कक्कया समाज सार्वजनिक गणेशोत्सव, धारावी च्या वतीने दि. १० मे २०२५ रोजी कक्कया समाजातील वधू-वरांसाठी मोफत सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन श्री गणेश विद्या मंदिर हायस्कुल, संत कक्कया मार्ग, धारावी, मुंबई - ४०००१७ येथे करण्यात आले आहे.या सामुहिक विवाह सोहळ्यासाठी नांव नोंदणी सुरु करण्यात आली आहे.हा विवाह सोहळा मोफत असून यावेळी सामुहिक विवाह सोहळ्यात विवाह होणाऱ्या वधू-वरांस संस्थेमार्फत १) वधू-वरांस पोशाख २) संसार उपयोगी सामुग्री ३) सोन्याचे मनीमंगळसूत्र ४) संस्थेचे विवाह प्रमाणपत्र ५) सामुहिक विवाह सोहळ्यात विवाह होणाऱ्या मुंबई बाहेरुन येणाऱ्या वधु व वरांची तसेच नातेवाईकांची राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. ६) ग्रामीण भागातील गरीब व गरजू वधू-वरांस मुंबईला येण्याकरिता प्रवास खर्च देण्यात येणार आहे.

समाजातील इच्छुक वधू व वर आणि त्यांचे पालक यांनी विवाह इच्छुक वधू-वरांची जोडीदार निवड झालेली असल्यास त्यांना आवाहन करण्यात येत आहे की,आपण आपल्या मुला-मुलींचे विवाह आमच्या संस्थेच्या वतीने होऊ घातलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात नाव नोंदणी करावी व त्या सामुहिक विवाह सोहळा कार्यक्रमाची शोभा वाढवावी. तसेच आपल्या नात्यातील, परिचयातील महितीतील गावखेडा, तालुका, जिल्हा पातळीवर सर्वापर्यंत या सामूहिक विवाह सोहळ्याची माहिती पोहचवावी व जास्तीत जास्त जोडप्यांचा विवाह या सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होण्याकरीता माहिती प्रसारित करुन विवाह ठरलेल्या लोकांची नोंद करण्यास मदत करावी.असे कार्यक्रमाचे आयोजक तथा निमंत्रक हेमंत व्हटकर (अध्यक्ष) मो.९९८७९८६१६१, परशुराम खंदारे (उपाध्यक्ष) मार्गदर्शक : विजय धर्मा पोळ-८६५२३६९२५९, मसाजी श्रीपती होटकर( सचिव), मो. ९०८२६६९९५५, किरण व्हटकर (उपाध्यक्ष) , मंगेश खरटमोल (खजिनदार) मो. ८१६९९६१४९८, मनोहर तायप्पा सोनवणे (कार्याध्यक्ष)-९८६७७०८३६१, बाबुराव कावळे (उपसचिव) किशोरकुमार (सुनिल) धों. पोळ मो. ९८६७१७०८८०, रविंद्र महादेव कदम (उपखजिनदार ), किशोर खाटीकमारे मो.९३२१२१२७८६, विजय शिंदे -७०२१२२५९७८ यांनी कळविले आहे.
0 टिप्पण्या