Top Post Ad

प्रोटोकॉल जाणिवपूर्वक न पाळणाऱ्या त्या अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा

भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे 52 वे सरन्यायाधीश भूषण गवई महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असताना त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून सन्मानपूर्वक प्रोटोकॉल देणे आवश्यक असताना त्याबाबत हलगर्जीपणा बाळगणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा, तसेच मुख्य सचिव सैनिक, पोलीस महासंचालक रेशमी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भरती यांना  तातडीने बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी भीम आर्मी भारत एकता मिशनचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मूर्म यांच्याकडे केली आहे.  

       भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशपदी भूषण गवई हे महाराष्ट्राचे तिसरे सरन्यायाधीश म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतल्यानंतर भूषण गवई हे पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. भारत देशाचे  सर्वोच्च पदी गवई  असताना त्यांना नियमानुसार प्रोटोकॉल देणे हे महाराष्ट्र सरकारचे कर्तव्य आहे. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक हलगर्जीपणा केला असून ही गंभीर बाब असून संपूर्ण महाराष्ट्रातून या घटनेचा जाहीर निषेध केला जात आहे, अशी माहिती भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

 महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना साधारणपणे भारताची सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मुंबईत येत आहेत, याची माहिती पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त यांना मिळू नये, याचा अर्थ काय समजावा? पोलीस यंत्रणेला जर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश येत असल्याची माहिती मिळत नसेल तर उद्या मुंबई आणि महाराष्ट्रात अतिरेकी आले तर या यंत्रणेला काय माहिती मिळेल, त्यामुळे नैतिकतेची जबाबदारी म्हणून पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आणि मुंबई पोलीस आयुक्त भूषण गगराणी यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी दिला आहे. अँड .नितीन सातपुते यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अवमान प्रकरणी जनहित याचिका दाखल केल्याबद्दल भीम आर्मी भारत एकता मिशन वतीने अशोक कांबळे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com