Top Post Ad

परभणी-शेळगावात जातीवरून छळ करत विद्यार्थ्याला मारहाण

 गुन्हा नोंदवण्यास पोलिसांची टाळाटाळ

रामेश्वर उफाडे सोनपेठ येथील कै. रमेश वरपूडकर महाविद्यालयात रामेश्वर मधूकर उफाडे (वय १७) हा अकरावीत (विज्ञान शाखेत) शिक्षण घेत आहे. त्याचा काही विद्यार्थी सातत्याने जातीवरून छळ करीत होते. दररोजच्या या त्रासाला कंटाळून २४ मार्च रोजी रामेश्वरने त्यांना जाब विचारला.  सारंग खरात (दुधगाव), ओमकार शिंदे (रा. गवळी पिंपरी), विश्वजीत जाधव (रा.गवळी), आणि एक अज्ञात युवक अशा चौघांनी काठीने आणि फायटरने जबर मारहाण केली. त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत रामेश्वरला इतर मित्रांनी पोलीस स्टेशनला नेले. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही, असा आरोप गणपत भिसे यांनी केला आहे.

दरम्यान, कॉम्रेड गणपत भिसे यांनी लाल सेनेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड एल. डी. कदम यांना सरकारी दवाखान्यात जावून जखमी रामेश्वरची भेट घ्यावी अशी विनंती केल्यावरून एल. डी कदम आणि इतर लाला सैनिक दवाखान्यात गेले, त्यांनी नातेवाईकांना धीर दिला. त्यानंतर नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी ठाण मांडल्यानंतर सोनपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे तपास करत आहेत. 


पुरोगामी महाराष्ट्रात दलित अत्याचाराचा घटना थांबायचं नाव घेत नाहीत...परभणीची घटना अत्यंत गंभीर व माणूसकीला काळीमा फासणारी आहे. या तरुणावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून दलित, मागास व अल्पसंख्याक समाजावरील अत्याचार वाढले आहेत. या समाज घटकांवर हल्ले होत असताना सरकारकडून कठोर पावले उचलली जात नाहीत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याकडे गांभिर्याने लक्ष देऊन भितीच्या सावटाखाली जगत असलेल्या या घटकाला आश्वस्त करण्याची गरज आहे. आपल्या महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. पण सरकारला याचे काही गांभीर्य आहे असे दिसत नाही. .......काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस.*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com