Top Post Ad

छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार

महाराष्ट्र राज्यशासनाने यंदापासून "छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत" हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलाय. राज्यातील नागरिकांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून असा पुरस्कार देणं याला विरोध असण्याचं कारण नाही..तसंच संभाजी महाराज यांना कवितेतील जाण होती त्यामुळं त्यांच्या नावानं समाजाला प्रेरणा देणाऱ्या कवितेला/गीताला पुरस्काराने सन्मानित करणं यात देखिल वावगं असं काही नसलं तरी कवी कलश यांच्या नावानं हा पुरस्कार देणं अधिक संयुक्तिक ठरलं असतं....असो... परंतु अत्यंत तिरस्करणीय बाब म्हणजे, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं जाहीर या पुरस्काराची नांदी सावरकराच्या अन ते देखिल, _"अनादी मी अनंत मी..."_ या गीताला पुरस्कार देवून केली गेलीय. 


 छत्रपती शिवाजी महाराजांनी, आपल्या सैनिकांनी पकडून आणलेल्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आपल्या आईची उपमा देत 'चोळी-बांगडी' करून पुन्हा इज्जतीनं परत पाठविलं. त्यांच्या या कृतीची जगभरात प्रशंसा होत आलीय. मात्र, सावरकरानी याची खिल्ली उडवत, 'शिवाजी महाराजांनी सुभेदाराच्या सुनेला परत पाठविण्याऐवजी आपल्याकडेच ठेवून घेऊन आपल्या एखाद्या शिपाया वा हुजऱ्या करवी तीच्यापोटी पुत्रप्राप्ती करुन घ्यायची जो स्वराज्याच्या कामी, सैनिक म्हणून, आला असता अशी विकृत मांडणी केलीय...

तसंच...संभाजी महाराज यांना, 'शूर पण नाकर्ता, रागीट, दारुड्या व स्त्रीलंपट (मदिरा व मदिराक्षी यांच्याविषयी अत्यंत आसक्त) या दुर्गुणांनी भरलेला, नेतृत्व करण्यास वा राष्ट्राची धुरा वाहण्यास ना-लायक (अत्यंत अयोग्य) असं वर्णित केलंय...शिवाजी महाराज व संभाजी महाराज या दोघाही छत्रपतींबद्दल असली गरळ ओकणाऱ्या सावरकराच्या कवितेला छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं सन्मानित करण्यात यावं, ते ही रयतेच्या पैश्यानं ही ठरवुन केलेली बदमाशीच होय..!

विशेष म्हणजे, निम्म्याहून अधिक सावरकर भक्तांना ठावूक ही नसलेलं सावरकराचे _"अनादी मी अनंत मी..."_ हे गीत खुद्द सावरकरालाही प्रेरणा देवु शकलं नाही कारण हे गीत लिहिल्यानंतर अवघ्या 4-6 महिन्यांतच सावरकरानी इंग्रजांच्या चरणी आपला पहिला 'माफीनामा' अर्पित केला..तरीही ..सावरकराचे सदर गीत/कविता हे कुठल्याही प्रकारे 'प्रेरणा' गीत मुळीच ठरत नसतांनाही त्या गीताला पहिला "छत्रपती संभाजी महाराज प्रेरणा गीत" हे बिरूद चिकटविण्यात आलंय...

कहर म्हणजे ...हा पुरस्कार जाहीर करण्यासाठी ॲड. आशिष शेलार हे राज्याचे 'सांस्कृतिक कार्य' मंत्री या नात्यानं चक्क मार्सेलीस बंदर, फ्रांसला पोहोचले अन तिकडनं पुरस्कार जाहीर केला...का तर म्हणे ..याच ठिकाणाहून,_"...ब्रिटिशांच्या ताब्यातून सुटका करुन घेऊन आपल्या देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचा आपला लढा चालूच ठेवण्यासाठी समुद्रात उडी मारली ... 60 यार्ड पोहून किनारा गाठला.. पण पकडले गेले .. त्यावेळी  'अनादी मी.. अनंत मी' या काव्यपंक्ती स्फुरल्या..."_

आता ...ॲड. आशिष शेलार नुसतेच 'सांस्कृतिक कार्य' मंत्री नसून 'माहिती तंत्रज्ञान' खातं ही सांभाळत आहेत.. त्यामुळं थोडंसं तंत्रज्ञान वापरून त्यांनी मार्सेलीस बंदरालगत पाण्यात सावरकरानी मारलेल्या उडीची माहिती घेतली असती तर त्यांच्या सहज लक्षात आलं असतं की सावरकरानी जेंव्हा बोटीतून उडी मारली तेंव्हा ती बोट किनाऱ्याला लागलेली होती.. अन बोटीतून पळून जाण्याचा सावरकराचा एकमेव उद्देश्य हा किनाऱ्यावर असलेल्या फ्रान्स पोलिसांना शरण जावून फ्रान्स कायद्याचं संरक्षण मिळविण्याचा होता. पण फ्रान्स पोलिसांनी हात झटकत सावरकराला पुनः इंग्रज पोलिसांच्या ताब्यात दिलं अन बेत फसला..

आता शेलार अन बाकी सावरकर भक्त म्हणतील हे कोणी सांगितलं. तर त्यांच्या माहितीसाठी, 1926 साली 'चित्रगुप्त' नावाच्या व्यक्तीनं सावरकराचं बालपणापासून ते मार्सेलीस उडी (1911) पर्यंत चरित्र लिहिलंय. त्यात याचा स्पष्टं उल्लेख आहे की बोट किनाऱ्यावर लागलेली होती अन सावरकरानी पाण्यात उडी कोणत्या उद्धेश्यानं मारली वगैरे वगैरे... शेलार म्हणतात तसं, _"समुद्रात 60 यार्ड पोहत सावरकर किनाऱ्याला लागले... पारतंत्र्यातून देशाला वाचविण्यासाठी..वगैरे वगैरे"_, असं काहीच लिहिलेलं नाही सदर सावरकर चरित्रात...

या अर्थानं..मंगेशकर-फडके सारख्या भटांच्या कुटुंबीय त्रिखंडात गाजलेली सावरकराची सदर उडी म्हणजे खरंतर निव्वळ एक 'बेडूक उडी' मात्र...अन...अशा त्या 'बेडूक उडीचं' फुकाचं गौरवांकन करण्यासाठीच सत्ताधीशांनी सावरकराच्या _'अनादी मी.. अनंत मी..'_ गीताला छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा पुरस्कार देण्याची बदमाशी केलीय...

आता....लेखी स्वरूपात 40 करोड ची प्रॉपर्टी असलेल्या व 2019 ते 2024 या पाच वर्षात स्वतः 4 करोड 34 लाख व पत्नीने तब्बल 10 करोड रुपये कमावले असल्यानं (संदर्भ: myneta.info), ॲड. आशिष शेलार सहकुटुंब महिन्यातून डझनभर खेपा मार्सेलीसला स्वखर्चानं आरामात घालत असतीलच म्हणा, सावरकर प्रेमापोटी. अन ही त्यातलीच एक स्वतःचा पैश्याने त्यांनी केलेली ट्रीप असावी...की ..या पुरस्काराच्या निमित्ताने, 'सांस्कृतिक कार्य' मंत्री ॲड आशिष शेलारनी सरकारी तिजोरीतून पैसे घेऊन मार्सेलीस किनाऱ्यावर अवघ्या 4 मिनिटाचा व्हिडिओ काढून मस्त फ्रान्स सह युरोप पाहणी दौरा उरकून घेण्याची बदमाशी केलीय...

संशयाला भरपूर वाव आहे कारण यांच्या आदर्श सावरकरानेच तर स्वतःचा उदो उदो करत, स्वतःला 'वीर' साबित करण्यासाठी, 'चित्रगुप्त' या टोपणनावानं आपलं चरित्र लिहिलं होतं.  सावरकराचे 'पहिलं चरित्र' म्हणून इतिहासात भटूकड्यांनी गाजवलेल्या या कहाणीचा भांडाफोड तब्बल 60 वर्षांनंतर, 1986 साली या चरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत केला गेलाय...म्हणजेच....स्वतःचा, अजिबात नसलेला, मोठेपणा 'चित्रगुप्त' या भलत्याच नावानं मांडण्याची बदमाशी सावरकरानीच केली होती अन आयुष्यभर ती लपवुन ही ठेवली.  सावरकराच्या बदमाशीचा जाहीर भांडाफोड होवूनही भटूकडे सत्ताधीश, सावरकराची बदमाशी 'शौर्य' म्हणून, 'येन केन प्रकारेण' सर्वसामान्यांच्या मानसिकतेवर लादत असतात...सावरकराच्या _'अनादी मी.. अनंत मी'_ या सुमार कवितेला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार देणं हा त्यातलाच एक भाग...!

मिलिंद भवार_पँथर्स_ 9833830029

01 मार्च 2025

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com