Top Post Ad

लाडके अधिकारी नियुक्त करून लाडका ठेकेदार योजना राबवण्याचे भ्रष्टाचारी धोरण

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महत्त्वाकांक्षी असा गायमुख, ठाणे – फाऊंटन हाॅटेल नाका, वसई दुहेरी बोगदा आणि फाऊंटन हाॅटेल नाका, वसई – भाईंदर उन्नत रस्ता प्रकल्पाची अंदाजे १५ हजार कोटी रुपयांची निविदा रद्द केली. आता नव्याने या प्रकल्पासाठी निविदा काढण्यात येणार आहे. घोडबंदर-भाईंदर बोगदा व उन्नत मार्ग प्रकल्पावरून सुप्रीम कोर्टाने राज्यातील भाजपा युती सरकारला मोठी चपराक लगावली आहे. कोर्टात सरकारचे पितळ उघडे पडल्याने निविदा रद्द करण्याची वेळ राज्य सरकारवर आली.  निवडणूक काळात भाजपला 600 कोटींचे 'दान' देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगला कंत्राट देण्यासाठी गोलमाल करणारे महायुती सरकार सुप्रीम कोर्टात तोंडावर आपटले. 6,000 कोर्टीचा उन्नत मार्ग आणि आठ हजार कोर्टीचा ठाणे-घोडबंदर ते भाईंदर बोगदा या प्रकल्पांच्या निविदा एमएमआरडीएने रद्द केल्या. कोर्टाच्या इशाऱयानंतर उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यातील एमएमआरडीएवर ही नामुष्की ओढवली.

भाजपलां  इलेक्टोरल बाँड्स मधून कोट्यवधी रुपयांचा निधी देणाऱ्या मेघा इंजिनियरिंग कंपनीला १४,००० कोटी रुपयांचा टेंडर भाजपच्या फडणवीस-शिंदे सरकारने दिले. यामध्ये टेंडर ३००० कोटी रुपयांनी कमी असताना देखील एल अँड टी सारख्या प्रसिद्ध कंपनीला डावलून हे करण्यात आले. एल अँड टी सर्वोच्च न्यायालयात गेली. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निविदा प्रक्रिया रोखण्याचा इशारा दिल्याने हादरलेल्या एमएमआरडीएने भूमिका स्पष्ट करण्यासाठी वेळ मागून घेतला होता. अखेर शुक्रवारी 14 हजार कोटी रुपयांच्या दोन्ही प्रकल्पांची संपूर्ण निविदा प्रक्रियाच रद्द करीत असल्याची माहिती एमएमआरडीएने न्यायालयाला दिली. हा निर्णय एल अॅण्ड टीला दिलासा देणारा असल्याने न्यायालयाने या कंपनीची याचिका निकाली काढली. एमएमआरडीएने मनमानी करून तसेच अपारदर्शक पद्धतीने दोन्ही प्रकल्पांची निविदा प्रक्रिया राबवली. एल अॅण्ड टी कंपनीला कोणतीही सूचना किंवा कुठलेही कारण न देता निविदा प्रक्रियेतून अपात्र ठरवले होते.  भाजपच्या 'मेघा' कृपेला 'मेगा' झटका बसला.

  या प्रकल्पात मोठे गौडबंगाल असून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३ हजार कोटी रुपयांची लाच घेतल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. राज्यात भ्रष्टाचाराचे मोठे रॅकेट कार्यरत आहे.  तब्बल १ लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा संशय व्यक्त होत असून या सर्व मोठ्या प्रकल्पांची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी  सपकाळ यांनी केली आहे. 

नवी दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, या प्रकल्पातून दुसऱ्या निविदाधारकाचे टेंडर तांत्रिक बाबीचे कारण देत रद्द केले, या कामाचे टेंडर ज्या कंपनीला दिली ती मेघा इंन्फ्रास्ट्रक्चर कंपनी कोणाची आहे? यामागे काय गौडबंगाल होते? हे आता सर्वांसमोर आले आहे. एमएमआरडीएने आता टेंडर रद्द केल्याने हा विषय संपत नाही, हा विषय भ्रष्टाचाराचा आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी भ्रष्टाचाराचा कॉरिडॉर तयार केला असून एमएमआरडीए, म्हाडा, सिडको, एसआरए यांचे एक सर्कल आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून भ्रष्टाचाराचे हे सर्कल सुरु आहे. यासाठी लाडके अधिकारी नियुक्त केले जातात आणि यातून लाडका ठेकेदार योजना राबविली जाते. 

हा विषय केवळ एका प्रकल्पापुरता नसून राज्यात समृद्धी महामार्ग, पुणे रिंगरोड, विरार अलिबाग कॅारिडॅार व आता शक्तीपीठ महामार्ग हे सर्व प्रकल्प भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहेत. सत्तेतून संपत्ती व संपत्तीतून सत्ता हे दुष्टचक्र सुरु असून. ठाणे, मुंबई परिसरातील प्रकल्प हे या गौडबंगालाचे भाग आहेत. ५० खोके एकदम ओके चा पैसा यातूनच आला. निवडणुकीतही पैसा फेक तमाशा देख चा पैसाही यातूनच आला होता, यांना सर्व रान मोकळे आहे. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, मिरा-भाईंदर, नवी मुंबईसह राज्यातील महानगरपालिकांवर प्रशासक राज आहे आणि प्रशासक राज्य सरकार नियुक्त करतो. फडणवीस व शिंदे यांनी या माध्यमातून रॅकेट सुरु केले आहे. यातून तब्बल १ लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचे दिसत आहे. म्हणून या सर्व प्रकल्पांची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली आहे.

शिवसेना नेते व परिवहन मंत्री प्रताप सरकारनाईकांच्या विधानावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, सरनाईक भाजपाचा अजेंडा चालवत आहेत, त्यांना मराठी नेस्तनाबूत करायची आहे. त्याच अजेंड्याची री सरनाईकांनी ओढली आहे. एकनाथ शिंदे सुरतमार्गे गुवाहाटीला पळाले तेव्हाच या पक्षाने मराठी बासनात गुंडाळून ठेवली आहे. हिंदी सक्तीच्या विरोधात काँग्रेस पक्षाने सर्वात आधी आवाज उठवला, त्यानंतर इतर पक्षांनी तीच भूमिका घेतली होती. सक्ती शब्द परत घेण्याची घोषणा केली पण अद्याप त्याचा शासन निर्णय निघालेला नाही. यांच्यावर कोणाचा दबाव आहे हे स्पष्ट असून महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री अमित शाह असून राज्यात कठपुतलीचा खेळ सुरु आहे. परंतु मराठी व महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी काँग्रेस पक्ष कट्टीबद्ध आहे असे सपकाळ म्हणाले. कृषी मंत्रालय हे ओसाड गावची पाटीलकी आहे या माणिकराव कोकाटे यांच्या विधानावर बोलताना सपकाळ म्हणाले की, हे मंत्री आहेत का वाचाळवीर असे म्हणायची वेळ आली आहे, त्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याशी केली, आता त्यांनी जे विधान केले त्याचा अर्थ म्हणजे शेती राहिली नाही, उद्योगपतींची चाकरी करा असा आहे. हे कृषिमंत्री नाही तर ढेकळ्या मंत्री आहेत असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लगावला..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com