गेल्या वर्षीपासून कीर्तीकरांनी "सेल्फीलेस सेल्फी ड्राईव्ह" या उपक्रमाच्या माध्यमातून एक अनोखी डोनेशन ड्राईव्ह सुरू केली होती. ह्या ड्राईव्हमध्ये स्वयंसेवकांनी देणगी स्वरूपात सॅनिटरी नॅपकिन्स ची मागणी केली. ह्या उपक्रमातून जमा होणारे सॅनिटरी नॅपकिन्स अंडर-प्रिव्हलेज म्हणजेच अशा स्त्रियांना देण्यात येणार होते ज्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत , तसेच ज्या आजही मासिक पाळीत कपडा वापरतात. मासिक पाळीत जर स्त्रिया स्वच्छता बाळगत नसतील आणि कपडा वापरत असतील तर त्यांना विविध आजार तसेच इन्फेक्शन्स होऊ शकतात. आणि याबद्दल जनजागृती पसरवण्यासाठी फक्त त्यांना समजून नाही तर त्यांना सॅनिटरी नॅपकिन्स वाटून त्याबद्दल जागरूक करण गरजेच आहे . आणि ह्यासाठीच कीर्ती महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाने दिनांक 28 आणि 29 जानेवारीला महाविद्यालयाच्या प्रांगणात सेल्फलेस सेल्फी ड्राईव्ह या अंतर्गत सॅनिटरी नॅपकिन साठी डोनेशन ड्राईव्ह आयोजित केली या सेल्फलेस सेल्फी ड्राईव्हला विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आपापल्या परीने विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी सॅनिटरी नॅपकिन्स तसेच पैशाच्या स्वरूपात देणगी देत या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात सहकार्य केले.
या दोन दिवसात कीर्ती महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेने २८३ सॅनिटरी नॅपकिन्स तसेच तब्बल २५०८५ रुपये इतकी रक्कम गोळा केली आणि त्या संपूर्ण २५०८५ रुपयांचे एकूण ५८८० सॅनिटरी नॅपकिन्स विकत घेतले. ह्यात सर्वप्रथम स्वयंसेवकांनी शिवणसई, पनवेल येथील आदिवासी पाड्यातील तसेच ग्रामीण भागातील महिलांना दिनांक ९ फेब्रुवारी रोजी सॅनिटरी नॅपकिन्स चे वाटप करून मासिक पाळीच्या वेळी स्वच्छता बाळगणं किती महत्त्वाचं आहे आणि कपडा वापरण त्याच्या वैयक्तिक आरोग्यासाठी धोकादायक आहे याबद्दल माहिती देऊन जनजागृती पसरवली सोबतच मागील दोन दिवसात स्वयंसेवकांनी दादर व त्या आजूबाजूच्या परिसरात महिलांना सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप केले. ह्या उपक्रमातून ४०० हून अधिक महिलांना सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात आले असून या संपूर्ण उपक्रमाचा उद्देश मासिक पाळी बद्दलचे समज-गैरसमज दूर करणे तसेच मासिक पाळीत घेतली जाणारी निष्काळजी दूर करण्याचा प्रयत्न कीर्ती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी केला . महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. मीनल म्हापुस्कर यांनीही ह्या विषयीची गंभीरता लक्षात घेता ह्या उपक्रमास मोलाचे सहकार्य केले तसेच एन.एस.एस चे कार्यक्रम अधिकारी प्रा. अंकुश दळवी आणि प्रा. पूजा कांबळे यांनी मार्गदर्शन करून स्वयंसेवकांचा उत्साह वाढवला.ओमकार वाक्कर ...एफ वाय बी ए:
या संपूर्ण माय मराठी कलासंगम ह्या कार्यक्रमातून दिसणारी महाराष्ट्राची उज्वल परंपरा ही भारताची वेगळी प्रतिभा मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र टाइम्स ने केला असून सर्वांकित, सर्वंकष आणि समर्पक व्यवस्थापन आणि समर्पक सादरीकरण म्हणजे माय मराठी कलासंगम .,,,,डॉ. सुनील कांबळे
0 टिप्पण्या