Top Post Ad

शोध पत्रकारिते मधील शेवटचा पत्रकार निरंजन टकलें सर...त्यांच्यावरही गुन्हा दाखल

 आताच्या काळातील सर्वात निर्भीड पत्रकार निरंजन टकले यांच्यावर संभाजीनगर येथे गुन्हा दाखल झालाय. संभाजीनगर मध्ये झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनात निरंजन टकले यांनी केलेल्या भाषणावरून त्यांच्याविरोधात हे गुन्हे दाखल झाले आहेत. या केसवरून निरंजन टकले खोटारडे पत्रकार वगैरे अपप्रचार भक्तमंडळी करत आहेत. आपण हे प्रकरण पूर्णपणे समजून घेऊ. 

  •      मला मिळालेली माहिती अशी की, निरंजन टाकलेंच्या भाषणातील पुढील तीन मुद्यांना घेऊन घेऊन हे गुन्हे दाखल झालेत. 
  • १) सर्वोच्च न्यायालयाचे 'सत्यमेव जयते' हे ब्रीदवाक्य या सरकारने बदलून 'यतो धर्मस्ततो जय:' असे केले आहे. 
  • २) देवेंद्र फडणवीस हे खोटारडे मुख्यमंत्री आहेत. 
  • ३) अमेरिकेतील रॉबर्ट डीनेरो नावाचा अभिनेता डोनाल्ड ट्रम्पला 'ऍसहोल' म्हणाला, पण माझ्या मनात असूनही मी मोदींना असं म्हणू शकत नाही. 
  •    ज्यांनी भाषण ऐकले नाही त्यांच्यासाठी लिंक खालीलप्रमाणे- https://youtu.be/M96er0pk6Ds?si=dajv3Bk1m4dwoB93

 

   आता आधी पहिला मुद्दा बघू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी नवी दिल्ली येथे झालेल्या दोन दिवसांच्या जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेत सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन ध्वजाचे आणि चिन्हाचे अनावरण केले. नव्याने अनावरण केलेल्या ध्वजात भारताच्या कायदेशीर आणि सांस्कृतिक वारशाचे केंद्रबिंदू असलेले प्रतीक आहेत: अशोक चक्र, सर्वोच्च न्यायालयाची इमारत आणि भारतीय संविधान. नवीन सर्वोच्च न्यायालयाचा ध्वज निळ्या रंगाचा आहे. चिन्हावर 'भारताचे सर्वोच्च न्यायालय' आणि ' यतो धर्मस्ततो जयः ' (देवनागरी लिपीत) लिहिलेले आहे. अशा बातम्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि मा.सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या फोटोसह दै.सकाळ वृत्तपत्र व हिंदुस्थान टाइम्स ने एक सप्टेंबर ला प्रकाशित केल्या. (दोन्ही बातम्यांची लिंक खाली दिली आहे तुम्ही चेक करू शकता.) 


   दुसरा मुद्दा बघू. "देवेंद्र फडणवीस हे खोटारडे मुख्यमंत्री आहेत" या वाक्यात काय चूक आहे? याचे पुरावे मागाल तर अनेक पुरावे त्यांचीच जुनी-नवी भाषणे तुम्ही ऐकली की तुम्हाला सहज मिळतात. उदाहरण द्यायचं झालं तर  "एकदा सत्तेशीवाय राहू पण राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती नाही, नाही म्हणजे नाही.. दुसरं उदाहरण, "आम्ही सत्तेत आलो की अजितदादा जेल में चक्की पिसिंग अँड पिसिंग. तिसरं उदाहरण "आम्हाला सत्ता द्या एका दिवसात मराठ्यांना आरक्षण देतो." आता ही उदाहरणे तुम्ही म्हणाल जुनी झाली, आताचं काय ते बोला? तर "परभणी च्या सूर्यवंशी यांनी हत्या पोलिसांच्या मारहाणीमुळे झाली नाही, त्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहेत, ते व्हिडीओ अनएडिटेड आहेत, त्यात कुठेही पोलीस मारहाण करताना दिसत नाहीत" असे ते विधानसभेच्या सभागृहात आता या टर्म ला मुख्यमंत्री असताना धादांत खोटे बोललेले आहेत. त्यानंतर पोस्टमार्टम अहवालात आणि न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात पोलीस मारहाणीमुळेच हा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मग फडणवीस इतक्या आत्मविश्वासाने इतकं खोटं का बोलले? बरं खोटं बोलले तरी त्यांना खोटारडे म्हणू शकत नाही हा कुठला कायदा? निवडून आलो की लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हणणारे फडणवीस खोटें पडले नाहीत काय? नितेश राणे जाहीरपणे पोलिसांचे थोबडे सुजवतो म्हणतात, बायल्या उद्धव ठाकरे म्हणतात पण कुणाला त्यात गुन्हा दाखल करावासा वाटत नाही. निलेश राणे यांनी तर पातळीच सोडून भास्कर जाधव यांच्याबद्दल "तुझ्या आईला घोडा लावला, तुझ्या कुटुंबावर कोण कोण चढला, साला चिखलात लोळणारे डुक्कर" असं काय काय बोलला. पण विरोधकांना काहीही बोललं तरी ते यांचे संस्कार-संस्कृती पण सत्ताधाऱ्यांना फक्त खोटारडे बोललं तरी गुन्हे दाखल करणार. 

       राहिला तिसरा मुद्दा, की निरंजन टकले आपल्या भाषणात बोलले की ल, "अमेरिकेतील रॉबर्ट डीनेरो नावाच्या अभिनेत्याने एका भाषणादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ऍसहोल म्हंटले. पण मला कितीही वाटलं की मोदीजी ऍसहोल आहेत तरी मला तसे म्हणता येत नाही ना,इतके अभिव्यक्ती स्वातंत्र्य इथे नाही" या गोष्टीवर जर गुन्हा दाखल होत असेल तर आपण स्पष्टपणे कबुलच करतोय की खरंच आपल्या देशात अमेरिकेईतके अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. 

     निरंजन टकले हे सध्याच्या अतिशय कठीण काळात गेल्या अनेक वर्षांपासून अगदी निर्भीडपणे केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या ध्येय-धोरणांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवत आहेत. या अघोषित आणीबाणी विरोधात लढत आहेत. अमित शाह यांच्या विरोधातील केस चालवणारे सीबीआय जज लोया यांच्या मृत्यू प्रकरणात त्यांनी शोधपत्रकारिता करून अत्यंत खळबळजनक सत्य शोधून काढले आहे. पाकिस्तानात जाऊन तेथील सरकारविरोधात कायदेशीर लढा देऊन तेथून 59 भारतीय कैदी सोडवून आणले आहेत. गुजरातमध्ये तीन महिने रफिक कुरेशी नावाने राहून बजरंग दल वाले कसा गायीच्या नावाने धंदा करतात हे पुराव्यानिशी शोधून काढले आहे. यादरम्यान त्यांच्यावर अनेकदा हल्ले झाले, त्यांच्या कुटुंबियांवर हल्ल्याचे प्रयत्न झाले पण ते थांबले नाहीत. अशा व्यक्तीवर सरकारवर टीका केली म्हणून गुन्हा दाखल होणे किती संतापजनक आहे?

      हे भाजप पक्षाचे नेते सत्तेवर येण्याआधी गेली 60-65 वर्षे सत्ताधाऱ्यांवर सातत्याने टिकाच तर करत होते. काही ठिकाणी तर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी टीका केली आहे. 65 वर्षे टीका केली पण स्वतःवर टीका झाली की हे चेकाळतात. जे लोक निरंजन टकले, कुमार कामरा यांच्याविरोधात गुन्हे दाखल करतात त्यांना माझे प्रश्न आहेत की, भावांनो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तो प्रशांत कोरटकर नावाचा भामटा अत्यंत वाईट शब्दात बोलला रे, माँसाहेब जिजाउंचे चरित्रहनन केले, तो  राहुल सोलापूरकर शिवरायांबद्दल -डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबद्दल चुकीचे बोलला, तो भिडे महात्मा फुलेंना देशद्रोही म्हणाला, भडवा म्हणाला तेव्हा तू कुठे लपला होतास भावा? त्यांच्यावर तुम्हाला गुन्हा दाखल का करावासा वाटला नाही? या महापुरुषांचा अपमान सहन होतो पण आपल्या नेत्याविरोधात एक शब्द सहन होत नाही?  म्हणजे तुमच्या नजरेत मोदीजी, फडणवीस-शिंदे हे लोकं छत्रपती शिवरायांपेक्षा, महात्मा फुलेंपेक्षा, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा महान झालेत, मोठे झालेत असा त्याचा स्पष्ट अर्थ होतो. यानिमित्ताने एकदा आपल्या खऱ्या अस्मिता तपासण्याची गरज आहे.

     निरंजन टकले या कठीण काळात नागरिकांसाठी आशेचा किरण आहेत. लढण्याची प्रेरणा आहेत.  तुम्हाला काय करायचं ते करा पण एक याद राखा निरंजन टकले एकटे नाहीत आम्ही सारे कोणत्याही परिस्थितीत त्यांच्यासोबत आहोत. 
 शेवटी 
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है
देखना है जोर कितना बाजू ए कातील में है.. 

  • -चंद्रकांत झटाले, अकोला 
  • 7769886666


*( मीडिया विकलेली आहे पत्रकार विकले आहेत असे म्हणायला खूप सोपे असते. पण जेव्हा एखादा पत्रकार आपल्या जीवाची आपल्या कुटुंबाची परवा न करता सत्य सर्वांसमोर आणतो आणि त्यासाठी जाहीरपणे* *सभासमेलन यातून भाषण देतो ते मुद्दे लोकांना समजावून सांगतो यासाठी जेव्हा लढत असतो त्यावेळेस त्याला त्याच्या विरोधातील लोक आहेत ते कोणत्या ना कोणत्या गुन्हा दाखल करतात..अशाच वेळी हे संविधान वादी पत्रकारांना खरी गरज असते त्यावेळी किमान आपण त्यांना सपोर्ट केलाच पाहिजे*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com