Top Post Ad

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन विशाल शांतता महारैलीसाठी जनजागृती मेळावा

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन विशाल शांतता महारैलीसाठी जनजागृती मेळावा. रविवार दि. ३० मार्च रोजी, सायं. ५ वाजता धम्म संस्कार केंद्र, बुद्ध विहार, डॉ. आंबेडकर रोड, सिविल हॉस्पिटल जवळ, ठाणे पश्चिम येथे आयोजित करण्यात आला आहे.  संपूर्ण भारतभर तीव्र गतीने चालू असलेले महाबोधि महाविहार मुक्ती आंदोलन ठाणे जिल्ह्यामध्ये व्यापक स्वरूपात राबवून तमाम बौध्दांचे न्यायिक मागणी केंद्र सरकार व बिहार सरकार पर्यंत पोहोचविण्यासाठी भदंत गौतमरत्न थेरो (मो. ९९८७४८०३९२) यांच्या नेतृत्वात ठाणे कोर्ट नाका येथे दहा दिवस साखळी उपोषण (१६ ते २६ एप्रिल) व लाखो धम्म अनुयायी यांच्या उपस्थितीत विशाल शांतता महारॅली (२७ एप्रिल) आयोजित करण्याचे सर्वानुमते ठरविले आहे. सदर आंदोलन नियोजनबध्द मागीने चालविण्यासाठी कोर कमिटीची निर्मिती चालू आहे. 

 


 अखिल बौध्दांचे धार्मिक अधिकार हनन करण्याच्या हेतूने तत्कालीन केंद्र सरकार व बिहार सरकारने संगणमत करून १९४९ साली बनवलेले काळा कानून बोधगया टेम्पल अॅक्ट संविधानातील आर्टिकल 13, 14, 15, 25, 26, 29, 49 आणि 51A(f) च्या आधारे त्वरित रद्द करावे आणि बौध्द धर्मीयांचे सर्वोच्च श्रध्दास्थान महाबोधि महाविहाराचे संपूर्ण प्रबंधन बौध्दांच्या हाती द्यावे. या हक्काच्या मागणीसाठी नियोजित साखळी उपोषण व महामोर्चाबाबत लोकांमध्ये सखोल माहिती पोहोचविण्याकरिता  ठाणे शहरातील ७० ते ७५ बुध्द विहार व आंबेडकरी विचारांच्या सर्व संघटना-संस्था यांचा 'जनजागृती मेळावा' आयोजित करण्यात आलेला आहे. तरी आपल्या संघटना व बुध्द विहारातील सर्व पदाधिकारी व उपासक-उपासिका यांनी वरील जनजागृती मेळाव्यामध्ये आवर्जून उपस्थित राहून बोध्दगया मुक्ती आंदोलनात आपली  भूमिका नोंदवून ठाणे जिल्ह्याच्या इतिहासात बौध्दांचा सर्वात विशाल महामोर्चा घडवून आणण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे

सदर आंदोलन सफल करण्यासाठी एक-एक बौद्ध बंधू भगिनी व विहार कमिटी-संघटना-संस्था, जयंती कमिटी यांनी दान पारमिता संपादन करावे. दान देऊन स्क्रीन शॉट अजंठा बुद्ध विहार (व्हाट्सअप ग्रुप) किंवा 98195 87898 या नंबर वर पाठवावे.निधी व्यवस्थापनेसाठी प्रकाश कांबळे, सुहास बनसोडे, अनिल कुरणे या तिघांचे निधी व्यवस्थापन उप-कमिटी तयार करण्यात आलेली आहे.

सर्व प्रबुध्द नागरिकांचे एकच ध्येय, महाबोधि महाविहार करायचे आहे मुक्त. अभी नहीं तो कभी नही !


G-pay No. 9987603977


निमंत्रकः बुध्दगया महाबोधि महाविहार मुक्ती आंदोलन समिती- ठाणे जिल्हा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com