जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिका, नेचर फॉरएव्हर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन इमारत सभागृहामध्ये गुरुवार, दिनांक २० मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ‘इंडियन स्पॅरोमॅन’म्हणून ओळख असलेले तथा नेचर फॉरएव्हर सोसायटीचे अध्यक्ष श्री. मोहम्मद दिलावर हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.चिमणी हा जीवसृष्टीतील महत्त्वाचा घटक आहे. परंतु वाढत्या नागरीकरणामुळे शहरांमध्ये कमी काढळणाऱ्या चिमणीसाठी, तिच्या संवर्धनासाठी काय करता येईल या विषयावर आधारित एक दिवसीय कार्यशाळेचे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून आयोजन करण्यात आले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उपायुक्त (उद्याने) श्रीमती चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडणार आहे. जैवविविधता जतन व संवर्धन करणे, नागरिक व विविध संस्था यामध्ये याबाबतीत जागरूकता निर्माण करणे असे या कार्यशाळेचे उद्दिष्ट असल्याचे संचालक (प्राणिसंग्रहालय) डॉ. संजय त्रिपाठी, उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.
वाढत्या नागरीकरणात चिमण्यांची संख्या का कमी होते आहे, आपल्या अंगणातून हरवलेली चिमणी पुन्हा अंगणात कशी आणता येईल, तिच्या संख्येत वाढ होण्यासाठी काय करता येईल, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे श्री. मोहम्मद दिलावर या कार्यशाळेत देणार आहेत. या कार्यशाळेत विविध स्वयंसेवी संस्था, ‘पेटा’, ‘नरेडेको’ यांचे प्रतिनिधी, उद्यानातील अधिकारी भाग घेणार आहेस
0 टिप्पण्या