Top Post Ad

घरे तोडली, संसारोपयोगी वस्तू जाळल्या... न्यायासाठी पारधी समाज रस्त्यावर....

बीड जिल्ह्यातील शिरुर तालुका झापेवाडी गावातील पारधी समाजावर झालेल्या अत्याचाराची सखोल चौकशी व्हावी. अत्याचारग्रस्त भोसले कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी भोसले परिवार आझाद मैदान मुंबई येथे 25 मार्च पासून बेमुदत धरणे आंदोलन करीत आहे.  दिलीप रामराव ढाकणे, महेश दिलीप ढाकणे, संदीप मिड्नु ढाकणे, राम उत्तम ढाकणे यांनी या  आदीवासी पारधी समाजाची केवळ घरे उध्वस्त केली नाही तर त्यांच्या घरातील वस्तूही जाळण्याचा प्रताप केला आहे. आधी पारधी समाजाच्या भोसले कुटुंबावर अत्याचार करून नंतर त्यांना अशा तऱ्हेने नाहक त्रास देण्याचा प्रकार अद्यापही होत असल्याचे त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे याबाबत पत्रकार परिषद घेण्यात आली. 

   शालन हारकु भोसले व माझ्या परीवारातील महिला पुरुषांना ढाकणे परिवारातील काही लोक आले आणि म्हणाले की, तुमचा डुकरे पकडण्याचा व्यवसाय आहे. आमच्या शेतातील पिकांचे डुकरांनी खुप नुकसान केलेले आहे. त्यांना हुसकुन देण्यासाठी किंवा पकडण्यासाठी आम्हाला मदत करा. त्यावर शालन हारकु भोसले त्यांना म्हणाल्या की, माझ्याच्याने हे काम होणार नाही. माझे पती अपंग आहेत. तेंव्हा या लोकांनी आग्रह केला की तुमच्या कडे डुकरे पकडण्याचे फास आहेत. तुमच्या मुलीला व मुलाला फास लावण्यासाठी पाठवा. शालन हारकु भासेले यांनी त्यांच्या दोन्ही मुलास दिलीप ढाकणे रा. बावी यांचे शेतात फास लावण्यासाठी दिनांक 18/02/2025 रोजी सायंकाळी 5 ते 6 च्या दरम्यान पाठवले. दुसऱ्या दिवाशी सकाळी 8 वाजता त्यांची मुलगी चांदणी व मुलगा दिपक हे लावलेला फास पाहण्यासाठी गेले असता दिलीप ढाकणे, महेश ढाकणे, संदीप ढाकणे आणि राम ढाकणे यांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांच्या मुलीच्या अंगावर हे चौघे धाऊन आले असतांना ती सैरा वैरा पळु लागली तेव्हा पकडुन तीचे तोंड दाबले व तीला लाथ बुक्कयाने बेदम मारहाण केली. पोटात लाथ बुक्याने मारहाण केली अणि तीच्याशी गैरवर्तन करत तीचा विनयभंग केला. त्यावेळी तीचा भाऊ सोडण्यासाठी गेला असता त्याच्या डोक्यात तलवारीने वार करुन त्याला जिवे भारण्याचा प्रयत्न केला आणि त्याला जबर जखमी केले. या घटनेचा तक्रारी अर्ज दिनांक 21/02/2025 रोजी शिरुर पोलीस स्टेशनला दिला होता. परंतु परिसरातील सामाजिक कार्यकर्ते वनवे दादांनी मध्यस्थी करुन हे प्रकरण आपसात मिटवले व तसे शालन हारकु भोसले यांनी लिहुन दिले होते. त्यावर सतीष भोसले यांनी समक्ष म्हणुन सही केली आहे.

परंतु त्यानंतर ढाकणे कुटुंबियांनी या घटनेचा मनात राग धरुन सतीश भोसले व त्याच्या वडीलांविरुध्द पोलीस स्टेशन शिरुर येथे गुन्हा दाखल केला. त्यामुळे शालन हारकु भोसले यांच्यावर सतत दबाव आणल्यामुळे त्यांनी या घटनेची फिर्याद शिरुर पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. नं. 0063 नुसार अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार कलम 3(1) (r), 3(1)(s), 3(1)(w)(i), 3(1)(w)(ii), 4 (1) आणि भारतीय न्याय संहीता बी.एन.एस. 2023 चे कलम 109,74,352,351(2), 351(3), 3(5), आणि बालकांची लैंगीक अपराधापासुन संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या दाखल गुन्हयातील सर्व आरोपी व त्यांना मदत करणारे सह आरोपी यांना ताबडतोबीने अटक करुन त्यांच्या विरुध्द दोषारोपपत्र दाखल करावे. अशी मागणी प्रशासनाला करण्यात येत आहे. 

दिनांक 13/03/2025 रोजी वन विभागातील कर्मचारी, पोलीस आणि महसुल प्रशासनातील लोकांनी संगनमताने आम्हा सर्व पारधी समाजाची आणि परंपरागत वननिवासी यांची एकुण तेरा घरे जे.सी.बी.ने उध्वस्त करुन टाकली आहेत. सर्वांसाठी घरे 2022 या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील शासकीय जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेले अतिक्रमण हे नियमानुकुल करण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय क्र  ग्राम विकास विभाग, प्रआयो-2017/ प्र.क्र. 348/योजना-10 दिनांक 18/02/2018 नुसार सन 2011 पुर्वीची शासकीय जमीनीवरील अतिक्रमणने कायम करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी वन हक्कांची मान्यता अधिनियम २००६ व नियम २००८ आणि सुधारित नियम २०१२ नुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी यांना जंगलातील जमीन शेतीकरता किंवा राहण्याकरता वापरत असेल व त्यावर १३ डिसेंबर २००५ पर्यंत त्यांचा ताबा असेल तर ती जमीन मिळवण्याचा हक्क कलम ३ (क) प्रमाणे देण्यात आला आहे. 

मौजे झापेवाडी येथील गट नंबर ५१ मधील २२० हे. ८२.५० आर जमीन महाराष्ट्र शासन सरकार यांच्या (वन विभागाच्या) अधिकारात आहे. दिनांक १३/०३/२०२५ रोजी वनविभाग, पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांनी १३ घरे जेसीबीच्या साह्याने अमानवी पद्धतीने गैर कायदेशीरपणे उध्वस्त केले आहेत. या उध्वस्त केलेल्या घरामध्ये अनुसूचित जमाती पारधी समाजाची ९ घरे, पारंपारिक वननिवासी भटके विमुक्त वडार समाजाची ३ घरे आणि पारंपारिक वननिवासी मातंग समाजाचे १ घर जमीन दोस्त केले आहे. ही सर्व घरे मागील तीन पिढ्यापासून या ठिकाणी निवास करत होती. वन हक्क कायद्याप्रमाणे वन विभागाच्या जमिनीवर भोगवटा करून राहत असलेल्या निवासी कुटुंबाचे वन हक्कांचे अर्ज भरण्याची व पुराव्या गोळा करण्यासाठी वन हक्क समितीवर बंधनकारक होते. अनुसूचिल जमाती व पारंपारिक वन निवासी यांचे हक्काचे पुरावे तयार करणे आणि मंजूर करण्यासाठी राज्यस्तरीय सनियंत्रण समितीची रचना महाराष्ट्र राज्य शासनाने केलेली आहे. वन हक्क अधिनियमाप्रमाणे भोगवट्याखाली असलेल्या अनुसूचित जमाती किंवा पारंपारिक वननिवासी यांच्या हक्कांच्या मान्यतेची व पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याखेरीज त्यांच्या भोगवट्याखालील वन भूमीतून त्यांना निष्काशित किंवा काढून टाकण्यात येणार नाही अशी स्पष्ट तरतूद आहे. मौजे झापेवाडी शिवारातील गट क्रमांक ५१ येथील वन जमिनीवरील अनुसूचित जमाती आणि पारंपारिक वननिवासी यांच्या १३ घरावर जेसीबी फिरवून वन विभाग पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांनी बेकादेशीर कृत्य केलेले आहे.  

पारधी समाजाच्या 13 कुटुंबाची घरे मागील 100 वर्षापासुन या जागेवर आहेत.   सर्व अतिक्रमणे शासकीय धोरणानुसार नियमानुकुल होण्यास पात्र असतांनाही केवळ जातीय द्वेश भावनेतुन राजकीय लोकांच्या दबावाखाली वनविभाग, पोलीस व महसुल कर्मचारी यांनी संगनमताने पाडलेले आहेत. त्यांनी केलेले ही कार्यवाही बेकायदेशीर आहे.  तेंव्हा शिरुर तालुक्यातील झापेवाडी येथील पारधी समाजाचे घरे पाडण्यारे वनविभागाचे संबंधीत सर्व अधिकारी, कर्मचारी, त्यांना मदत करणारे सर्व पोलीस कर्मचारी, आणि महसुल प्रशासनातील जबाबदार कर्मचाऱ्यावर अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार महिलांची छेडछाड करणे, मारहाण करणे, घर आणि मालमत्ता, संसारउपयोगी साहीत्यांचे नुकसान करणे, राहते घर जमीनदोस्त करणे या कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करावेत.

दिनांक 13/03/2025 रोजी वन विभागाने जे.सी.बी.ने घरे पाडल्यानंतर दशरथ वनवे, भारत खरमाटे, रामा खेडकर, संदीप ढाकणे, माऊली शिरसाठ, अजिनाथ खरमाटे, देविदास जायभाये. अक्षय जाधव, विवेक पाखरे, बाळु गर्जे, रामदास बडे, यांच्यासह 20 ते 25 लोकांनी मिळून रात्री पाडलेल्या आमच्या घरांचे सामान व संसार उपयोगी साहित्य जनावरे, कोंबड्या बदके, कपडे, धान्य आणि जनावरांचा चारा जाळुन टाकला तसेच बाया पोरांना अमानुष मारहाण केलेली आहे. या घटनेची आम्ही शिरुर पोलीस स्टेशनला लेखी आणि तोंडी माहीती दिलेली आहे. या प्रकरणी संबंधीत लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल करुन त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी. तसेच त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र संगठीत अपराध नियंत्रण अधिनियम, (Maharashtra control of organised crime act 1999) आणि अनिसुचीत जाती जमाती प्रतिबंधक कायदयाच्या योग्य त्या कलमान्वये गुन्हे दाखल करावेत.

 दिलीप रामराव ढाकणे, महेश दिलीप ढाकणे, संदीप विठु ढाकणे, आणि राम उत्तम ढाकणे यांनी कुमारी चांदणी आणि दिपक यांना त्यांच्या शेतात मारहाण आणि विनयभंग केला असता त्यांच्या विरोधात शिरुर पोलीस स्टेशनला तक्रार केल्याचा मनात राग धरुन सतीष भोसले, त्यांचे तीन भाऊ आणि सतीषचे वडील यांना जातीय द्वेष भावनेतुन अडकवले आहे. सतीष भोसले त्यांचे तीन भाऊ आणि त्यांचे वडील यांच्यावर विनापुरावा दाखल झालेल्या गुन्हयात पोलीस प्रशासनाने चौकशी करुन त्यांना निर्दोश मुक्तता व्हावी.

झापेवाडी ता. शिरुर जि. बीड येथील अत्याचार ग्रस्त सर्व कुटुंबाचे ताबडतोबीने त्याच जागेवर पुनर्वसन करुन सर्वाना आदीवासी प्रकल्प कार्यालय संभाजीनगर यांच्या मार्फत पक्की घरे बांधुन दयावीत. झापेवाडी ता. शिरुर जि. बीड येथील सर्व अत्याचारग्रस्त कुटुंबांना जगण्यासाठी एकात्मीक आदीवासी प्रकल्प कार्यालय छ. संभाजीनगर यांच्या मार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत शासनाने त्यांना शेतीसाठी जमीन उपलब्ध करुन दयावी. झापेवाडी ता. शिरुर जि. बीड येथील अत्याचार ग्रस्त आदीवासी पारधी कुटुंबाना पोलीस संरक्षण देण्यात यावे. सतीष भोसले आणि त्यांच्या परीवाराची जातीय द्वेष भावनेतुन बदनामी करणाऱ्या प्रेस मिडीया आणि इलेक्टॉनीक मिडीयावर कायदेशीर कार्यवाही करावी. या साठी अत्याचार ग्रस्त आदीवासी पारधी समाज 25 मार्च पासुन आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलनास बसले असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com