2019 मध्ये लागू झालेल्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक राज्यातील विद्यार्थ्यांना 3 भाषा शिकवणे गरजेचे आहे. हिंदी भाषिक नसलेल्या राज्यांमध्ये दुसरी भाषा म्हणून हिंदी शिकवली जाऊ शकते. तामिळनाडूमध्ये नेहमीच दोन भाषांचे थोरण राहिले आहे. येथील शाळांमध्ये तमिळ आणि इंग्रजी भाषा शिकवल्या जातात. परंतु आता तामिळनाडू सरकारने हिंदी भाषा लादण्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री यांनी आपल्या राज्यात नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)लागू करण्यास केंद्र सरकारला सपशेल नकार दिला आहे.नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्यात लागू केल्यास आम्ही आपल्याला दोन हजार कोटी रूपये सहाय्यता राशी आम्ही आपणास देवू अशी पेशकश केंद सरकारकडून मुख्यमंत्री स्टँलिन यांचेकडे करण्यात आली आहे. परंतु त्याला धुडकावत तुम्ही आम्हाला दहा कोटी जरी दिले तरी आम्ही हे शैक्षणिक धोरण आमच्या राज्यात लागू करणार नाही असे स्टॅलिन यांनी स्पष्ट सांगितले आहे. एनईपीवरून तामिळनाडूचे केंद्र सरकारशी मतभेद आहेत, सत्ताधारी द्रमुकने केंद्रीय शिक्षण मंत्रालयावर महत्त्वाच्या शैक्षणिक कार्यक्रमांसाठी महत्त्वाचा निधी रोखल्याचा आरोप केला आहे. उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी पुन्हा सांगितले की राज्य त्यांच्या दीर्घकालीन द्विभाषिक धोरणाचे पालन करत राहील, त्यांच्या शिक्षण व्यवस्थेत फक्त तमिळ आणि इंग्रजी भाषेला प्रोत्साहन देईल.
केंद्र सरकारने तयार केलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे राज्याला दोन हजार वर्षे मागे घेऊन जाणारे आहे. तसेच या नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थी आणि सामाजिक न्यायाच्या धोरणावर प्रतिकूल प्रभाव पाडणारे आहे. नवीन शैक्षणिक धोरणात असे काही प्रावधान आहेत की त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयापासून बाहेर ठेवणारे आहे अशी टिकाही मुख्यमंत्री स्टँलिन यांनी केली आहे. तसेच या शैक्षणिक धोरणामुळे आर्थिक परिस्थिती कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या आर्थिक सवलतीवर प्रतिकूल परीणाम करणाऱ्या आहेत असे स्टँलिन यांनी म्हटले आहे. राज्याची ओळख किंवा तमिळ भाषेचे महत्त्व कमी करणारे कोणतेही पाऊल त्यांचे प्रशासन सहन करणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. भाषेच्या निधीतील असमानता अधोरेखित करताना मुख्यमंत्र्यांनी असे निदर्शनास आणून दिले की, सुमारे ८ कोटी लोक तामिळ भाषा बोलत असूनही, केंद्र सरकारने तिच्या विकासासाठी फक्त ७४ कोटी रुपये वाटप केले आहेत. याउलट, केवळ काही हजार लोक बोलल्या जाणाऱ्या संस्कृत भाषेला १,४८८ कोटी रुपयांची लक्षणीयरीत्या जास्त तरतूद मिळाली.
"तमिळ भाषा ही सांस्कृतिक ओळख आहे. यासाठी लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. खेळ करण्याचा प्रयत्न करू नका. भाषेचा मुद्दा हलक्यात घेऊ नका. तामिळनाडूच्या मुलांनाही त्यांना कोणती भाषा हवी आहे हे कळते. त्यांची स्वतःची समज आहे," - अभिनेता कमल हसन
मुख्यमंत्री स्टँलिन यांनी घेतलेली भूमिका अभिनंदास पात्र आहे. ज्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाचा अभ्यास केला आहे ते निश्चितच तामिळनाडू मुख्यमंत्र्यांना धन्यवादच देणार आहेत. स्पष्ट आणि परखड भूमिका घेणारे मुख्यमंत्री स्टँलिन यांना संघी निश्चितच व्हिलन ठरवणार आहेत. देशातील विद्यार्थींना उच्च दर्जाचे क्वॉलिटी शिक्षण मोफत मिळाले पाहिजे असे धोरण न ठरवता कुंभमेळ्यात करोडो नागासाधू निर्माण करणारे असे केंद्र सरकारचे शैक्षणिक धोरण आहे. त्यामुळे स्टँलिन यांनी घेतलेली विरोधी भूमिका सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अत्यंत योग्य आहे. शाब्बास मुख्यमंत्री MKस्टॅलिन जी.- सुरेश रा.शिरसाट, अकोला (एम ए, बी एड)
0 टिप्पण्या