Top Post Ad

पुतळ्यासाठी तज्ज्ञ कलावंतांची समिती नेमा !

मुंबईतील इंदुमिलच्या जागेवर बसविण्यात येत असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाकाय पुतळ्यात अनेक दोष दिसण्यात येत आहेत अशी प्रतिक्रिया भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉ भीमराव आंबेडकर यांनी डॉ बाबसाहेब आंबेडकर दक्षता समिती शिष्टमंडळासमोर व्यक्त केली. समितीचे सदस्य जेष्ट नेते समाजभूषण उत्तमराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा करताना व्यक्त केली. समितीच्या वतीने त्यांना निवेदन व पुतळ्याचे फोटो देण्यात आले. फोटोचे बारकाईने निरक्षण केल्यानंतर चेहरा पूर्ण बदललेला आहे, हाताचा आकार नीट नाही. तसेच समितीने १३ चुका दाखविल्या आहेत त्यातील बरेच चुका त्यांनी मान्य केल्या. तसेच  गाजीयाबादला जावून प्रत्यक्ष पुतळा पाहून येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 


 शिष्टमंडळात प्रकाश मेश्राम, रविभाऊ गरूड, मिलिद सुर्वे, समाजभूषण छायाताई सरवदे, समाजभूषण सो़नां कांबळे, अॅड प्रफूल सरवदे, गौतम कांबळे, मुरलीधर खंडागळे, दिनकर केदार,  सत्यवान सोनावणे, समाजभूषण दयानंद का,टे डि के जाधव यांचा समावेश होता. लवकरच शिष्टमंडळ गाजीयाबादला भेट देईल तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या राजकीय नेत्यांशी चर्चा करून याबाबत असलेले दोष सरकारच्या निदर्शनास आणून देऊ, असे गायकवाड यावेळी म्हणाले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र हे खुद्द त्यांनी डॉ. माईसाहेब आंबेडकर यांच्यासोबत फोर्ट भागातील एका जगप्रसिद्ध स्टुडिओमध्ये काढलेले आहे. अन् त्याच्या शेजारी आहे शिल्पकार अनिल सुतार यांनी इंदू मिल येथील आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी बनवलेला बाबासाहेबांचा नमुना पुतळा. कुठल्या कोनातून तो बाबासाहेबांचा वाटतो काय?

   त्यांच्या हुबेहूब आणि निर्दोष पुतळ्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सध्याचा शिल्पकार बदलावा आणि कलाक्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांची एक समिती स्थापन करावी, अशी अग्रगण्य कलावंतांची मागणी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक दक्षता समितीच्या पत्रकार परिषदेत सोमवारी सहभागी होवून त्यांनी ही मागणी केली आहे. नामवंत चित्रकार प्रा. प्रकाश भिसे, मोग्गलान श्रावस्ती, प्रख्यात वृत्त छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे, चित्रकार गोपाळ गंगावणे आदींची ही मागणी आहे. त्या मागणीला शिल्पकार चंद्रजित यादव, दिल्लीच्या जे एन यू विद्यापीठातील प्रा. यश अलोने, प्रभाकर कांबळे, नागपूरचे राष्ट्रीय चित्रकार प्रमोदबाबु रामटेके यांनी पाठिंबा दिला आहे. निवृत्त कला शिक्षक आणि शिल्पकलेचे जाणकार असलेले माजी राज्यमंत्री, ज्येष्ठ रिपाइं नेते दयानंद मस्के यांनी तर सुतार यांनी तयार केलेला नमुना पुतळा हा बाबासाहेबांची विटंबना आहे, असे म्हटले आहे. तरीही तोच पुतळा पूर्णत्वाकडे रेटून आंबेडकरी जनतेच्या माथी मारण्याचा राज्य सरकारचा मनसुबा आहे काय? असा सवाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक दक्षता समिती, कोअर कमिटीचे सदस्य    ज्येष्ठ पत्रकार  दिवाकर शेजवळ यांनी केला आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com