. इ"या हॉटेलची मालकी स्वतःकडे ठेवण्यात मला काडीचाही रस नाही.... मला इच्छा आहे ती आमच्या देशात असं काही करता येतं हे दाखवण्याची.... इतरांनी पाहून त्यापासून प्रेरणा घ्यावी याची....(ताजमहाल हॉटेल बांधल्यानंतर जमशेदजी टाटांचे उदगार )
परंतु आता काळ बदलला आहे.सर्व समाज जरी सुशिक्षित झाला असला तरी पुढील पिढ्याना नोकरीच्या संधी कमी झाल्या आहेत. देशात नव्हे जगभर बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे नोकरीची मानसिकता संपवून आपल्यामध्ये उद्योजगीय प्रेरणा वाढण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी आज जर हे संस्कार आपण आपल्यावर व पुढील पिढ्यावर निर्माण करू शकलो तर पुढे 20-25 वर्षात आपल्याकडे मोठे उद्योगपती निर्माण होऊ शकतील. या दृष्टीने आजच्या विविध उद्योगपतींचा आदर्श आपल्यावर व पुढील पिढ्यावर होणे आवश्यक आहे. टाटा कुटुंब हे उद्योजगीय धडाडी, नीतिमत्ता व सामाजिक भान व एकूणच सामाजिक विश्वस्त म्हणून आपल्यापुढे आदर्श आहेत. तेव्हा प्रत्येक महिन्यात एक याप्रमाणे 5 भागाचे व्याख्यानमाला आयोजित केली आहे. त्यामध्ये जमशेदजी, दोराब व रतन, जे आर डी व शेवटी रतन टाटा या टाटा परिवारातील उद्योग महर्षीचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक अंगाने अभ्यास करणार आहोत.
- शाम शिरसाट,
- अध्यक्ष - सम्राट अशोक बुध्दाविहार समिती.
0 टिप्पण्या