Top Post Ad

वृक्ष वल्ली आम्हा नको रे " या भूमिकेमुळे पर्यावरणाचा ऱ्हास

" वृक्ष वल्ली आम्हा सोयरे "  असे जगतगुरु संत तुकाराम महाराज यांनी का सांगितले ? हे माहित असूनही,  विकास करण्याच्या मागे लागलेल्या सरकारने काही लोकांना सोबत घेऊन  " वृक्ष वल्ली आम्हा नको रे " अशी भूमिका घेतली असल्याचे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. वृक्ष वाचवा व ते " जगवा "  अशी भूमिका घेतल्या नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी.एन. कुमार यांनी हिरवळ वाचवण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण कडे याचिका दाखल केल्यानंतरही काही लोकांनी मनमानी करत २०० वृक्ष असणाऱ्या जागेवर विकास करण्याचा मनमानी कारभार सुरू करत खोदकाम सुरू केले आहे. 

 


 समाजसेवक, नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, पालकमंत्री, सर्व संबंधित पर्यावरण विभाग, एमआयडीसी, राज्य व केंद्र सरकार यांना पत्रव्यवहार व मेल करूनही जर काही लोकांची मनमानी होत असेल तर पर्यावरण वाचवा अशी मोहीम सरकार का सुरू ठेवत आहे ? असा सवाल बी.एन. कुमार यांनी केला आहे. पर्यावरणदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या हरित बफर झोनचे संरक्षण करण्यासाठी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली असता, त्यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष वेधून संबंधितांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले. नवी मुंबईतील पावणे या गावात असणाऱ्या या एमआयडीसी च्या जमिनीवर काही लोकांनी हा मनमानी कारभार सुरू केलाअसताना व हिरवळ असणाऱ्या भागाचे संरक्षण करण्यासाठी दाखल केलेल्या याचिका अर्जाची सुनावणी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण येथे प्रलंबित असताना हा सर्व कारभार सुरू असल्याचे बी एन कुमार यांनी सांगितले.

शहरातील दरडोई वृक्ष प्रमाण कमी असल्याबद्दलची आकडेवारी सरकारच माहिती अधिकारात देत आहे. औद्योगिक पट्ट्यातील कारखान्यांची रसायन मिश्रित वेस्ट पाण्यात व हवेत सोडल्या जाणाऱ्या हानिकारक केमिकलच्या दुर्गंधीमुळे नागरिक  फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यातच शहरांचा आडवा उभा विकास करत गगनचुंबी इमारती बांधत होत असलेला विकास व पर्यावरणाकडे होत असलेले सरकारचे दुर्लक्ष पाहून काही लोकांनी सुरू ठेवलेल्या मनमानी कारभारामुळे पर्यावरणाची हानी होत वृक्ष कमी होत आहेत.

स्वच्छ हवा मिळण्याचा घटनेत अधिकार असताना नागरिकांना न्याय मिळत नसल्याने विविध आजारांनी आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत बी एन कुमार यांनी गंभीर चिंता व्यक्त करत न्यायालयाची पायरी चढली आहे. सरकारला विनंती करत नागरिकांसाठी न्याय मागितला आहे. यापूर्वी कुमार यांनी पर्यावरण वाचवा अशी भूमिका घेत शेकडो आंदोलने केली आहेत. आता पुन्हा आंदोलन करूनच न्याय मिळवावा लागेल ?  की,   " वृक्ष वल्ली आम्हाला नको रे " म्हणणाऱ्या काही लोकांना मदत करणार ?  हेच आता पाहावे लागणार आहे. अशी खंत बी एन कुमार यांनी व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com