Top Post Ad

मुंबई मेट्रो मार्ग ३ च्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन

 बीकेसी ते आचार्य अत्रे चौक वरळी या ९.७७ किलोमीटर अंतराच्या  मुंबई मेट्रो मार्ग ३ च्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ९ मे रोजी केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकिय संचालक श्रीमंत रुबल प्रखर अगरवाल,  प्रधान सचिव डॉ. संजय मुखर्जी,  मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आदी मान्यवर उपस्थित होते.  उपस्थित मान्यवरांसह मुख्यमंत्र्यांनी बीकेसी ते सिद्धिविनायक मंदिर स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला. मुंबई मेट्रो-3 च्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन ही मुंबईकरांसाठी मोठी भेट आहे. आरे ते वरळी हा प्रवास आता जलद आणि आरामदायी होणार असून, तिसऱ्या टप्प्यामुळे कोलाबा ते कफ परेड दरम्यानची कनेक्टिव्हिटी आणखी सुधारेल. मेट्रो-3 मुळे मुंबईची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जागतिक दर्जाची होईल आणि शहराच्या शाश्वत विकासाला चालना मिळेल असा विश्वास उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला.  

  मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व मेट्रो मार्गाचे काम वेगाने सुरू असून यावर्षी ५० किलोमीटर तर पुढील वर्षी ५० किलोमीटर मेट्रोमार्ग कार्यन्वित करायचे आहेत. त्यानंतर पुन्हा ५० किलोमीटर मार्ग कार्यन्वित करायचा आहे, जेणेकरुन संपूर्ण मुंबई महानगर परिसर मेट्रोद्वारे जोडता येईल, मेट्रो ३ मध्ये स्टेट ऑफ द आर्ट अशी स्थानके आहेत. ही मेट्रो एक इंजिनिअरिंगग मार्वल आहे. बीकेसी ते सिद्धीविनायक मंदिराचा प्रवास करताना मिठी नदीच्या खालून मेट्रो मार्ग जातो. ही देशातील सर्वात लांब सिंगल लाईन भूमिगत मेट्रो आहे. कफ परेड ते आरे सीप्झ हा ३३ किलोमीटर लांबीचा एकूण मार्ग आहे. आज ९ किलोमीटरचा मेट्रो ३ चा टप्पा जनतेसाठी शनिवारपासून जनतेसाठी नियमित सुरू करण्यात येणार आहे. गिरगावसारख्या अतिशय दाटीवाटीच्या भागातही काम पूर्ण झाले आहे. आचार्य अत्रे चौक ते कफ परेडपर्यंतचा टप्पा ऑगस्ट महिन्यात सुरू करण्याचा आमचा निर्धार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना न‍िमंत्र‍ित करु. तसेच मेट्रोमध्ये प्रवासी संख्या वाढत आहे. हे पूर्ण काम झाल्यानंतर प्रवासी संख्येत आणखी भर पडणार आहे. मेट्रो ३ ही विमानतळावर जाण्यासाठी देखील सोयीची ठरेल,  "मेट्रो ३ चे काम २०१७मध्ये सुरू करण्यात आले होते. त्यात मधले अडीच वर्षे अडचणी निर्माण झाल्यामुळे का कामाला विलंब लागला. सिंगल प्लॅटफॉर्म सिंगल तिकिट ज्यात सर्व प्रकारचा प्रवास ज्यात उपनगरीय रेल्वे, मेट्रो, बेस्ट, मोनो यात एकाच तिकीटावर करता यावा, याचा प्रयोग यशस्वी झाला असून त्याची चाचणी सुरु आहे. चाचणी पूर्ण झाल्यानंतर व्यावसायिकरित्या सुरू करण्यात येईल. आपण नुकतेच बेस्टचे गुगलशी टायअप केले आहे. त्यात बेस्ट बसची लोकेशनसह सर्व माहिती मिळू शकेल. याशिवाय, एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी जायचे असल्यास गुगलच्या मदतीने प्रवाशांना ट्रॅव्हल प्लॅन देखील मिळेल. सिंगल प्लॅटफॉर्मवर देखील अशी सोय उपलब्ध असेल असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हणाले. 

  • मेट्रो-3 च्या तीन टप्प्यांची रचना
  • पहिला टप्पा: आरे ते बीकेसी (12.5 किमी, 10 स्थानके), ऑक्टोबर 2024 मध्ये सुरू.
  • दुसरा टप्पा: बीकेसी ते आचार्य अत्रे (वरळी नाका, 9.8 किमी, 6 स्थानके), 9 मे 2025 रोजी उद्घाटन.
  • तिसरा टप्पा: वरळी ते कफ परेड (11.3 किमी, 11 स्थानके), जुलै 2025 मध्ये प्रस्तावित.
  • एकूण लांबी: 33.5 किमी, 27 स्थानके (26 भुयारी, 1 ग्राउंड लेव्हल).
  • प्रवासी क्षमता: दररोज सुमारे 17 लाख प्रवासी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com