भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने "बौद्ध समाज संवाद दौऱ्याचे" आयोजन करण्यात आले होते. हा दौरा विशेषतः मुंबई विभागातील विविध भागांमध्ये राबवण्यात आला, ज्यामध्ये बौद्ध समाजाचे सामाजिक, राजकीय आणि धार्मिक प्रश्न यावर सखोल चर्चा व संवाद साधण्यात आला. या संवाद दौऱ्याचा समारोपीय मेळावा दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी गोवंडी पूर्व मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. आगामी काळात बौद्ध समाजाच्या हक्कांसाठी आणि प्रश्न सोडवण्यासाठी लढा उभारण्याच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वाचा आहे. मी मुंबई, ठाणे, रायगड व पालघर जिल्हयातील व तालूक्यातील वंचित बहुजन आघाडी च्या सर्व आघाड्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेषत: मुंबई, नवी मुंबई, मिरा भाईंदर, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी, वसई विरार, पनवेल या महानगर क्षेत्रातील बौद्ध समाजाच्या भावा - बहिणींसह, विद्यार्थी - युवकांसह या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करतो. बौद्ध समाजाच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक अधिकार आणि स्वतंत्र्यावर विचार मंथन करण्यासाठी मोठ्या संख्येत सहभागी व्हा !
दिनांक : 🗓️12 एप्रिल 2025
वेळ : 🕕सायं 06:00. वा
स्थळ : 📍महावीर एज्युकेशन ट्रस्ट शहा अँड अँकर कच्छी पॉलिटेक्निक महानगरपालिका मैदान शताब्दी रुग्णालयाच्या समोर गोवंडी पूर्व मुंबई.
#बौद्ध_समाज_संवाद_दौरा #भव्य_समारोप_मेळावा
- सुरेंद्र बनसोडे
- कार्यालय प्रतिनिधी
- वंचित बहुजन आघाडी
- 9833057645/ 8779846944
0 टिप्पण्या