- घाटकोपरची भाषा गुजराती आहे. मुंबईत राहणार्या प्रत्येकाला मराठी भाषा बोलता आली पाहिजे असे नाही, अशी मुक्ताफळे उधळणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भय्याजी जोशी यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने आज निषेध करण्यात आला. जोशी यांच्यावर कारवाई करण्यासाठी ठाणे स्टेशन परिसरात सह्यांची मोहीम राबवत तीव्र निदर्शने करण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान करणारे प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांना अटक करण्याची मागणीही यावेळी संतप्त शिवसैनिकांनी राज्य सरकारकडे केली. या आंदोलनात ठाणेकर मराठी माणसाने उत्स्फुर्दपणे सहभाग घेत आर एस एसचे भय्याजी जोशींचा निषेध नोंदवला.
शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे साहेब ,ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहर प्रमुख प्रदीप शिंदे ,उपजिल्हाप्रमुख कृष्णकुमार कोळी , उपशहर प्रमुख सचिन चव्हाण,संजय ब्रीद ,उपशहर प्रमुख वसंत गव्हाळे,विभाग प्रमुख प्रकाश पायरे प्रतीक राणे,प्रशान्त सातपुते ,माया पाटील ,अरविंद भोईर ,जिवाजी कदम ,गिरीश राजे ,राजेंद्र महाडिक माजी नगरसेवक संजय दळवी ,अमोल हिंगे, बिपीन गेहलोत ,सुशांत घोलप ,दत्ता पागवले ,राजेश जाधव,प्रदीप शेडगे ,राम काळे,संजय भोई,राजेश वायाळ ,माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांच्यासह उपजिल्हा संघटिका आकांक्षा राणे , शहर संघटिका वैशाली शिंदे, प्रमिला भांगे ,मंजिरी धमाले, कांता पाटील,अपर्णा भोईर ,रसिका सुभेदार ,देशपांडे काकूव इतर पुरुष व महिला व युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या