26 मे 2025 !... 26 जुलै 2005 नाही. 26 जुलै सारखा दिवसरात्र तुफान पाऊस पडला असता तर समजण्या सारखं होतं.पण 26 मे रोजी नुसत्या मुसळधार पावसाने मुंबई ठप्प झाली. मिडिया जे सांगतोय विक्रमी पाऊस, तो दुपारनंतर.पण मुंबई तर सकाळीच बरबाद झाली. नव्हे ती केली गेली. मुंबईवर पावसाने नव्हे तर सरकारनेच जलात्कार केला आहे. मुंबईतील नाले सफाईची लाखो करोडोंची कंत्राटे कुठल्या पाण्यात वाहून गेली ? एप्रिल मे मधील नालेसफाईच्या सरकारी पाहणीचे रंगीबेरंगी फोटो कुठल्या रद्दीत दाबले गेले. टेंडर्सचा पाण्यासारखा पैसा कोण्या सरकारी बंगल्याच्या टॉयलेट मध्ये गडप झाला ? कोण देणार याची उत्तरं ? मुंबईवर गेली अनेक वर्षं आयुक्त राज आहे. तिच परिस्थिती राज्यातील अनेक शहरांची. पण आयुक्तांच्या मागे उभे राहून कोण राज्य करतंय या शहरांवर ? मंत्री, पालकमंत्री, तिथले आमदार, खासदार यांनी या शहरांना वाचवण्यासाठी काय केलंय? पावसाळ्यात मुंबई आणि उपनगरे तुंबणार हे त्यांना माहीतच नव्हते का ? की पहिल्यांदाच त्यांनी मुसळधार पाऊस बघितलाय ? मुंबई, ठाणे, पालघर परिसरात दरवर्षी होणारी जनतेची पाऊसकोंडी नवीन आहे की काय ?
मुंबई महानगरपालिकेने (BMC) गेल्या १० वर्षात ₹२.१९ लाख कोटी (₹२,१९,०००,०००,०००). रुपये वाटप केले. BMC चा २०२५-२६ चा वार्षिक अर्थसंकल्प इतिहासातील सर्वाधिक - ₹७४,४२७ कोटी, रुपये आहे. हे सर्व पैसे आणि तरीही मुंबई पाण्याखाली आहे! हा गोंधळ अनेक दशकांपासून चाललेल्या भ्रष्टाचाराचा आणि BMC ने केलेल्या मान्सूनपूर्व कामाचा परिणाम आहे! भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस - हे सर्वच गेल्या काही वर्षांच्या भ्रष्टाचारासाठी आणि मुंबईच्या सध्याच्या स्थितीसाठी जबाबदार आहेत. मुंबईच्या अॅक्वा लाईन (मेट्रो लाईन-३) वरील वरळी भुयारी मेट्रो स्टेशन जे पाण्याखाली गेले, या मेट्रो स्टेशनचे नुकतेच उद्घाटन झालेले होते. हे दृश्य पाहून राज्यात भ्रष्टाचार किती मोठा असेल याची कल्पना करता येते. महाराष्ट्रातील नागरिकांनो, जागे व्हा!
0 टिप्पण्या