वंचित बहुजन आघाडीची मुंबई प्रदेश कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली आहे. मुंबई प्रदेश अध्यक्षपदी चेतन अहिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर स्नेहल सोहनी यांची मुंबई प्रदेश महिला आघाडीपदी निवड करण्यात आली आहे. यासोबतच संपूर्ण मुंबई प्रदेश कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली आहे. चेतन अहिरे यांनी पक्षात आपल्या कामाची सुरुवात सामान्य पदाधिकारी म्हणून केली होती, तर स्नेहल सोहनी यांनी सुद्धा सामान्य कार्यकर्ती ते मुंबई महिला अध्यक्षपर्यंतचा प्रवास केलाय. यानिमित्ताने वंचित बहुजन आघाडीने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, सामान्य घरातील लोकं ही आपल्या कामाच्या बळावर उच्च पदांपर्यंत पोहचू शकतात.
आगामी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने ही तयारी सुरू केल्याचे दिसतेय. काही दिवसांपूर्वीच मुंबई प्रदेश कमिटीची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती. नवीन कमिटी जाहीर करून निवडणुकीच्या रिंगणात 'वंचित'ने आघाडी घेतली आहे. नवनियुक्त मुंबई प्रदेश अध्यक्ष चेतन अहिरे यांनी वंचित बहुजन आघाडीत सामान्य कार्यकर्ता ते मुंबई अध्यक्ष म्हणून झेप घेतली आहे. याआधी त्यांनी मुंबई प्रदेश कमिटीवर उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. तसेच विधानसभा निवडणूक 2024 मध्ये संध्याकाळी 5 नंतर वाढलेले मतदान, मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाने टोकन दिले होते का?, या संदर्भातील याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकाकर्त्यांच्यावतीने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे स्वत: न्यायालयात केस लढताय.
पक्षाने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी निश्चितपणे पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर आणि पक्षाचे मी आभार मानतो की, त्यांनी मला ही संधी दिली. - चेतन आहिरे - मुंबई प्रदेश अध्यक्ष
मी चळवळीत आली तेव्हा माझी सुरुवात एक सामान्य कार्यकर्ती म्हणून झाली होती. याआधी मी महिला आघाडीमध्ये काम केले होते. आता थेट मुंबई प्रदेश महिला आघाडीपदी संधी दिल्याबद्दल मी नेते बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे आभार मानते. आगामी काळात मुंबई प्रदेशमध्ये महिलांचे प्रश्न, अडचणी आणि संघटन वाढवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल.-स्नेहल सोहनी ― मुंबई महिला प्रदेश अध्यक्ष
0 टिप्पण्या