या देशात भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्व धर्माना धर्म स्वातंत्र्य असताना बौद्धांच्या बाबतीत वेगळा न्याय का ? बोधगया महाबोधी महाविहार मुक्त करावे. महाबोधी महाविहार कायदा बी. टी. अॅक्ट १९४९ रद्द करावा आणि बोधगया येथील महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात द्यावे. या मागणीकरिता भिक्खू संघ मागील महिन्यापासून आंदोलन करीत आहेत. परंतु अद्याप पर्यंत बिहार सरकार किंवा केंद्र सरकार कुठलाही निर्णय घेण्यास अथवा हस्तक्षेप करण्यास तयार नाहीत. उलट आंदोलन करणाऱ्या भिक्खू संघाला नाहक त्रास देण्यात येत आहे. अचानक रात्री आंदोलनकर्त्यांची धरकपड करून आंदोलनकर्त्यांना दुर ठिकाणी नेऊन सोडले. त्यानंतर आता धरणे आंदोलन करण्याच्या ठिकाणी पाणी बंद करण्यात आले आहे. अशा तऱ्हेने येथील प्रशासन हे आंदोलन दडपण्याचे काम करीत आहे. याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातून ठिकठिकाणी उठाव होत आहे.
बिहार सरकार आणि केंद्र सरकारला याचा याचा जाब विचारण्यासाठी ठाण्यातील विविध संस्था, संघटना तसेच सामाजिक, राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणारे अनुयायी यांच्यासह समस्त बौद्ध समाजाच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्याकरिता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 16 ते 26 एप्रिल दरम्यान दहा दिवसीय साखळी उपोषण व निषेध निदर्शने आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील लाखो बौद्ध अनुयायांच्या वतीने २७ एप्रिल रोजी ठाणे स्टेशन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य शांतता महारॅली आयोजन करणे.
तसेच 12 में रोजी बोधगया येथे बुद्ध पौर्णिमा महोत्सव साजरा करण्यासाठी, ठाणे जिल्ह्यातून जास्तीत जास्त लोक गयाला पोहोचू शकतील, म्हणून 10/15 रेल्वे बोगी बुकिंग करणे. तसेच महाबोधी महाविहार मुक्तीसाठी संसदेत भीमगर्जना करणारे खासदार चंद्रशेखरजी आझाद यांच्या प्रमुख उपस्थितीत सम्राट अशोक जयंतीनिमित्त ५ एप्रिल रोजी कल्याणमध्ये भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आदी विविध विषयांवर तयारी आणि प्रचारासाठी आज २३ मार्च रोजी ठाणे येथील विश्रामगृहावर जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये भदंत गौतमरत्न थेरो यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी ठाणे शहर व जिल्ह्यातील अनेक बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ठाण्यातील एकूण आंदोलनाची दिशा समस्त बौद्ध समाजापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने रविवार दिनांक ३० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता ठाण्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड येथील बुद्ध विहारात समस्त बौद्ध समाजाचा जाहिर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तरी या मेळाव्याला ठाण्यातील प्रत्येक बौद्ध उपासक-उपासिकांनी हजर रहावे असे आवाहन भदन्त गौतमरत्न यांनी कले आहे.
https://www.facebook.com/watch/?v=960777596242755
0 टिप्पण्या