Top Post Ad

खारेगाव येथील नाट्यगृहासाठी जागा संपादन कार्यवाही सुरू

    कळवा येथील नाट्यगृहासाठी आवश्यक असलेल्या जागेपैकी ५० टक्के जागा ठाणे महानगरपालिकेच्या ताब्यात आहे. उर्वरित जागेच्या ताब्यासाठी विकास आराखड्यातील आरक्षणानुसार जागा ताब्यात घेण्यास परवानगी देण्याची विनंती न्यायालयात करण्यात आल्याची माहिती शहर विकास विभागाने दिली. या नाट्यगृहाच्या आराखडा तयार करण्याचेही काम सुरू असून तो पुढील आठवड्यात सादर करण्यात येणार आहे. 

  ठाणे महानगरपालिकेतर्फे कासारवडवली येथे खारबाव आणि कोस्टल रोड जंक्शन परिसरात सुमारे ७० एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या कन्व्हेंशन सेंटर आणि प्रेक्षक गॅलरी (व्ह्यूईंग टॉवर) या प्रकल्पात रस असलेल्या विकासकांसाठी स्वारस्य देकार सूचना (इओआय) प्रकाशित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.     कोट्यवधी रुपयांच्या या प्रकल्पासाठी आर्थिक व्यवहाराचे कोणते प्रारूप स्वीकारायचे याचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. अशा प्रकारचा प्रकल्प यापूर्वी झालेला नसल्याने त्याची दिशा, नियोजन, व्यवस्थापन आणि देखभाल यांचे स्वरुप कसे असावे, हे अत्यंत काटेकोरपणे आखण्याची गरज असल्यानेच ठाणे महानगरपालिका स्वारस्य देकार सूचना मागवण्याचे ठरविले असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले.  या कन्व्हेंशन सेंटर आणि प्रेक्षक गॅलरी प्रकल्पाच्या आराखड्याचा आढावा आयुक्त राव यांनी गुरुवारी घेतला. त्याचबरोबर, ठाणे महापालिका क्षेत्रात प्रस्तावित असलेले कोलशेत-बाळकूम येथील टाऊन पार्क, कळव्यातील यशवंत रामा साळवी तरण तलावाची नव्याने बांधणी, खारेगाव येथे प्रस्तावित नवीन नाट्यगृह याही प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. बैठकीस, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त शंकर पाटोळे, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार दिनेश पैठणकर, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शहर विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

      या प्रकल्पात खाजगी-सार्वजनिक सहभाग किंवा विकासकाच्या माध्यमातून बांधकाम असे दोन पर्याय आर्थिक सल्लागारांनी सुचवले आहेत. त्याबद्दल निर्णय घेताना महापालिकेचा जास्तीत जास्त फायदा आणि विकासकासाठी प्रकल्पाची व्यवहार्यता या दोन्ही गोष्टीची सांगड घालणे आवश्यक आहे. म्हणूनच ईओआय मागून प्रकल्पात रस असलेल्या विकासकांची भूमिका कशी असेल हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.      त्याचबरोबर कोलशेत बाळकुम परिसरात तयार करण्यात येणाऱ्या टाऊन पार्क प्रकल्पा संदर्भातही या बैठकीत आढावा घेण्यात आला. टाऊन पार्क हा विज्ञान केंद्र, मत्स्यालय, मत्स्य वारसा केंद्र आणि तारांगण यांच्यासह व्यावसायिक वापराच्या जागेचा विकास असा सुमारे २६०० कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता तपासून तसेच राज्य शासनाकडून आवश्यक परवानगी घेऊन पुढे जाण्याचा जाण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत.       

         कळवा येथील तरण तलावाच्या धोकादायक इमारतीचे निष्कासन सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले आहे. तसेच, या क्षेत्राचे सर्वेक्षण शहर विकास विभागाने पूर्ण केले आहे. या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे काम वास्तू विशारदामार्फत सुरू आहे. हा आराखडा सोमवारी सादर करावा, तसेच आरक्षण बदलाच्या प्रस्तावाला महासभेची तसेच शासनाची मान्यता घेण्याची प्रक्रिया तातडीने करावी, अशा सूचना आयुक्त राव यांनी दिल्या. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com