पूर्व उपनगरातील मुलुंड भांडूप तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्राबल्य होते . हे तालुके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गड होते . परंतु सध्या त्याला उतरती कळा लागली आहे . मरगळलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि नवचैतन्य निर्माण करून भाजपला तोडीसतोड उत्तर देण्याकरिता शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कंबर कसली असून पक्षा तर्फे आयोजित करण्यात आलेल्या आढावा चिंतन बैठकीत भाजपची खुमखुमी जिरवू असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
मुलुंड मधील जे एस शेट्टी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या आढावा बैठकीला महिला जिल्हा अध्यक्ष मनीषा रहाटे, माजी नगरसेविका मीनाक्षी सुरेश पाटील , ज्येष्ठ नेते सुहास आळेकर, जिल्हाध्यक्ष धनंजय पिसाळ , अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष सुहेल सुभेदार , चंद्रमणी जाधव ,समाजसेवक भारत दानानी आदी मान्यवर उपस्थित होते .
पक्षात आलेली मरगळ दूर होऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि नवचैतन्य निर्माण व्हावं यासाठी ॲड.अमित पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या आढावा बैठकीला मार्गदर्शन करताना धनंजय पिसाळ म्हणाले की आपण सर्वांनी मिळून अथक परिश्रम घेतले आहेत . आपले हे पंचवार्षिक कष्ट वाया जाऊ नये म्हणून आपण गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे. येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला .सत्तेपासून रोखणं हेच आमचं उद्दिष्ट असेल असे आवाहन पिसाळ यांनी कार्यकर्त्यांना केले .
मुलुंड मध्ये भाजपसारख्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नमवून तीन जागांवर समाधान मानावे लागेल अशी स्थिती निर्माण केली होती भाजपच्या बरोबरीत तीन नगरसेवक महापालिकेत पाठवले होते.पण आजची परिस्थिती तशी नाही .मुलुंड मध्ये आज नगरसेवक आमदार खासदार मंत्री हा भाजपचा आहे .त्यामुळे ही परिस्थिती बदलणे अत्यंत महत्वाचे आहे..आणि आपण ती बदलण्याचा निर्धार आपण केला पाहिजे .केवळ बोलून नव्हे तर आता कृतीतून हा निर्धार दाखवून दिला पाहिजे .असे आवाहन ॲड अमित पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.
प्रभाग स्तरावर काम करायला हवे .त्यासाठी प्रत्येकानं आपापल्या परीने प्रयत्न करतो आहे .ही कौतुकास्पद बाब आहे.असे सांगून अमित पाटील पुढे म्हणाले,येत्या काही महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणूक होणार असून तसे संकेत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला सूचित केल्याची माहिती अमित पाटील यांनी दिली .वॉर्ड अध्यक्षा पुष्पाताई साकरी , प्रविण रोकडे, संतोष शर्मा आदी पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
0 टिप्पण्या