निवृत वय वर्षे 65 ठेवण्यात यावे शिक्षिकांना निवृत झाल्यानंतर ग्रेच्युटी पेन्शन - शैक्षणिक मोबदला देण्यात यावा. शिक्षिकांना आरोग्य राज्य विमा योजना लाभ देण्यात यावा. तसेच शिक्षिकांचे कामांचे स्वरूप पाहता. (शिक्षक) पगार वाढ रु.8000/-ते रु.20,000/- व्हावे, तसेच (मदतनीस) रु.5000/- ते 10,000/- व्हावे .यासह विविध मागण्यांबाबत बालवाडी शिक्षिकांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रथमच आज बुधवार दिनांक 28 मे रोजी "मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी रूपा विदयाधर रेडकर, अलका कोकाटे, स्वप्ना मोरे यांच्यासह अनेक बालवाडी शिक्षिका उपस्थित होत्या.
वय वर्षे 58 आहे असे दाखवून अनेक शिक्षिकांना कामावरून कमी करून त्यांच्या जागी परस्पर संस्था नवीन शिक्षिका भरती करीत आहेत.( संस्थेतर्फे त्यांना रीतसर नोटिस देण्यात येत नाही किंवा त्याबाबतचा पत्रक ही त्यांना देण्यात येत नाही.) साहजिकच ते काम करीत राहिले आहेत पण त्यांना पगार पूर्ण वर्षाचा देण्यात आलेला नाही. नवीन शिक्षिका दाखविण्यापूर्ता भरती करण्यात आलेल्या आहेत. काहीही शिकवत नाहीत. त्यांना देखील पगार देण्यात आलेला नाही. जुन्या शिक्षिका 40 वर्षे काम करूनही त्यांना निवृत झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळत नाही. किती वर्षे काम केले त्याचे प्रमाणपत्र देखील देण्यात येत नाही. पगार स्लिप नाही की त्यांना सर्व शिक्षिकांना पगार देखील 2 ते 3 महिन्यानंतर मिळतो आहे. बालवाडी वर्ग पटसंख्या पूर्वी 20 होती, ती आता 40 करून ठेवलेली आहे. कमीत कमी 30 पटसंख्या असली पाहिजे नसेल तर बालवाडी बंद करण्यात येईल किंवा ती एकत्रित शाळेत वर्ग करण्यात येतील असे म्हणतात. मग हिन्दी, मराठी, इंग्लिश सर्व मुले एकाच वर्गात एकत्रित करून 40 (पटसंख्या करणार) शिक्षिकांना मात्र दुसऱ्या शाळेत पाठविणार आहेत.आधार कार्ड बालवाडी मुलांना सक्ती केली असल्याने लहान मुले असल्याने त्यांचे आधार कार्ड वेळेत कधीच मिळत नाही, कारण शासनाच्या नियमानुसार त्या बालकांना बरेच वेळा खेपा घालून आधार कार्ड मिळत नाही, मग आम्हा बालवाडी शिक्षिकांना त्यांचा पाठपुरावा करावा लागत आहे. तरीही मिळत नसल्याने आधार सक्ती करू नये असे आम्हाला वाटत आहे कारण लहान मुले शिक्षणापासून वंचित राहतील. बी.एम.सी व संस्था यांच्या मधील करारानुसार संस्थेला अटी व शर्ती नुसार काम करणे बंधनकारक असताना. संस्था त्या प्रमाणे वागत नाहीत प्रत्येक संस्थेचे वेगवेगळे नियम आणि अटी पण बी.एम.सी. कडून त्या संस्थेवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही. अशा पद्धतीने अन्यायाला बालवाडी शिक्षिकांना सामोरे जावे लागत असल्याने मत यावेळी मांडण्यात आले.
1) सर्वे करण्याचे महीने दरवर्षी "एप्रिल जून" आहेत.
2) आमचे बालवाडी वर्ग 4 तासाचे असून जो पर्यन्त मुले घरी जात नाहीत तो पर्यन्त टीचर्स ना थांबावे लागते. (पालक मोलमजुरी करीत असल्याने ते कधीच वेळेवर घेऊन जाण्यास येत नाहीत आम्हीही ते समजून ते येई पर्यन्त वाट पाहत जास्त वेळ थांबतो)
3) बालवाडी वर्गातील मुले नेहमी येण्यास ताळाताळ करीत असल्याने बऱ्याच वेळेला आम्हा शिक्षिका, मदतनीस यांना मुलांच्या घरी जाऊन त्यांना घेऊन यावे लागत आहे.
4) प्रत्येक महिन्याला पालक मीटिंग घ्यावी लागते.
5) मुलांना खेळातून शिक्षण देणे त्यांचा शारीरिक मानसिक विकास घडवणे, अक्षर, अंक लिखाण - वाचन यांची ओळख करून देणे. (मुलांचे शिक्षणाचे विडियो फोटो पालक ग्रुप, संस्था ग्रुप यांना पाठविली जातात.)
6) आम्हा शिक्षिकांना मुलांचे वजन, ऊंची घ्यावे लागत आहे. मुले अशक्त आहेत. (त्यांना पोषक आहार घरून मिळत नाही, बी. एम. सी शाळेतून ही त्यांना आहार मिळत नाही.) मात्र प्रत्येक सणाला शिक्षिका स्व-खचनि खाऊ देतआहे.
7) संस्थे तर्फे दर महिन्याला 1 वेळ ट्रेनिंग घेतली जाते दिवसभर.जाणे - येणे खर्च हा बालवाडी शिक्षिकांना करावा लागतो आहे. खाणे-पिणे घरूनच घेऊन जावे लागते. ट्रेनिंग साठी साहित्य जरि ते देत असले तरी पीडीएफ प्रिंट स्व-खर्चाने करतो.बी. एम.सी. ट्रेनिंग वर्षातून । किंवा 2 वेळा होते ते व्यवस्थित सेवा पुरवितात.
8) इफेक्टिव शिट टीचर्स ना तयार करून (HM) (AO) स्वाक्षरी संहितकरून त्यांच्या संस्थेकडे सांगतील त्या ठिकाणी नेऊन द्यावे लागते.
9) बी एम सी- उमंग app रोज भरावे लागत आहे. दोन्ही (ऑनलाइन / ऑफलाइन) त्यानुसार मुलांचे उपस्थिती, त्यांना दिवसभरात काय शिकविले, त्यांचे मेडिकल रिपोर्ट, त्यांचे प्रोफाइल भरणे, सर्वे मुलांचे तपशील भरणे, ई. कामे बी एम सी नियमा नुसार करून घेतले जात आहे. आम्हाला स्वखर्चाने मोबाइल रीचार्ज भरावा लागतो तो देण्यात यावा.
10) आम्ही बालवाडी शिक्षिका असून आम्हाला अंगणवाडी ची ट्रेनिंग दिली जाते, त्यांच्या प्रमाणे आम्हाला सुविधा मात्र दिली जात नाही.
अशा प्रकारे सध्या शिक्षिकांचे कामे चालू आहेत
- - बालवाडी शिक्षिकांची मागणी:
- 1) निवृत वय वर्षे 65 ठेवण्यात यावे शिक्षिकांना निवृत झाल्यानंतर ग्रेच्युटी पेन्शन - शैक्षणिक मोबदला देण्यात यावा. शिक्षिकांना आरोग्य राज्य विमा योजना लाभ देण्यात यावा.
- 2) शिक्षिकांचे कामांचे स्वरूप पाहता. (शिक्षक) पगार वाढ रु.8000/-ते रु.20,000/- व्हावे, तसेच (मदतनीस) रु.5000/- ते 10,000/- व्हावे.
- 3) ज्या शिक्षिकांचे प्रलंबित पगार राहिलेले आहेत त्यांना पगार देण्याची मागणी करीत आहोत.
- 4) बालवाडी वर्गातील मुलेच पुढे प्राथमिक ला जात असल्याने सर्व प्रकारचे प्राथमिक कष्ट सर्वे करणे हे बालवाडी टीचर्सना श्रम घ्यावे लागत आहेत.
- 5) जर बी. एम सी. कडून संस्थेमार्फत आम्हाला मानधन मिळतो तर आम्हाला बी. एम. सी मध्ये दाखल करून घ्यावे, आम्हाला बी. एम. सी. चे आय कार्ड द्यावे, संस्थेच्या ताब्यातील बालवाडी काडून घेण्यात यावे.
- 6) केंद्र / राज्य- शासन द्वारे बालवाडी मुलांना आहार योजना चालू करण्यात यावी. (जेणेकरून मुले खाजगी शाळेत जाऊ नये.)
- 7) बी. एम. सी. उमंग app द्वारे मुलांची माहिती रोज भरावी लागत आहे.
- 8) बोनस प्रती वर्षी वेळेवर एक पगार देण्यात यावा. आणि प्राथमिक वर्गाप्रमाणे माह" मे" महिन्याचा पगार शिक्षिका व मदतनीस यांना देण्यात यावा.
0 टिप्पण्या