मुंबई घाटकोपर पूर्व पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षाचालकांची वाढती दादागिरी आणि मनमानीमुळे प्रवासी त्रस्त झाले असून, भाडे नाकारन्याबरोबर अत्यंत गलिच्छ आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करणे मोठ्या आवाजात बोलत दहशत पसरवीत आहेत . माकड चाळे करणाऱ्या रिक्षा चालकांच्या या सर्व प्रकारच्या सामाजिकआणि ध्वनी प्रदूषणाला स्थानिक पोलिसआणि वाहतूक विभाग यांचा वरदहस्त असल्याची चर्चा स्टेशन परिसरात आहे विशेष म्हणजे सकाळ दुपार आणि संध्याकाळी ह्या रिक्षावाल्यांची आरेरावी आणि दबंगगिरीस नागरिक कंटाळले कारवाईची मागणी करीत आहेत विशेष म्हणजे जवळचे भाडे सर्रासपणे नाकारले जाते .
पूर्व उपनगरातील घटकोपर हा कष्टकरी कामगार आणि बहुल चाकमानी असलेला विभाग पश्चिमेला डोंगराळ भागात वसलेले दाट लोकवस्ती विक्रोळी पार्क ,अमृत नगर .जगदुशा नगर साईनाथ नगर , भटवाडी बर्वे नगर परिसर असल्फा गाव ,नारायण नगर ,आझाद नगर,जागृती नगर , खैराणी रोड ,चांदिवली ,साकीनाका तर पूर्वेकडे माता रमाबाई आंबेडकर नगर कामराज नगर सारखी संमिश्र वसाहती मध्ये राहणारे कामगार आणि नोकरदार मंडळी सकाळी गर्दीच्या वेळी रिक्षाला पहिली पसंती देतात . वेळेत कामावर रुजू रेल्वे स्टेशन गाठण्यासाठी रिक्षा अत्यंत सुलभ असल्याने चाकरमानी रिक्षाला पहिली पसंती देतात .ते त्यांना इष्ट ठरते.तर मुंबई बाहेरून मुंबईत येणारे आणि साकीनाका अंधेरी ,घाटकोपर पश्चिम,विक्रोळी ,विद्याविहार याठिकाणी असलेल्या शासकीय ,निमशासकीय , खासगी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्या व कार्यालयातून काम करणारे कामगार आणि कर्मचारी हे रिक्षाने प्रवास करत असतात.त्याशिवाय शालेय विद्यार्थी ,महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह शिक्षक ,होमगार्डचे जवान आणि पोलिस ही शेअर रिक्षाचा अवलंब करत असतात.घाटकोपर मध्ये शेअर रिक्षाचे पेव फुटले असून तसे फलक लावण्यात आलेले आहेत .पण ते आकारतअसलेलं दर पत्रक हे मान्यता प्राप्त आहे का ? त्याला वाहतूक विभागाची मान्यता आहे का असे अनेक प्रश्न निर्माण होतात. बेस्टच्या भोंगळ कारभारामुळे विलंबाने आणि अनियमित धावणाऱ्या बेस्ट बसेस यामुळे नाईलाजास्तव प्रवाशांना रिक्षाने प्रवास करावा लागतो . सकाळ - संध्याकाळी घाटकोपर स्टेशनरोड श्रध्दानंद रोड हा रिक्षावाल्यांनी व्यापलेला असतो .. त्यांच्या आडमुठेपणास आणि आढत्याखोर .भूमिकेमुळे वाहतूक कोंडी अधिक होते . इतर वाहने आणि बसेसना जागा दिली जात नाही . रिक्षचालक मंडळी आपली दादागिरी आणि टपोरीपणा दाखवून दहशत पसरवीत आहेत असा आरोप प्रवाशांसह स्थानिक नागरिकांनी केला आहे . रिक्षचालकांचे हे माकडचाळे त्वरित बंद करून स्टेशन परिसरात गोंधळ घालून असभ्य वर्तन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करावी अशी मागणी पुढे आली आहे.
या ठिकाणी हाकेच्या अंतरावर शिव सेना ( उभाठा) पुरस्कृत महाराष्ट्र रिक्षाचालक सेना यांचं कार्यालय आहे. बाजूला पोलिस चौकी आहे .तसेच भाजपा आमदार राम कदम पुरस्कृत महालक्ष्मी रिक्षा चालक मालक संघटनेचा वेगळा गट आहे त्याच्या पुढे मेट्रो रेल्वे स्थानका खाली दिवंगत कामगार नेते शरद राव पुरस्कृत रिक्षाचालक संघटना कार्यरत असून ताश्कंद दुकानास्मोर आर पी आयचे नेते दीपकभाऊ निकाळजे पुरस्कृत रिक्षाचालक संघटना कार्यरत आहे. या शेअर रिक्षा थांबा आहे.येथून चांदिवली म्हाडा कॉलनी ,संघर्ष नगर आदी परिसरात जाण्या - येण्यासाठी 30.- 40 रुपये आकारले जातात रिक्षा स्टँडवर डॅशींग आमदार राम कदम कामगार युनियन असे स्टिकर लवलेल्या रिक्षा ही शेअरिंग वाहतूक करतात. खैरानी रोड करीता 20 रुपये / प्रवासी आकारले जगतात.
शिव सेना कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकारी कार्यकर्ते यांनी या रिक्षा चालकांना अनेकदा समज दिली आहे .तरी रिक्षाचालकांवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही . ऐन गर्दीच्या वेळी याठिकाणी डाके - ढोके नामक घाटकोपर पोलिस ठाण्याचे त्यांचें कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी आणि त्यांचे सहकारी पोलिस पथक अथवा वाहतूक विभागाचे अधिकारी - कर्मचारी उपस्थित नसतात .ही आश्चर्याची बाब आहे असे मत घाटकोपरमधील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले आहे. मरकटलीला करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करावी यासाठी घाटकोपर मधील जागरूक नागरिकांनी वाहतूक विभागाकडे रीतसर तक्रारी केलेल्या आहेत. .मात्र सदर विभागाने त्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली गेली नाही
दरम्यान पदपथावर बेसुमार वाढलेले अनधिकृत फेरीवाले आणि फेरीवाला माफिया यांनी गिळंकृत केलेल्या पदपथांचा कोंडलेला श्वास मोकळा व्हावा आणि पादचाऱ्यांकरित असलेले पदपथ खुले होण्यासाठी न्यायालयाने निर्देशित केले आहे. पोलिस अधिकारी आणि महानगरपालिका प्रशासनाने काही ठिकाणी स्तुत्य कामगिरी केली आहे .मात्र त्याच वेळी घाटकोपर पूर्वेकडील लोकमान्य टिळक रोड, एन वार्डच्या मागील बाजूस असलेले फेरीवाले .एम जी रोड वरील रामजी आशर शाळेसमोरील बेकायदा फेरीवाले आणि पार्किंग तर घाटकोपर पश्चिम.स्टेशन परिसरात असलेल्या जयंतीलाल वैष्णव मार्ग , आणि .घाटकोपर मेट्रो रेल्वे स्टेशन खाली पथारी मांडून बसलेल्या या फेरीवाल्यांचा आका कोण ? पोलिस पालिका की स्थानिक वरदहस्त याचा शोध कधी घेणार असा प्रश्न घाटकोपर वासीय नागरिकांना पडला आहे .

0 टिप्पण्या