Top Post Ad

संपूर्ण कायदेशीर तर्कासह ऑल इंडिया बार परीक्षा पास करणारी पहिली A.I. प्रणाली

कोर्ट ईझी ए.आय.या AI प्रणालीने ऑल इंडिया बार परीक्षा (AIBE) यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे, आणि तीही केवळ बरोबर उत्तरेच नव्हे तर अचूक कायदेशीर तर्क आणि संबंधित कायद्यानुसार दाखले देऊन. हे यश व्यावसायिक कायदेशीर परीक्षेसाठी पात्र ठरणारी आणि पडताळता येणारी तर्कशुद्धता असलेली AI प्रणाली म्हणून पहिल्यांदाच दस्तऐवज रूपात नोंदले गेले आहे. कायदेशीर व तांत्रिक तज्ज्ञांनी या यशाची पडताळणी केली असून Court Easy AI ने सलग दोन बार परीक्षा (१८वी आणि १९वी, अनुक्रमे २०२३ आणि २०२४) ठरवलेल्या पात्रतेच्या पातळीच्या खूप वर जाऊन यश प्राप्त केले असल्याची माहिती Nugen Intelligence च्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. मुंबई प्रेस क्लब येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ.आकाश पाटील, CEO  आणि मृण्मयी शेंडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. 


   "हे यश दाखवते की अशा क्षेत्रांमध्ये जिथे अचूकता आणि विश्वास आवश्यक आहे, तेथे विश्वासार्ह AI प्रणाली निर्माण करणे शक्य आहे, "Domain-Aligned Al ही मूळ तांत्रिक संकल्पना कोर्ट ईझीला व्यावसायिक नियमांच्या मर्यादेत राहून विश्वासार्ह राहण्यास सक्षम करते. आज शेकडो कायदेशीर व्यावसायिक दररोज याचा वापर करत आहेत आणि त्यांचे अभिप्राय दाखवतात की विश्वासार्ह AI सहाय्यामुळे त्यांची उत्पादकता आणि अचूकता दोन्ही वाढली आहे. Court Easy AI ही प्रणाली Nugen Intelligence ने विकसित केलेल्या Domain-Aligned Al तंत्रज्ञानावर आधारित आहे, जे प्रशिक्षण व कार्यप्रणाली दोन्ही पातळ्यांवर नवोन्मेष दर्शवते व विशिष्ट कार्यसीमा पाळत अचूकता सुनिश्चित करते.  विश्वासार्हता हेच प्रत्येक कायदेविषयक तंत्रज्ञान कंपनीसमोरील मूलभूत आव्हान आहे," असे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले. "आम्ही इतर तंत्रज्ञान कंपन्यांना आमच्या Domain-Aligned Al तंत्रज्ञानाशी सहकार्य करण्यासाठी खुले आहोत. " असे डॉ.आकाश पाटील, CEO, Nugen Intelligence (Court Easy AI मागील AI संशोधन स्टार्टअप) यांनी सांगितले.

तपशीलवार मूल्यांकनानुसार Court Easy AI ने AIBE-18 मध्ये ८७% आणि AIBE-19 मध्ये ७३.१% अचूक उत्तरे दिली, जे अनुक्रमे साधारणतः ४५% तपशीलवार मूल्यांकनानुसार Court Easy AI ने AIBE-18 मध्ये ८७% आणि AIBE-19 मध्ये ७३.१% अचूक उत्तरे दिली, जे अनुक्रमे साधारणतः ४५% असलेल्या पात्रतेच्या निकषांपेक्षा खूपच जास्त आहे. प्रमुख सार्वत्रिक AI मॉडेल्सच्या तुलनेत कोर्ट ईझी AI ने कायदेशीर तर्क व संदर्भात उच्च अचूकता दर्शवली. "Court Easy Al हे वकीलांचे स्थान घेण्यासाठी नव्हे, तर त्यांना पूरक म्हणून तयार केले आहे, Court Easy Al ने AI पारदर्शकतेच्या दिशेने अभूतपूर्व पाऊल उचलले असून सर्व परीक्षेचे निकाल कायदेशीर आणि AI समुदायासाठी तपासणीसाठी खुले केले आहेत.  "विश्वास निर्माण करायचा असेल तर पारदर्शकता आवश्यक आहे, आम्ही इतर कंपन्यांनाही असेच सत्यापन व पारदर्शकतेचे तत्त्व स्वीकारण्याचे आवाहन करतो."  " असे मृण्मयी शेंडे, COO/CMO, यांनी सांगितले. 

Court Easy AI हे एक कायदेविषयक बुद्धिमत्ता प्लॅटफॉर्म आहे, जे कायदेशीर संशोधन, दस्तऐवज मसुदा व पुनरावलोकनासाठी उच्च-विश्वासार्ह AI सहाय्य प्रदान करते. या प्लॅटफॉर्मवर Nugen च्या Domain-Aligned AIT™ तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे, ज्यामुळे कायदेविषयक गुंतागुंतीच्या प्रश्नांना अचूक व शोध-आधारित उत्तरे मिळतात.  Nugen Intelligence ही Stanford University व IIT Madras येथील AI तज्ज्ञांनी स्थापन केलेली एक डीप-टेक AI संशोधन स्टार्टअप आहे. ही कंपनी कायदा, वित्त, आरोग्य व इतर उच्च-जोखमीच्या क्षेत्रांमध्ये अचूकता आणि विश्वास वाढवण्यासाठी Domain-Aligned AIT™ तंत्रज्ञानावर आधारित उपाय तयार करते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com