नेर येथील स्थानिक शिवनगर येथे असलेले संबोधी बुद्ध विहार परिवर्तनवादी व आंबेडकरी चळवळीचे केंद्र असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक निळकंठ गजभिये यांनी केले. यशोधरा महिला मंडळाच्या वतीने लोकराजा छत्रपती शाहू महाराज स्मृतीदिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गजभिये बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.जगदीश पाटील होते तर देवराव पाटील खोडे हे प्रमुख अतिथी होते. कार्यक्रमाला अनेक मान्यवर मंडळी आणि स्थानिक गावकऱ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.
आपल्या भाषणात गजभिये पुढे म्हणाले, परिवर्तनवादी महानायक व महानाईकांच्या जयंती, स्मृती दिवस या विहारांमध्ये साजरी केले जातात आणि इतरही लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात म्हणूनच संबोधी बुद्ध विहार परिवर्तनवादी आणि आंबेडकरी चळवळीचे केंद्र आहे. लढणाऱ्या दोन ताकदवर मल्लांना राजर्षी शाहू महाराज दोन हाताने सहज लहान मुलासारखे अलग करत असल्याचा दाखला गजभिये यांनी लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या ताकदीचे उदाहरण देताना दिला. अध्यक्ष स्थानावरून बोलताना पाटील म्हणाले, लोकराजा शाहू महाराजांची जयंती स्मृती दिवस सणांसारखे दिवाळी दसऱ्यासारखे साजरी करा त्यामुळे बाबासाहेबांच्या चळवळीला बळ मिळेल. या कार्यक्रमाचे संचालन वेणुताई खोबरागडे, प्रास्ताविक रुखमा मानवटकर तर आभार डॉ. शरद मोरे यांनी मानले. कार्यक्रमाला संघमित्रा चव्हाण, ललिता कोल्हे, संघामित्रा माने, संध्या गजभिये, वनिता मोरे आदींसह परिसरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते
0 टिप्पण्या