रमाईच्या त्याग भावनेतून प्रेरित होऊन काम करणाऱ्या समर्पित कार्यकर्त्या वनिता इंगोले .... सहाय्यक प्रशासन अधिकारी नंदाताई करडे
नेर(प्रतिनिधी) रमाई भिमराव जी आंबेडकर यांनी कुठल्याही परिस्थितीशी तडजोड न करता बाबासाहेबांच्या शिक्षणात आणि सामाजिक कार्यात समर्पित आणि त्याग भावनेने झोकून दिल्याचे आपणा सर्वांना माहित आहे आपल्या कामाप्रती असलेली ही जी त्याग आणी समर्पणाची भावना आहे त्याच त्याग व समर्पणाच्या भावनेतून गेल्या दहा-बारा वर्षांपासून वनिता इंगोले काम करत असल्याचे आम्हाला दिसून येते ते कार्यालयातील घरकुलाचे काम असो की समाजातील सामाजिक लढा असो त्यामध्ये त्या सातत्याने अग्रेसर राहून काम करतात असे प्रतिपादन पंचायत समिती नेर च्या सहाय्यक प्रशासन अधिकारी नंदाताई करडे यांनी केले
त्या रमाई स्मृतिदिनाच्या अभिवादन कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या यावेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महिला तक्रार निवारण समिती पंचायत समिती नेरच्या अध्यक्षा वनिता इंगोले यांचा सत्कार करण्यात आला प्रमुख अतीथी म्हणून कनिष्ठ प्रशासन अधिकारी सविता काळे विस्तार अधिकारी जयश्री भुजाडे उपस्थित होत्या
महिला तक्रार निवारण समिती पंचायत समिती नेर च्या वतीने रमाई स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला रमाईस अभिवादन व वनिता इंगोले यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते वनिता इंगोले यांची कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आम्हा सर्व महिला तक्रार निवारण समितीच्या सभासदांना आनंद झाल्याचे मत कनिष्ठ प्रशासन अधिकारी सविताताई काळे यांनी व्यक्त केले याप्रसंगी पेढे वाटून सगळ्यांनी आनंद साजरा केला यावेळी अभियंता ऋतुजा मोखाडे अभियंताअनुष्का साहू वरिष्ठ सहायक सुरेखा गुजर वरिष्ठ सहाय्यक शोभा नाईक मोक्षप्रदा जवंजाळ माधवी इंगोले संपदा पिल्लेवान वैष्णवी अडसड अनिता तलवारे गायत्री वडतकर अनिता पराते आदी महिला कर्मचारी ची उपस्थिती होती सोबतच निलेश नैताम विस्तार अधिकारी धम्मपाल तलवारे विस्तार अधिकारी चंदनकर विस्तार अधिकारी विवेक जोल्हे सहाय्यक अभियंता राहुल तायडे सहाय्यक अभियंता गजेंद्र गुबरे आदींनी सुद्धा वनिता इंगोले यांचे अभिनंदन केले
0 टिप्पण्या