Top Post Ad

महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांना मिळणार रक्षात्मक चालक प्रशिक्षण

मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील घनकचरा वाहून नेणाऱ्या महानगरपालिकेच्या वाहन चालकांना रक्षात्मक चालक प्रशिक्षण (Defensive Driving Training) देण्यात येणार आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात २४० चालकांचा समावेश करण्यात आला आहे. पैकी २० वाहन चालकांना काल (दिनांक २० मार्च २०२५) आणि २० वाहन चालकांना आज (दिनांक २१ मार्च २०२५) असे मिळून ४० जणांना एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद (महाराष्ट्र विभाग) यांच्याकडून हे प्रशिक्षण देण्यात आले. 


  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतून दररोज घनकचरा संकलित केला जातो. हा कचरा संकलित करुन वाहनांमधून वाहून नेताना महानगरपालिकेकडून विविध प्रकारची काळजी घेतली जाते. तसेच या वाहन चालकांनाही वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते. त्याचाच एक भाग म्हणून घन कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना सुरक्षितपणे वाहन चालविण्याचे योग्य तंत्रज्ञान अवगत करून देणे, वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्त्व समजावणे, वाहनांची योग्य काळजी घेणे आदींबाबत या प्रशिक्षणात सविस्तर माहिती देण्यात आली.

या प्रशिक्षण कार्यक्रमांच्या पहिल्या टप्प्यात एकूण २४० वाहन चालकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचा प्रारंभ गुरुवार, दिनांक २० मार्च २०२५ पासून झाला.हे एकदिवसीय प्रशिक्षण चर्चगेट परिसरातील इंडियन मर्चंटस् चेंबर येथे पार पडले. दर आठवड्यात गुरुवार व शुक्रवार याप्रमाणे बारा तुकड्यांमध्ये प्रत्येकी २० चालक याप्रमाणे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण दिले जाणार आहे.    

या प्रशिक्षणाप्रसंगी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे प्रमुख अभियंता श्री. प्रशांत पवार, कार्यकारी अभियंता (परिवहन) श्री. चित्रांगद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता श्री. नितीन परब तसेच राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या महाराष्ट्र विभागाचे मानद सचिव श्री. प्रसाद मसूरकर व प्रशिक्षक श्री. नितीन केदारे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com