Top Post Ad

बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन... गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथे मुक निदर्शने

 भारताचा इतिहास पाहिला तर असे आढळुन येते की, "भारत ये भूमि बुध्द की भुमि है !" शांती का प्रतिक है। ही ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर घोषित आहे. असे जरी असले तरी काही धर्मांध सत्ताधारी लोकांनी आपल्या स्वार्थीपणामुळे ज्या ठिकाणी पुज्य तथागत बुध्दांना "ज्ञान प्राप्ती" झाली ते बिहार येथील बोधगया महाविहारावर कब्जा करून बसले आहेत. या कर्मठांकडून वारंवार बौद्ध धर्माचा अवमान करण्यात येत आहे. बोधगया विहार कमिटीच्या ट्रस्टीपदावर असल्याने ते सातत्याने या कायदयाचा दुरुपयोग करत आहेत. या ठिकाणी इतर कर्मकांड करुन बौध्द धम्माला बदनाम करण्याच्या हेतुने वाटचाल केली जात आहे.  भारतात हिंदु मंदिरात पुजारी असतात, मुस्लिम मस्जिद मध्ये मौलवी असतात, खिश्चन चर्च मध्ये फादर असतात. भारतात प्रत्येक देवस्थानमध्ये त्या त्या धर्माला स्वातंत्र्य आहे. परंतु महाबोधि विहार कमिटी याला अपवाद आहे. अशी वस्तुस्थिती आहे.  या देशातील बौध्द समाज हा अन्याय मागील कित्येक वर्षापासून सहन करत आहे. केवळ इथली सत्ता, धर्मांध शक्तीच्या ताब्यात असल्याने सत्तेच्या जोरावर बौद्ध समाजाला कायमच दाबण्याचे काम इथले सरकार करीत आहे.  

२१ व्या शंतकांत देखील बुध्द जिवित आहे आणि तो मानवाच्या सिध्दांताचा एक प्रमुख जीवन मार्ग बनला आहे. "बहुजन हिताय, बहुजन सुखाय" तर कधी मंगल मैत्री हया जीवन प्रणालीला समर्पित हा धम्म मानवतेच्या सिध्दांतावर आज  प्रेमाचा धर्म अशी ओळख ठेवून जगभर पसरला आहे. भारताचे घटनाकार, विश्वरत्न, क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयांनी हिंदु धर्माचा त्याग करून बौद्ध धम्म स्वीकारला. इथल्या असंख्य भारतीयांना गुलामगिरीतुन मुक्त केले. धार्मिक कर्मकांडाला संपवुन टाकले. मात्र येथील कर्मकांड लोक बौद्ध धर्माला सातत्याने अडचणीत आणण्यांचे प्रयत्न सत्तेच्या जोरावर करत आहेत.  कायदंयाच्या माध्यमातुन मुळ बौध्द धर्माच्या प्रचार व प्रसाराकरीता हेतुपुरस्पर बौध्द धर्माचे प्रचारकांवर बंदी घातली जात आहे. बिहार येथील बोधगया महाविहारांवर देखील हिंदु पंडीत देवस्थानांच्या ट्रस्टी व विश्वस्त पदावर राहून बौध्दधर्माचा अवमान करत आहे.

 हा अवमान त्वरीत थांबावावा ! भिक्खूसंघाला  या विहार कमिटीत संपूर्णपणे समावून घ्यावे. बोधगया महाविहाराचे व्यवस्थापन केवळ बौद्धांच्याच ताब्यात द्यावे. बोधगया बी.टी.अॅक्ट 1949 हा पुर्णपणे रद्द करावा या मागणीकरिता महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातून बौद्ध समाज वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करीत आहे.  ही मागणी राष्ट्रीय स्तरावर व भारतात असंख्या आंदोलन केली जात आहे.  मुंबईत रिपब्लिकन आठवले गटाच्या मुंबई युवक आघाडीच्या वतीने शनिवार दि. १५ मार्च रोजी ३.०० वाजता मुंबईतील जगविख्यात गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी मुंबईतील बौध्द भिखुसंघ व बौद्ध समाजाच्या वतीने मुक निदर्शने करण्यात येणार आहेत. या निदर्शनात अखिल भारतीय भिखु संघ, प.पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण समन्वय समिती (मुंबई), बौध्द धर्म उपासक-उपासिक समिती, आंतरराष्ट्रीय बौध्द धर्म प्रचार समिती (रजि.),च्या कार्यकर्त्यांनी तसेच  मुंबईतील सर्व बौद्ध समाजाने जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन   रिपब्लिकन आठवले गटाच्या मुंबई युवक आघाडीचे अध्यक्ष सचिनभाई दयानंद मोहिते यांनी केले आहे. 

मो.९८३३६४१९९९

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com