'ठाणे महानगरपालिकेचे मागील ५ वर्षात ऑडीट झाले नसल्याच्या' बातम्या काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत. प्रत्यक्षात, ठाणे महानगरपालिकेचा सन २०१९- २० चा लेखापरीक्षण अहवाल स्थायी समितीस सादर झाला आहे. तर, उर्वरित, सन २०२०-२१ व २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे लेखा परिक्षण अहवालासाठी मार्च- २०२५ आणि सन २०२२-२३ व २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे लेखा परिक्षण अहवालासाठी डिसेंबर- २०२५चे उद्दिष्टे निर्धारित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम १०६ अन्वये लेखापरिक्षणाचा अंतिम अहवाल मा. स्थायी समितीपुढे सादर करण्यात येतो. सद्यस्थितीत ठाणे महानगरपालिकेचे सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचे लेखापरिक्षण पूर्ण करुन तो अहवाल मा. स्थायी समितीपुढे सादर करण्यात आला आहे.
ठाणे महापालिकेच्या विभागांचे २४ विभागात विभागणी करुन लेखापरिक्षण करण्यात येते. त्यानुसार सन २०२०-२१ व २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे लेखापरिक्षणाचे कामकाजही पूर्ण झाले आहे. त्यातील, ०७ विभागांचे अहवाल मा. स्थायी समितीस सादर करण्यात आले आहेत. उर्वरित १७ विभागांचे लेखापरिक्षण अहवाल अंतिम करण्याची कार्यवाही मार्च २०२५ अखेर पूर्ण करण्यात येईल.
सन २०२२-२३ व २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे लेखापरिक्षण दि. ०१/०७/२०२४ पासून सुरू करण्यात आलेले आहे. त्यासाठी लेखापरिक्षण कार्यक्रम अंदाजपत्रक निश्चित करण्यात आले आहे. हे लेखापरिक्षण डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे.
सन २०२४मध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक व विधानसभा निवडणूक पार पडली. सदर निवडणुकीसाठी, लेखापरिक्षा विभागातील बहुतांश कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर होते. त्यामुळे लेखा परीक्षणाच्या कार्यवाहीस विलंब झाला. ही वस्तुस्थिती आहे. अर्थात, निवडणुकीचे कामकाज संपल्यानंतर, लेखापरीक्षण विभाग पुढील कार्यवाही करीत असून मार्च २०२५ आणि डिसेंबर २०२५ ही दोन्ही उद्दिष्टे नियत वेळेत पूर्ण करण्यात येतील, असे मुख्य लेखा परीक्षक दिलीप सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.
मात्र या ठाणे महानगरपालिकेच्या सन २०२५_२६ चे अर्थसंकल्प बाबत उच्चस्तरिय चौकशी होण्याची मागणी होत आहे,
ठाणे महानगर पालिकेच्या अधिकृत संकेत स्थळावरून असे समोर येते की....
" अर्थ संकल्प "
१). सन २०२०_२१. रु. :३७८०/.
२).सन २०२१_२२. रु.: २७५५/.
३). सन २०२२_२३. रु.: ३२९९/.
४). सन २०२३_२४. रु.: ४३७०/.
५). सन २०२४_२५. रु.: ५०२५/.
या कालावधीत दोन आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे वर प्रशासकीय सेवा देऊन गेले ,परंतु अजून ही लेखा परिक्षण अहवाल ठाणे महानगरपालिका, ठाणे, च्या संकेत स्थळावर अधिकृतरित्या उपलब्ध नाही.
सर्वात अंतिम लेखा परिक्षण अहवाल सन: २०१९_ २०, पर्यत आहे, त्या अनुसरून वसूल पात्र रक्कम:रु..३३७,५३,३९,२९६/., दिसून येत आहे, तर आक्षेप ७३०४ आहेत. मागील ०५ वर्षाचे लेखा परिक्षण आज दिनांक: ०७_मार्च_२०२५ पर्यंत झालेलेच नाहीत ही सत्यता आहे. तरीही २०२५_२६ चे अर्थसंकल्प हा ठाणेकर करदात्यांची चक्क खुली फसवणूक नाही का ? या करिता मा. आयुक्त तथा प्रशासक, ठाणे महानगरपालिका ठाणे स्वतः जबाबदार आहेत व स्वतःचे लोकसेवक म्हणून कर्तव्य पार पाडत असताना प्राथमिकतेने वरील गंभीर बाबींचे स्पष्टीकरण देणे आवश्यक व जरूरीचे असताना याबाबत मौन, विलंब का करण्यात येत आहे. असा सवाल आता ठाणेकर करत आहेत.
0 टिप्पण्या