Top Post Ad

शासकीय विश्रामगृहात सापडले साडेपाच कोटी रुपये ?

महाराष्ट्र विधीमंडळातील अंदाज समिती तीन दिवसीय दौऱ्यासाठी सध्या धुळे जिल्ह्यात दाखल झाली आहे. या दौऱ्यात समिती धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेणार आहे. एकूण 29 आमदारांचा समावेश असलेल्या या समितीचे नेतृत्व आमदार अर्जुन खोतकर करत आहेत. शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर या समितीचे अध्यक्ष आहेत!  त्यापैकी 11 आमदार सध्या धुळ्यात दाखल झाले आहेत.  या समितीला मलिदा देण्याकरता जवळपास साडेपाच कोटी रुपये धुळे शासकीय विश्रामगृह गुलमोहर येथे रूम नंबर 102 मध्ये जमा करण्यात आले होते. त्या ठिकाणी शिवसेनेचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्यासह सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सदरच्या रूमला कुलूप लावून पहारा ठेवला. या संदर्भात जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो या सर्वांना सूचना दिल्यानंतर देखील चार ते पाच तास उलटून गेल्यावर देखील कोणीही आले नाही,

याबाबत माहिती मिळाल्यानंतर, माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रशासनाकडे तत्काळ चौकशीची मागणी केली होती. या मागणीस पाठिंबा देण्यासाठी त्यांनी खोली क्रमांक 102च्या बाहेर तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन केले. अखेर पोलीस अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा प्रक्रिया पार पडली. यावेळी खोलीचे कुलूप कटरच्या सहाय्याने तोडण्यात आले आणि अधिकाऱ्यांनी खोलीत प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या तपासणीत रोकड सापडली. तब्बल सहा तासांच्या मोजणीनंतर पोलिसांनी पंचनामा करून रोकड जप्त केली आहे.  पहाटेपर्यंत शासकीय गुलमोहर विश्रामगृह याठिकाणी रोख रक्कम जप्त करण्याची कारवाई सुरू होती.  जप्त करण्यात आलेली रक्कम देखील पोलिसांनी ताब्यात घेतली असून याप्रकरणी पोलीस प्रशासन काय कारवाई करते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 दरम्यान, या आमदारांना देण्यासाठीच ही रक्कम गुलमोहर विश्रामगृहात आणण्यात आली होती, असा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.

या प्रकरणावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की, एखाद्या चांगल्या कामगिरीसाठी रोख रकमेचं बक्षीस दिलं जातं... धुळ्यात गेलेल्या अंदाज समितीनेही अशी काही दैदिप्यमान कामगिरी केली असेल का? आणि म्हणून त्यांना ‘बक्षिस’ देण्यासाठी कोट्यवधी रुपये रक्कम जमा केले असतील का? हा संशोधनाचा विषय आहे. पण अवकाळी पावसाप्रमाणे आ. अनिल गोटे साहेब त्या १०२ क्रमांकाच्या खोलीत अचानक हजर झाले आणि त्यांच्यामुळं अंदाज समितीच्या ‘दैदिप्यमान कामगिरी’वर आणि ‘बक्षिस’ म्हणून मिळणाऱ्या रकमेवरही पाणी फेरलं गेलं, असे त्यांनी म्हटले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com