महिला परिचराना किमान वेतन २१००० (एकविस हजार) देण्यात यावे. महिला परिचराना नियमित सेवेत कायन स्वरुपी करावे. महिला परिचराना पेशन योजना व अपघाती विमा योजना लागू करावी. दरवर्षी गणवेष व भाऊबिज (दिवाळी बोनस) देण्यात यावे. कार्यक्षेत्रात प्रवास भत्ता देण्यात यावा. इत्यादी मागण्यांचे निवेदन संभाजी सेना परिचर महिला आघाडीच्या वतीने आरोग्य सचिव व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटंकर यांनी तात्काळ मुख्य सचिवांना पगार वाढीसाठी उचित कार्यवाही करावी असे पत्र दिले आहे. पगार वाढीसाठी आरोग्यमंत्री आग्रही आहेत. तसे आदेशही त्यांनी दिले आहेत. हे संभाजी सेनेच्या परिचर आघाडीचे यश आहे. यावेळी पत्र देताना संभाजी सेना प्रदेश कार्याध्यक्ष रविकुमार सोडतकर, प्रदेश अध्यक्षा-श्रीमती कल्पनाताई महाडिक, प्रदेश कार्याध्यक्षा-सौ. रेखाताई गोविंद पाटील, आदी उपस्थित होते.
मागील ४० वर्षापासून जिल्हापरिषद आरोग्य सेवेत राज्यातील १०३७३ महिला परिचर काम करीत आहेत. अर्धेवेळ ठरवून त्यांच्याकडून फक्त महिना तीन हजार रुपये पगार ठरवून संपूर्ण दिवसभर काम करून घेतल्या जात आहे. यामुळे या परिचरांना त्वरीत २१,००० रुपये पगार वाढ करावी या प्रमुख मागणीकरिता मुंबईतील आझाद मैदानात ठिय्या आंदोलन करीत आहेत. मात्र अधिवेशन सुरू असूनही या महिलांकडे सरकारने अद्याप लक्ष दिले नसल्याने संताप व्यक्त होत आहे. लाडक्या बहिणींच्या समस्या मात्र या भावाना दिसत नाहीत. आमच्या हक्काचे पैसे देण्यास नकार देण्यात येत आहे मात्र तुटपुंजी रक्कम घेऊन संसाराचा गाडा ओढायचा कसा असा सवाल आता या महिलांनी सरकारला केला आहे. यावर येत्या दोन दिवसात काही निर्णय न झाल्यास संभाजी सेना आपल्या मार्गाने या महिलांना न्याय मिळवून देईल असा इशारा रविकुमार सोडतकर यांनी दिला होता. मात्र प्रशासनाने याबाबत सकारात्मक विचार करून लवकरच याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने परिचारिका महिलावर्गामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या