नेर - सामाजिक पातळीवर काही मोठे करायचे असल्यास आपल्याला इतरांची मदत घेणे गरजेचे आहे किंवा इतरांची मदत घेतल्याशिवाय काहीच करू शकत नाही असा सामाजिक मानसिक खचलेपणा वर्तमान परिस्थितीमध्ये दिसत आहे. अशा अवस्थेतून समाजाला बाहेर काढण्यासाठी आंबेडकरी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये सामाजिक स्वावलंबनासाठी एकजुटीने निर्णय घेण्याचे ठरले. आंबेडकरी सेवानिवृत्त कर्मचारी विचार मंच यांच्या वतीने स्थानिक नेहरू महाविद्यालयाच्या रोडवरील प्रा. जगदीश पाटील यांच्या घरी आंबेडकरी सेवानिवृत्त कर्मचारी अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये समाजाच्या मानसिक खचलेपणावर चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये इतरांकडून पैसे आणून कार्यक्रमांमध्ये डीजे दारू आणि नाच गाण्यावर होणाऱ्या खर्चाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली समाजातील बेरोजगारी दूर करण्यासाठी छोटे छोटे उद्योगधंदे निर्माण करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला आणि खेड्यापाड्यातील तालुक्याच्या ठिकाणी आलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जागा अभ्यास सामग्री आणि निवासाची व्यवस्था या दिशेने अभ्यासिका ची व्यवस्था करणे बाबत एकजुटीने निर्णय घेण्याचे ठरले
बैठकीचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य शरद माहुरे होते प्रा. रमेश थूल अशोक चव्हाण प्रमुख अतिथी होते यावेळी नुकतेच सेवानिवृत्त झाल्याबद्दल आरोग्य विस्तार अधिकारी दिलीप चव्हाण यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या अरुणाताई पाटील यांचा वाढदिवस दीप प्रज्वलन करून साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन डॉ.शरद मोरे प्रास्ताविक प्रा. जगदीश पाटील व आभार प्रदर्शन प्रा. विनोद अंभोरे यांनी केले. बैठकीमध्ये प्रा. जगदीश पाटील यांच्या मार्गदर्शनात कार्यपालन समिती गठीत करण्यात आली. समितीमध्ये शालिग्राम माने, अरुण खडसे, नाना ढबाले, राजेंद्र नाईक, अशोक चव्हाण, प्रा. रमेश थूल, बाबाराव कोल्हे, हरिभाऊ ढेरे, शरद माहुरे, रुखमा मानवटकर, संघमित्रा चव्हाण, वेणू खोब्रागडे आदींचा समावेश आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशय पाटील, अक्षय माहुरे, वनिता मोरे, राजेश पाटील, आदींनी प्रयत्न केले. तसेच कार्यक्रमांमध्ये सुखदेव इंगोले, चरणदास तलवारे, अशोक सोनोने, ज्ञानेश्वर इंगोले, नरेंद्र अघम, सुरेश चौधरी, किशोर अघम, दिनकरराव इंगोले, प्रमोद इंगोले, शोभा माहुरे, उज्वला चव्हाण, ललिता कोल्हे, प्रीती पानतावणे, आदींसह परिसरातील गणमान्य उपस्थित होते
0 टिप्पण्या