मागील ४० वर्षापासून जिल्हापरिषद आरोग्य सेवेत राज्यातील १०३७३ महिला परिचर काम करीत आहेत. अर्धेवेळ ठरवून त्यांच्याकडून फक्त महिना तीन हजार रुपये पगार ठरवून संपूर्ण दिवसभर काम करून घेतल्या जात आहे. यामुळे या परिचरांना त्वरीत २१,००० रुपये पगार वाढ करावी या प्रमुख मागणीकरिता मुंबईतील आझाद मैदानात ठिय्या आंदोलन करीत आहेत. मात्र अधिवेशन सुरू असूनही या महिलांकडे सरकारने अद्याप लक्ष दिले नसल्याने संताप व्यक्त होत आहे. लाडक्या बहिणींच्या समस्या मात्र या भावाना दिसत नाहीत. आमच्या हक्काचे पैसे देण्यास नकार देण्यात येत आहे मात्र तुटपुंजी रक्कम घेऊन संसाराचा गाडा ओढायचा कसा असा सवाल आता या महिलांनी सरकारला केला आहे. यावर येत्या दोन दिवसात काही निर्णय न झाल्यास संभाजी सेना आपल्या मार्गाने या महिलांना न्याय मिळवून देईल असा इशारा रविकुमार सोडतकर यांनी दिली.
महिला परिचरांना किमान वेतन देणे, अंशकालिन नावात बदल करणे, या विषयावर चर्चा करण्यात आली व मा. आयुक्त यांनी मान्य केले होते. अर्धवेळ असुनही पुर्ण वेळ काम करतात असे त्यांना जिल्हा परिषदेकडून मागवलेल्या माहितीत सिध्द झाले. करिता प्रस्ताव तयार करुन शासनाकडे पाठविण्यात आले होते. तरी आचार सहितेमुळे आज पर्यंत आदेश निघाले नव्हते तरी आपण शासन, प्रशासनात कोणते ही दखल घेतली नाही. राज्यामध्ये महिलांना सन्मानाने जगता येत नाही. कारण, महिन्याला मिळणारे मानधन फक्त रु. ३०००/- (रु. तीन हजार) आणि दिवसभर काम कामाचे स्वरूप बघता नियनीत कर्मचारी कमी असल्यामुळे तर अंशकालिन महिला परिचार, कॅम्प (मास्त्रक्रिया कैम्प) असला तरी अंशकालिन महिला परिचर, PHC ची साफ सफाई टॉयलेट, बांधरुम, कपडे धुणे व्हॅक्सीन कैरीयर्स धुगे, परिसरातील कचरा काढणे, दिवसपाळी, रात्रपाळी करणे तसेच उपकेंद्रात सकाळी ८.३० वाजता कामावर रुजु झाल्यापासुन साफ सफाई करणे ANM बरोबर लसीकरण करणे ४ ते ५ वाजेपर्यंत, क्लिनिक ५ वाजेपर्यंत, नॉर्मल प्रसुती (डिलेव्हरी) करण्यस मदत करणे, प्रसुती (डिलेव्हरी) प्लासेन्टा त्ताफ करणे, कपडे धुणे, प्रसुती पश्चात (डिलेव्ही) टेबल साफ करणे, CHO बरोबर OPD काढणे एवढे काम करुन सुध्दा अर्धवेळ नावाने फक्त रु. ३०००/- (रु. तीन हजार) मानधन दिला जातो.म्हणूनच आता अंशकालिन नावात बदल करण्यात यावा या महिला परिचराची फसवनुक केली जात आहे. काम पुर्ण वेळ व नाव अर्धवेळे करिता नावात बदल न्यायोचित आहे. आकृतीबंधामध्ये अंशकालिन को परिचर असे मंजुर असलेल्या पदाचे नाव बहुउद्देशीय महिला परिचर असे बदलण्यात यावे, सदरहु बाब धोरणात्मक असल्याने शासन स्तरावरून याबाबत योग्य तो निर्णय अपेक्षित होता पण तसे कोणतेही पाऊल शासनाने / प्रशासनाने उचाले नाही. वेतनवाढ करावयाची नाही हे यावरून स्पस्ट होते ह्या/महिला परिचरांना, सफाई कामगार, परिचर अर्धवेळ स्त्री परिचर, शिपाई अशा पदांच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहेत. करिता ह्या महिला परिचरांना किमान वेतन देणे व अंशकालिन नावात बदल करणे तर्कसंगत आहे.
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुध्दा कामगारांना कमीतकमी पाचशे रुपये किमान वेतन देण्याची घोषना केलेली आहे. आम्हाला तो सुध्दा मिळत नाही. आम्ही फक्त आपणाकडे २१००० (एकविस हजार) रुपयांची वेतनवाढ मागत आहोत. आम्हाला ३०००. रुपयांत शासन दिवसभर काम करुन घेत आहे. ही शासकीय वेठबिगारीच आहे. पुढील दहा दिवसात निर्णय झाला नाहीतर आम्ही मानव अधिकाराकडे दाद मागू व कोर्टातही जाऊ. कारण आता अन्याय खूप झाला आहे. तसेच या निवेदनाद्वारे आपण दहा दिवसात निर्णय न घेतल्यास आम्ही तिव्र आंदोलन करु, असा इशारा संभाजी सेना जिल्हा परिषद महिला आघाडीच्या वतीने देण्यात आला. यावेळी कल्पना आसाराम महाडिक, रेखा गोविंद पाटील, लता शाम कोरले यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.
१) महिला परिचराना किमान वेतन २१००० (एकविस हजार) देण्यात यावे. २) महिला परिचराना नियमित सेवेत कायन स्वरुपी करावे.३) महिला परिचराना पेशन योजना व अपघाती विमा योजना लागू करावी.४) दरवर्षी गणवेष व भाऊबिज (दिवाळी बोनस) देण्यात यावे ५) कार्यक्षेत्रात प्रवास भत्ता देण्यात यावा. इत्यादी मागण्यांचे निवेदन शासनाला देण्यात आले आहे.
0 टिप्पण्या