प्रज्ञा प्रतिष्ठान व प्रणाली सेवाभावी महिला असोसिएशन ह्यांच्या माध्यमातून बहुजनप्रतिपालक , कुळवाडी भूषण, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती खांबदेव नगर धारावी येथील प्रज्ञा प्रतिष्ठान संस्थेच्या कार्यालय जवळ अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. उपरोक्त्त कार्यक्रमास धगधगती मुंबई या दैनिकाचे संपादक भीमराव धुळप ह्यांच्या हस्ते *छत्रपती शिवाजी महाराज* ह्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण गौतमी जाधव ह्यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करण्यात आले. अपर्णा कासारे ह्यांच्या सुमुदर वाणीने *छत्रपती शिवाजी महाराज* ह्यांच्या घोषनेने सर्व परिसर दुमदूमला. सदर कार्यक्रमास प्रणाली सेवाभावी महिला व प्रज्ञा प्रतिष्ठान चे सर्व पदाधीकारी, संजीवन जैस्वार, लक्ष्मी कावळे, सौ. जोगळे, सुनीता फळसंकर, सौ. कोळी, अलिशा कासारे, गीता जाधव, सुनील कावळे वैभव जाधव आदी मान्यवर सभासद महिला वर्ग उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष अनिल शिवराम कासारे ह्यांनी केले
0 टिप्पण्या