगन भुजबळ शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत सेना सोडून ते  काँग्रेसच्या वळचणीला जावून बसले.त्यावेळी  वी पी सिंग  सरकारने  मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्या होत्या. त्यावेळी ओबीसी आरक्षण मुद्यावर त्यांनी मराठी  माणसाच्या  संघटनेतून बाहेर पडले .त्यावेळी त्यांना शिवसैनिकांच्या  रोषाला सामोरे जावे लागले होते ..पुढे त्यांनी महसूल मंत्री पद भूषवले  .१९१९५  मध्ये सत्ता परिवर्तन झाले आणि शिवसेना भाजपा युतीची सत्ता आली . पुढे शरद पवार यांनी काँग्रेस सोडली अन् स्वतःचा पक्ष स्थापन केला. सत्तेची चटक लागलेल्या छगन भुजबळ हुरळले आणि शरद पवारांच्या गोटात सामील  झाले.  विदेशिबहु च्या मुद्द्यावरून काँग्रेस मधून बाहेर पडलेल्या पवारांनी  सत्तेसाठी काँग्रेसबरोबर दिलजमाई केली होती .त्यावेळी  भुजबळ यांच्याकडे  गृह  खात्याची जबाबदारी देण्यात आली .त्यानंतर टी बाळू अँड  कंपनी  असे विधान करू  भुजबळांनी  आपलीं गृहमंत्री पदाची ताकद दाखवून शिव सेना  प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना   कोर्टाची पायरी दाखवली होती.. शिवसेना कधीच  हे विसरणार  नाही.

 शिवसेनेचे पहिले महापौर ते  आमदार  म्हणून मिरवणाऱ्या भुजबळांनी रंग  बदलला आणि ओबीसींच्या मुद्द्यावर राज्यातील  माधवला साद घातली त्यासाठी  त्यांनी गोपीनाथ मुंडेंना  बरोबर घेण्याचा  प्रयत्न केला होता. पुढे याच भुजबळांनी  बहुचर्चित महाराष्ट्र सदन घोटाळा केला . त्यात ते अलगद  अडकले आणि भाजपने या  सुवर्ण  संधीचा लाभ उठवला .त्यांना इडीची   बिडी देऊन  त्यांची  तुरुंगात रवानगी केली होती . शरद पवार  यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा  खंदा वीर जेलमधून बाहेर  पडला .भाजपशी फारकत घेतल्यानंतर उध्दव  ठाकरे   यांना पवार काकांनी  आधार  देवून  महाराष्ट्राच्या गादीवर बसविले .तोवर देशात करोनांने  कहर केला . भाजपने हो संधी टिपली   आणि  उध्दव ठाकरे यांना सत्ता सोडण्यास भाग पाडले होते.दरम्यान  खोक्यांच्या अमिषापोटी  एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले अन् अभेद्य शिव सेनेच्या चिंध्या चिंध्या झाल्या..  

भाजपच्या कुबड्या घेऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले . तत्पूर्वी अजितदादांनी पवारांनी पहाटे शपथ विधी घेऊन    घरातच बंडाचा पहिला झेंडा फडकावण्याचा  पराक्रम  आणि विक्रमही  केला होता .पण पुढे हे बंडोबा थंड झाले .आणि त्याचा वचपा काढण्यासाठी पुढल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि  इडीचा सासेमिरा चुकविण्यासाठी अजित पवार यांनी राष्ट्रवादीला खिंडार पाडले . आणि या भाजपच्या दरबारी मांडलिकत्व पत्करले व  उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली .आणि आताही ते त्याच पदावर विराजमान आहेत.. दरम्यानच्या काळात  वाल्मीक कराड कंपनीने सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या  केली.त्यामुळे    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि बीडचे सर्वसर्वा धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून  पाय उतार व्हावं  लागलं .मुंडेंची  झालेली  गच्छंती छगन भुजबळांच्या पथ्यावर पडली. असं म्हणायला हरकत नाही.. . भुजबळांनी घेतलेल्या  गाठीभेटी   आणि सहा सात महिने केलेली तपस्या फळाला आली म्हणायचं ..पण  बाहुबली असलेल्या छगन भुजबळांच्या   सारख्या  बाहुबलीना अखेर  कुणाचं बळ  लाभलं आहे हा प्रश्न आज ही अनुत्तरित आहे.२० में.२०२५ रोजी भुजबळांनी  मंत्री पाडा ही शपथ घेऊन सार्वजनिक वितरण  खात्याची जबाबदारी उचलली आहे .अखेर भुजबळांच घोड अखेर सत्तेच्या  गंगेत न्हाले.....!.असो त्यांची खुर्ची  त्यांना लखलाभ  होवो. भुजबळांच्या पुढच्या वाटचालीस आमच्या मनापासून शुभेच्छा.

जॉन मेढे ...मुंबई

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com