आष्टी बीडचे आमदार सुरेश रामचंद्र धस हे पैश्याचा व पदाचा गैरवापर करून दहशत माजवत आहेत, लोकांचे आयुष्य उध्वस्थ करत आहेत, यांच्यामुळे आमच्या कुटुंबाची मानसिक, शारीरिक, आर्थिक मोठ्या प्रमाणात हानी झाली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मनोज सदाशिव चौधरी यांनी केला आहे. धस यांच्याविरोधात सुमारे १००० पानांचे आरोप पुराव्यानिशी माझ्याकडे आहेत. आमच्या कुटुंबावर झालेल्या अन्याया विषयी CID मार्फत SIT गठीत करून सखोल तपास करावा अशी मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे पत्राद्वारे केली असल्याची माहिती आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे प्रसिद्धी माध्यमांना दिली.
आमदार सुरेश धस व त्यांच्या सोबतचे 38 कार्यकर्ते केस नं 224/2021 मधील आरोपी असल्याचे हायकोर्टाचे आदेश असताना पोलीस वारंवार आरोपीना पाठीशी घालत आहेत व अश्या कारणामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती मध्ये होत असलेली वाढ होत आहे. तसेच आमदार धस यांच्या नातेवाईक असलेला ड्रायव्हर व कार्यकर्ता असलेला विलास भोगाडे याला हाताशी धरून आमच्याच घरी येऊन आमच्यावर हल्ला करून 2 वेळेस 307 सारखे गंभीर कलमे लावली ती रद्द करण्यात यावी. आष्टी येथील जे कर्मचारी आमदार धस यांचे चे ऐकून लोकांवर अत्याचार करतात त्या पोलिसांवर कारवाई करावी. संपुर्ण प्रकरणी 2020 पासून प्रशासनाकडे अर्ज केले म्हणून फिर्यादींवरच खोट्या केसेस व हल्ले झाले याचा सखोल तपास करावा अन्यथा आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी. आष्टी येथील मा. पाटील कोर्ट ज्यांच्या कडे आमच्या आष्टीतील प्रकरण खटाला चालू आहे यांची मुलेच धस यांच्या "अनिशा ग्लोबल "या शाळेमध्ये शिकतात आम्हाला न्याय तरी देणार कोण. म्हणून आमची न्यायालतील संपूर्ण प्रकरणे जिल्हा न्यायालय या ठिकाणी चालवावीत. अशा मागण्याही निवेदनाद्वारे चौधरी यांनी केल्या आहेत.मी एक सामाजिक कार्यकर्ता व व्यावसायिक असून माझी आष्टी, करंजी या गावी मुळगावी शेती आहे मी 2014 साली पासून गोपीनाथ मुंडे साहेबांसाठी आष्टी मध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होतो. "2015 "मध्ये आष्टी मध्ये दहीहंडी निमित्त कार्यक्रमास प्रचंड असा प्रतिसाद मला मिळाला या सर्व गोष्टीचा प्रचंड रोष आमदार सुरेश धस यांना आहे हा आपला नातेवाईक आहे तरी विरोधातील पक्षात काम करतो आपले ऐकत नाही अश्या सर्व गोष्टीमुळे धस यांनी सुरुवातीला गुंडामार्फत माझ्यावर हल्ले करण्यास सुरुवात केली "धस यांचा मुलगा जयदत्त धस याने सुरुवातीला जीवे मारण्याची धमकी दिली या घटनेची तक्रार मी पोलिसांकडे केली त्याचा "NC" देखील पोलीस स्टेशनला झाला होता. माझे आष्टी येथे भारतीय जनता पार्टीचे पक्ष कार्यालय होते त्या वेळी प्रीतमताई गोपीनाथ मुंडे यांनी त्याचे "उदघाटन "केले त्याचा राग पकडून आमदार धस यांनी मला नाहक त्रास दिला मला कार्यालय देखील बंद पाडण्यासाठी भाग पाडले असल्याचे चौधरी यांनी निवेदनात नमूद केले असल्याचे सांगितले.
'2017 "मध्ये आष्टी मुर्शदपूर जिल्हापरिषद निवडणूकी मध्ये आमदार सुरेश धस यांच्या पहिल्या पत्नी संगीता सुरेश धस ह्या सहभागी होत्या व माझी पत्नी माधुरी मनोज चौधरी ह्या देखील सहभागी होत्या त्या काळात राजकीय टीका ही मी धस यांच्यावर केली त्या वेळी निता सतिष शिंदे या भारतीय जनता पार्टी मार्फत विजयी झाल्या याचा प्रचंड राग यांनी धरला. "सुरेश धस हे अतिशय खुनशी वृतीचे आहेत" हे आमच्या लक्षात आले. माझे आष्टी (पांढरी) या ठिकाणी 20 गुंठे क्षेत्र आहे. सातबारा नॉन ऍग्री (NA) केलेल्या जागेत ज्याचा त्या जागेचा रहिवासी कर आष्टी तहसील येथे नियमित भरणा करत होतो माझ्या 20 गुंठे रहिवासी क्षेत्र मध्ये त्या ठिकाणी माझ्या जागेला संपूर्ण भिंतीचे पत्रा व लोखंडी सुशोभीकरण चारही बाजूने कंपाउंड आत मध्ये 2 मजली घर व बाकीच्या जागेत काम चालू होते व त्या ठिकाणाहून सामाजिक कार्य चालू होते. धस यांचा जावई हा पांढरी या गावाचा सरपंच, धस यांचा ड्रायव्हर व कार्यकर्ता असलेल्या विलास भोगाडे यांनी मला व कुटुंबातील लोकांना माझ्या जमिनीमध्ये येऊन शिवीगाळ त्रास देण्यास सुरुवात केली मी त्या घटनेची रीतसर पोलीस तक्रार केली. परंतु पोलिसात तक्रार केली म्हणून धस यांचा कार्यकर्ता भोगाडे व काही गुंड घेऊन माझ्यावर व वडिलांवार तलवार लाठ्या काठ्या बेल्ट यांनी हल्ला केला. त्यात माझ्या वडिलांच्या डोक्यात गंभीर जखम झाली त्या वेळी आमदार धस यांनी पोलिसांना हाताशी धरून आमच्या कुटंबाचा यात काही एक संबंधं नसताना उलट 307 सारखे गंभीर गुन्हा प्रथम हा आमचे कुटुंब संपवण्याच्या उद्देशाने दाखल केला, मला त्यामध्ये अटक पूर्व जामीन मंजूर झाला म्हणून त्याचा राग परत यांनी धरून, माझ्या मुळगावी करंजी येथे सकाळी 7 च्या वेळी 15-20 लोक घेऊन धस यांचा कार्यकर्ता व ड्रायव्हर भोगाडेला जावई सरपंच सुधीर पठाडे यांना, माझे संपूर्ण कुटुंब संपवून या, पोलिसांचे मी बघतो. असे सांगून पाठवले, त्या काळात मी "पोलीसांना सपंर्क केले माझा CDR तपासावा मला कसलीच मदत या सुरेश धस पुढे कोणी केली नाही" आष्टी पोलीस सर्व शांत बघत राहिले. घटना घडून गेल्यावर मात्र त्यावेळी देखील माझ्यावर आमच्या कुटुंबावर 307 चा गुन्हा धस यांनी पोलिसांना दाखल करायला जाणीवपूर्वक सूड घेण्यासाठी लावला.
पुढील काळात तर 19/07/2021 रोजी तर आमदार धस यांच्या "खूनसी वृत्ती "प्रमाणे ते स्वतः माझ्या प्रॉपर्टी मध्ये 2 पोकलंड मशीन 4-5 डम्पर घेऊन आले मी पोलीसांना त्या ठिकाणी तक्रार करून बोलावले आमदार "धस यांनी पोलिसांना शिवीगाळ केली व हाकलून लावले" त्या रात्री आमच्या कुटुंबाला जिवंत ठेवू नका असे धस यांनी त्याच्या बरोबरील सर्व गुंडाना सांगितले. आम्ही घाबरून त्या ठिकाणावरून पोलीस स्टेशन कडे निघालो त्या काळात धस यांनी स्वतः आम्हाला जीवे मारण्याच्या उद्देशाने आमचा पाठलाग केला आम्ही "मोबाईल मध्ये विडिओ शुटिंग करण्याचा प्रयत्न केला आहे' कश्या प्रकारे आमच्या कुटुंबावर त्या रात्री यांनी हल्ला केला तो सुद्धा आम्ही पुराव्यात जोडला आहे. यात आम्ही कसे बसे पोलीस स्टेशनला पोहचल्यानंतर धस पोलिसांना तिकडे जागेकडे यायचे नाही, काय असेल ते मी बघेल पोलिसांना तुमची लायकी काय उद्याच तुमची हालत करून टाकेल. मी आष्टीचा 3 टर्म आमदार राहिलो आहे छाट चुट कोणी माझ्या समोर उभा राहील मी बघेल..! आष्टीचा बाप आहे मी ईथे. माझ्या शिवाय कोणाचे पान ही हालत नाही अशी धमकी देऊन परत माझी प्रॉपर्टी तोडण्यासाठी निघून गेले. माझे संपूर्ण प्रॉपर्टी त्यानी त्या रात्री तोडली माझे 50-60 लाखाचे नुकसान केले पुरावे काही नको म्हणून सर्व सामान पोकलंड JCB च्या व डम्पर कटर मशीन च्या साहाय्याने दगडाचे लोखंडाचे पत्र्याचे तेथील घरातील सर्व मौल्यवान वस्तू कंपाऊंड सहित चोरी करून त्या रात्री घेऊन गेले. या सर्व प्रकरणे आम्ही खूप भयभीत झालो..
या संपूर्ण घटनेचा "FIR झाला परंतु पुढील काळात आमदार सुरेश धसच्या ताकदीचा वापर करत पोलिसांना काही कार्यकर्त्यांची नावे काढायला लावली घटना स्थळी वापरलेला स्वतःचा मोबाईल नंबर बंद करुन टाकला मी हायकोर्ट मध्ये दावा दाखल केला हायकोर्टाचे आदेश आले कठोर कारवाई करा व दरोड्याचे 395 FIR 224/2021 या मध्ये कलम त्यात समाविष्ट करण्यास सांगितले. या लोकांनी कोर्टाच्या आदेशाला सुद्धा केराची टोपली दाखवली.. पैसा पॉवर सगळे वापरले जाते आष्टीत याची संपूर्ण प्रचिती या निमित्ताने आली आहे.. सर्वाना वारंवार अर्ज करून देखील कसलीच कारवाई आमदार धस यांच्यावर होत नाही.. आष्टीच्या दादागिरी, गुंडागिरी पुढे सर्वांनीच हात टेकले आहेत. आम्ही जो वकील देऊ त्याला हा सुरेश धस विकत घेतो याच्या कडे अमाप असा गैरमार्गे कमवलेला पैसा आहे. मी हतबल झालो आहे माझ्या कडे पर्याय नाही मी शेवटची आपणा पुढे विनंती करत आहे कठोर कारवाई करा अन्यथा आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही आमचा संपूर्ण तपास पहिले पासून हा CID मार्फत करण्यात यावा व संपूर्ण प्रकरणी स्वतंत्र SIT स्थापन करावी. अशी मागणी चौधरी यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री व संबंधित प्रशासकीय विभागाला केली आहे.
0 टिप्पण्या