दादासाहेब रूपवते जन्मशताब्दीनिमित्त, एक विशेष अंक प्रकाशित झाला आहे, त्या मध्ये दादासाहेब रूपवते यांनी आपल्या धर्मांतराच्या पूर्व काळाच्या ओघात काही महत्त्वाची टिप्पणी केली आहे. तोच लेख, शेअर करण्याचा मोह आवरत नाही)
"माझे लग्न, मुंबईतच ११ मार्च १९४४ रोजी, सायंकाळी पार पडले. जे प्रमुख लोक हजर होते त्यात कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे मुद्दाम नाशिकवरून आले होते. मी तर पहिल्या वर्षाचा विद्यार्थीच होतो, त्यामुळे ओळखिही कमीच होत्या. माझे थोरले मेहुणे - दादासाहेब रोकडे, ह्यांच्या
घरचे लग्न समजून जेवढे लोक आले तेवढे आले. रोकडेदादांनी या लग्नाला सामाजिक स्वरूप दिलं. त्या वेळी दलित समाजातील लग्ने, बाबासाहेबांनी घालून दिलेल्या पध्दतीप्रमाणे होऊ लागली होती. त्या पध्दतीला त्यांनी वैदिक पध्दत असे नामाभिधान दिले होते. त्या वैदिक पध्दतीनं माझा विवाह झाला. श्री. दहिवलकर गुरूजी ह्या नावाचे एक प्रसिध्द कोकणस्थ कार्यकर्ते मुंबईत चळवळीत काम करीत. रोकडेदादांनी त्यांना लग्न लावण्यासाठी पाचारण केले. बाबासाहेबांनी लग्नविधी मुद्दाम फार सुटसुटीत आणि सोपा केला होता. पुष्कळ लोकांना असे वाटे की ही लग्न पध्दती शोधून काढून अमलात आणण्याची गरज बाबासाहेबांना आणि त्यांच्या समाजाला का पडली. त्यावेळी ब्राह्मण म्हणजे पुरोहित आमची लग्न लावायला तयार नसत. मी माझ्या गावी पाहिले होते, हा ब्राह्मण चांभारवाड्यापर्यंत लग्न लावायला किंवा विधी करायला येई. पण त्याच्या पुढे त्याला जणूकाही लक्ष्मणरेषा पडे. तो महारवाड्यात येत नसे. मांगवाड्यात येत नसे आणि चांभारवाड्यात देखील लग्नमंडपाच्या बाहेर एक चौरंग मांडून त्याच्यावर तो उभा राही आणि तेथून मंगलाष्टके म्हणे. या पध्दतीमुळे बाबासाहेबांना लग्नविधी वेळोवेळी शोधून काढावे लागले.
महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजात टाळी वाजवून लग्न लावण्याची पध्दत सुरू केली. लग्नं कुणी लावावी? कुसुमाग्रजांच्या अलीकडच्या एका प्रसिध्द कवितेत 'प्रेम कोणावरही करावे' अशा ओळी आहेत. ह्या सत्यशोधकी लग्नविधीत 'लग्न कोणीही लावावे' पुरुषांनी लावावे, प्रौढांनी लावावे, मुलांनी लावावे, महिलेने लावावे. लग्न कोणीही लावावे इतका सोपा हा लग्नाचा प्रकार करून ठेवण्यात आला. आणि जर तुम्हाला मंगलाष्टक येत नसतील तर कविता म्हणा. ती पाठ नसेल तर सगळयांनी टाळी द्या. लग्न लागलं असं जाहीर करा. तेव्हा नुसत्या टाळीवर लग्नं लावू लागली. यामुळे अजुनही लग्नाला उशिरा पोहचणारे लोक विचारतात 'टाळी लागली का हो?' लग्न होऊन गेले असेल तर होय असे उत्तर मिळते. लग्न होऊन गेले नसेल तर नाही असे उत्तर मिळते. 'लग्न कोणीही लावावे!' पण आता पुन्हा ब्राह्मणाकाडे लग्नासाठी, इतर विधीसाठी लोक वळू लागले आहेत. महात्मा फुलेंनी आणि सत्यशोधक समाजाने ब्राह्मण विधीतून वजा केला होता. तो आता परत नटूनथटून आलेला आहे. सत्यनारायण घातले जाऊ लागले आहेत. आणि सत्यनारायणातली एखादी रीत राहून गेली किंवा चुकली तर बहुजन समाजातले शिकलेले, शहाणेसुरते असे लोक त्या विस्मरणाची आठवण पुरोहिताला देतात आणि पुन्हा साग्रसंगीत विधी होतो. समाज बुध्दिप्रामाण्यवादी झाला, अंधश्रध्दा सोडून दिल्या असे म्हणत यामध्ये आणि इतर विधीमध्ये त्याचा पुन्हा बडेजाव वाढू लागलेला दिसतो.
ह्या संस्कार आणि विधीच्या बावतीत खुद्द गाडगे महाराजांची एक आठवण सांगितली जाते. एका नदीवर एक अंतिम संस्कार चाललेला असतो. गाडगे महाराज तिथे योगायोगाने पोहोचले. आणि पाहतात तर पिंडदान चाललेलं आहे. महाराजांनी काय करावे? त्या नदीत उतरून ओंजळीमध्ये पाणी घेऊन ते कडेल फेकायला सुरुवात केली. लोकांचे लक्ष त्यांच्याकडे आकर्षित झाले. त्यामुळे पुरोहीत चिडला. त्याला राग आला. तो महाराजांवर धावून गेला. आणि विचारू लागला काय करतोस हे? 'काय नाही, माझ्या शेताला पानी घालतो !' अरे तू अमरावतीकडचा राहणारा, तुझं शेत अमरावतीला, आणि तू इथून पाणी फेकतो, शेताला जाऊन पोहचते काय ? आणि मग तू इथून जो पाणी देतो, पिंड देतो घास देतो. तो आमच्या बापजाद्याला पोहचतो काय? त्यांनी ब्राह्मणाचे तोंड बंद केले. समाजाचे तोंड काही काकायमचे बंद झाले नाही. आजही माझ्या समाजात कधी जलदानविधी किंवा पुण्यानुमोदन ह्या संस्काराला पोहचतो, तेव्हा अशा गोष्टी सांगून मी लोकजागृती करण्याचा प्रयत्न करतो.
तेव्हा बाबासाहेबांना वेळोवेळी हे विधी किंवा संस्कार शोधून काढून समाजात रूढ करावे लागले. आज बौध्दधर्म स्वीकारानंतर बौध्द संस्कार आपोआप बौध्द समाजाला मिळालेले आहेत. मी भारतीय बौध्द महासभेचा सरचिटणीस म्हणून १९६७ साली निवडला गेलो. आम्ही परमपावन दलाईलामा यांना त्यांच्या धर्मशाला ह्या ठिकाणावरून ह्या परिषदेसाठी मुद्दाम आणले आणि त्यांच्या साक्षीने एक 'संस्कार संहिता' 'संस्कार पाठ' ह्या परिषदेमध्ये मंजूर करून घेतले. सर्व देशभर एक प्रकारचे संस्कार व्हावेत, एक प्रकारचीच संस्कारपध्दती अंमलात यावी, ह्याच्यासाठी हा खटाटोप होता. बौद्ध चळवळीत बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर सामुदायिकरीत्या, संघटितरीत्या उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल धम्मचळवळीत ठरले. सुरवातीला तर बरेच विधी करण्यात मीच पुढाकार घेत असे. लग्न लावायला मीच पुढे होत असे. जलदानविधी करण्यातही मीच पुढाकार घेत असे. हेतु असा की हे विधी नीटनेटक्या स्वरूपांत, मंजूळ स्वरांत व्हावेत बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीत 'बौद्ध पूजापाठ' म्हणून ठरवून ठेवले होते. ते चांगल्या आनंददायी स्वरूपात आणि स्वरांत सादर केले जावेत म्हणून त्यांनी मास्तर कृष्णराव फुलंबीकर हे त्या वेळचे प्रसिद्ध संगिततज्ज्ञ आणि गायक ह्यांच्याकडून या पूजापाठांना चाली लावून रेकॉर्ड करून ठेवल्या.
पाच्यानंतर आमचा हा प्रयत्न महत्त्वाचा ठरतो. तेव्हा है बौध्द पूजा पाठ किंवा ही संस्कार संहिता या गोष्टी गरजेपोटी आलेल्या आहेत. माझा विवाह हा मुंबईत झाला कारण माझे : सासरे आणि माझ्या बहिणी व मेव्हणे हे मुंबईतच स्थायिक झाले होते. रोकडे दादा आणि काळे दादा बॉम्बे सेंट्रलला शिवलाल मोतीलाल मॅन्शन या प्रसिद्ध बिल्डिंगमध्ये राहत. आजही ती बिल्डिंग बॉम्बे सेंट्रल येथील मध्यवर्ती बस स्टॅण्डसमोर विराजमान आहे. माझे आई-वडील गावी राहत, शेती करीत. त्यांना मुद्दाम लग्नसोहळयासाठी मुंबईला आणण्यात आले. रोकडेदादा आणि माझा कटाक्ष की कमीतकमी खर्चात आणि अत्यंत साधेपणे हे लग्न व्हावे. हे सगळे अंगवळणी पडायला काळ जाणार होता. पण मी माझे लग्न मात्र ९२० रुपयांत केले. लग्नविधीसाठी सासऱ्याने स्भेज बांधला होता. दादासाहेब गायकवाडांचे धाकटे बंधू डी. के. गायकवाड हे लग्नविधी संपताच मला घेऊन बॉम्बे सेंट्रल स्टेशनकडे फिरायला गेले. आम्ही परत येऊन पाहतो तर लग्नाची जेवणं आटोपली आहेत आणि वरळीच्या ब्लाईंड स्कूलच्या प्रसिद्ध ऑर्केस्ट्राचा वाद्यवृंदाचा कार्यक्रम चालू आहे. नात्याने मामा असलेले, सातारा जिल्ह्यातील मिराजी मामा कांबळे यांनी तो वाद्यवृंद्ध आणला होता. ती आंधळ्यांची माळ, माझ्या गळयात लग्नसमारंभातच जणू पडली, ती अजूनही मला सोडत नाही. माझे दोन्हीही डोळे, माझ्या हात धुवून पाठीमागे लागलेले आहेत.
महाविद्यालयांत असताना 'वैजयंति माला' हे गोविंदाग्रजांचा - म्हणजे राम गणेश गडकरी यांचा कवितांचा पुस्तक-संग्रह आम्हाला अभ्यासाला होता. त्यांच्यातल्या कविता मी घरात बसून चालीवर टाळ्या वाजवून म्हणत असे. साऱ्या कुटुंबाला आनंद व्हायचा. पण माझ्या थोरल्या सासूबाई धोंडाबाई ज्या रोज जावयाची म्हणजे माझी दृष्ट काढण्यासाठी कामावरून सुटल्यावर, त्यावेळी दृष्ट काढण्याची एक पुडी विकत मिळत असे ती घेऊन त्या बॉम्बे सेंट्रलला आल्या. येऊन पाहतात तर काय ? जावई टाळ्या वाजवून कविता म्हणतायत. त्यांचा मी सन्मान करत असे. दृष्ट काढण्याचा त्यांचा विधी संपवू देत असे. तोपर्यंत गाणे बंद करत असे. पण ते त्यांच्या घरी जाऊन या प्रकाराचा बाऊ करत असत. ह्या जावयाची लक्षणं काही बरी नाहीत. एवढा मोठा शिकलेला, कॉलेजला जाणारा मुलगा, अजून टाळया-चिपळ्या वाजवतो. ती लक्षणं संन्याशाची लक्षणं आहेत, असा बोभाटा त्यांनी केला. मी त्या वेळी व्यायामशाळेत नियमितपणे जात असे. त्याचाही प्रचार झाला की आता लग्न झाल्यावर व्यायामशाळा कशाला? पण मी ह्या सगळया गोष्टींना, प्रचाराला, टीकेला बधलो नाही. छोटीशी सुशिला, तिच्या मनावर काय परिणाम होत असतील याची कल्पनाही मला नव्हती. त्या वैजयंतिमाला या काव्यसंग्रहात-गोविंदाग्रजांनी 'आंधळयांची चाले माळ, रानोमाळ', अशी एक छान कविता दिलेली आहे.
पुढे माझी थोरली भगिनी सुगंधाबाई ही तर सुगंधी गळयाचंच देणं घेऊन आली होती. तीही या कविता लक्षात ठेवून म्हणू लागली. त्या वेळी तिलाही मोतिबिंदूचा रोग जडलेला होता. माझ्या आईचे दोन्ही डोळे ऑपरेशनमुळे अधू झाले होते. भगिरथी रोकडे ही माझी मधली बहीण तिचे दोन्ही डोळे मोतिबिंदूने पछाडले होते आणि माझ्या दोन डोळयांची कथा तर एक दीर्घकथा झाली. अजूनही मला डोळयांवर उपचार करून घ्यावे लागतात. पण डोळयांच्या अधूपणाचा बाऊ करून मी घरी बसलो नाही. मिराजी मामा कांबळे यांनी अभवितपणे आणलेला अंधशाळेचा ऑर्केस्ट्रा वाद्यमेळ माझ्या लग्न सोहळयात आणला होता, ही गोष्ट किती अचूक ठरेल किंवा ठरली ह्याची त्यांना कल्पना नव्हती. हे वैदिक पद्धतीचे लग्न किंवा विवाह १०-२० मिनिटांत संपते. सामुदायिक जेवण होतं असे आणि कुणी करमणुकीचा कार्यक्रम लावलाच तर तो एक तासभर चाले, आणि लग्नसोहळा संपे. रोकडे दादांनी माझ्या लग्नाचा सोहळा असा फार साधेपणाचा केला होता. माझी पत्नी सुशिला हिला मी ज्या वेळी प्रथम पाहिले त्या वेळी ती जेमतेम १२ साडेबार वर्षांची असेन. लग्न झाले ११ मार्च १९४४ रोजी, त्या वेळी ती १३ वर्षांची होती. तिची जन्मतारीख २६ एप्रिल, १९३२, अशी आहे. मला आश्चर्यच वाटले. ते सामाजिक चळवळीतील एक प्रौढ कार्यकर्ते गोविंदराव पराड हे लहान मुलीचे लग्न करायला तयार झाले कसे? पण त्या वेळी मुलगी वयात आली. म्हणजे मोठी झाली की तिचे लग्न करून टाकले पाहिजे असा पक्का समज होता आणि त्यामुळे बिचारी सुशिला १२व्या १३व्या वर्षीच मांडवात साडी नेसून उभी राहिली. तिच्या वडिलांनी तिला खास पैठणी विकत घेतली होती. त्या पैठणीचं वजन सांभाळता-सांभाळता ती नऊवारी होती, तोपर्यंत सुशिला नऊवारी साडी नेसलेली नव्हती, तिचा जीव रडकुंडीला आला.
पुढे सुशिलाबाईंनी ही नऊवारी साडी-तिचे कापड करून मुलींना परकर-पोलकं करण्यात आल्याचं माझ्या लक्षात आहे.क्रांतीचा तर परकर पोलका चांगलाच गाजला होता आणि पुढे ही पैठणी काही फाटत नाही तेव्हा ती विकून टाकावी आणि जाळून जर विकली तर तिच्यात असलेला जर हा अस्सल असल्यामुळे भरपूर पैसे मिळतील, असा सल्ला मिळाला आणि त्याप्रमाणे ती पैठणी जाळून तिच्यातला जर काही जळाला नाही तो चांदीचा होता, तो नंतर विकण्यात आला. मी तर माझे लग्नाचे कपडे-एक कॉटनचा सूट आणि एक कॉटनचा शर्ट असा शिंप्याच्या शिलाईसह २५ रुपयांत बसवला. तो पुढे कित्येक वर्ष टिकला. तो मी कॉलेजमध्ये घालून जात असे. पुढे वसंतराव नाईकांचे भाषण मी एकदा ऐकलं. त्यांनी प्रेमविवाह केला होता. ते सांगायचे, माझे वडील समाजसुधारक असल्यामुळे त्यांनी माझे लग्न फार साध्या पद्धतीने केले. आमच्या लग्नाचा खर्च एकून १२० रुपये आला. पण त्यामुळे आम्हाला मुलं होण्याचं काही थांबलं नाही. मुलं झाली. चांगली निघाली. तेव्हा लग्नखर्चावर लग्नाचं यश अवलंबून नसतं, हा मुद्दा ते समजावून सांगत असत. आता मी बघतो की ग्रामीण भागामध्ये देखील लग्न कार्यावर मोठा खर्च करणं ह्याची जणू स्पर्धाच लागली अस
0 टिप्पण्या