उदयनराजे फक्त एवढं बोला शंभूराजे यांचे पुत्र शाहूच्या पत्नी सकावारबाई इच्छेविरुद्ध शाहूंच्या जळत्या चितेत ढकलून देणाऱ्या नानासाहेब पेशव्याची पुण्यातील समाधी उकडून टाकू फडणवीस तुमचे काय हाल करतो ते पहा.उदयनराजे तुम्ही शिवाजी महाराजांचे वंशज आहात जर तुम्ही प्रशांत कोरडकर आणि राहुल सोलापूरकर महाराजा बद्दल घाणेरडी गरळ ओकला त्यावेळेस तुम्ही खडसावला असता तर महाराष्ट्राने तुम्हाला डोक्यावर घेतले असते.गृहमंत्री फडणवीस यांच्या खात्याच्या निष्क्रितेमुळे संतोष देशमुख यांचा निर्गुण हत्या झाली. संतोष देशमुख यांची हत्या करीत असताना चे फोटो प्रसारमाध्यमावर प्रसारित झाले. ज्याला हृदय आहे असे असंख्य माणसाच्या डोळ्यात पाणी आलेले होते .फडणवीसच्या गृह खात्याबद्दल लोकांना चीड आली होती.
भाजप आणि फडणवीस सरकारची थू थू होत असताना धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. अबू आझमी यांनी औरंगजेब बद्दल नुसतं बोलले तर भाजप आरएसएसच्या दावणीला बांधलेले तुम्ही औरंगजेबच्या कबरी बद्दल बोललात ही तुमची लाचारी होती. तुम्हाला औरंगजेब चा राग आहे तर शंभूपुत्र छत्रपती शाहू यांचे दिनांक 15 डिसेंबर 1749 रोजी शाहू महाराज यांचे निधन झाले. त्यावेळी पुण्यात बाळाजी बाजीराव (नानासाहेब) हा पेशवा होता. या पेशव्याने श्री शाहू महाराजांच्या पत्नी सकवारबाई यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने शाहू महाराजांच्या जळत्या चितेत ढकलून दिले त्यांचा इतिहासही तुम्हाला माहित आहे की नाही याची मला शंका आहे. (संदर्भ- रामचंद्र नारायण लाड - मराठ्यांचे दासीपुत्र अर्थात पायपोस किंमतीचे पेशवे. पान २६.) "नानासाहेबांनी राज पत्नीशी (सकवारबाई) केलेला कावा खरोखरीच आम्हा ब्राह्मणांस खाली पहावयास लावणारा आहे" संदर्भ - कै.प्रो. भागवत (उध्दार) पृ.४९.
"शाहूची पट्टराणी सकवार बाई ही शिवाजीच्या भोसले राजघराण्याला शोभेशी राजकारणी मुत्सद्दीन होती. शाहूच्या मागे ती पेशव्याच्या कारस्थानाला बळी पडली नसती तर मराठ्यांच्या इतिहासाला काही निराळेच रुप येण्याचा संभव होता, परंतु तो संभव कधी संभवूच नये म्हणून ज्याची रात्रंदिवस धडपड तो नानासाहेब थोडाच स्वस्थ बसणार? त्याने शास्त्र पुराणांचा आधार दाखवून राणीच्या भावाला नरकप्राप्तीच्या पवित्र भीतीने वश करून घेऊन त्याच्याच हाताने सकवारबाईला शाहू राजाच्या पादुकांच्या सरणावर जिवंत जाळविली.
(प्रबोधनकार के सी ठाकरे कृत ग्रामण्याचा इतिहास. पृष्ठ 161)
नानासाहेब पेशव्याची समाधी पुण्यातील मुठा नदीच्या काठावर पुना हॉस्पिटलच्या मागील बाजूस आहे. थोरले शाहू छत्रपतींच्या पत्नीला क्रूरपणे जिवंत जाळणाऱ्या या नीच पेशव्याची समाधी उध्वस्त करणार आहोत एवढे उद्गगार उदयनराजे तुम्ही काढा पहा मोहन भागवत ची आरएसएस तुमचे काय हाल करतात ते. समाधी ब्राह्मणवादी पेशव्यांची असो अफजलखानाची असो किंवा औरंगजेबची असो हे सर्व ऐतिहासिक स्मारक आहेत त्यांना हात लावता येणार नाही.उदयनराजे तुमच्या पूर्वजांच्या शौर्याच्या इतिहासाला तुमच्याकडे किंमत नसेल आम्ही त्यासाठी जागृत राहुत. स्वराज्याचे संकल्प शहाजीराजे ,स्वराज्य निर्मितीच्या जनक मा जिजाऊ ,छत्रपती शिवाजी महाराज ,संभाजी महाराज , राजाराम महाराज ,ताराराणी साहेब यांच्या विचाराच्या वार्षाला आम्ही जतन करू एवढे मात्र नक्की. तुम्ही मात्र ब्राह्मणी पेशवाईचे जेवणा ओळीमध्ये तुमच्या ताटात दुरून वाढलेलं सोहळ्यातलं खा.
जय हिंद जय भारत जय संविधान जय काँग्रेस .
हरिभाऊ सोळंके
सादोळा ता माजलगाव जि बीड
0 टिप्पण्या