मी कणभर कर्तव्य करण्याचा प्रयत्न केला आहे? तुम्ही बाबांचे अनुयायी या नात्याने काही करणार आहात की नाही ?
परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरिल संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस केल्याच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनामुळे पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये सोमनाथ सूर्यवंशी ह्याचा पोलिस कोठडीत मारहाणीमुळे झालेला मृत्यू आणि जेष्ठ नेते विजय वाकोडे ह्यांना पोलिस अत्याचार सहन न झाल्यामुळे आलेला तीव्र हृदय विकाराचा झटका आणि त्यांत त्यांचा झालेला अंत, ह्या अमानवी घटनांविषयी न्याय मिळावा म्हणुन परभणीतील बहादूर भीम सैनिक आणि लढवय्या माता, भगिनी दिनांक 17/01/2025 पासून परभणी ते मंत्रालय असा लाँग मार्च काढून कूच करीत आहेत. ह्या पायपीटी मुळे कितीतरी भीम अनुयायी आजारी पडत आहेत. त्यांच्या पायांना जखमा होऊन रक्त भळभळत आहे. त्यांचे शरीर थकले आहे. परंतु त्यांची बाबांप्रति असलेल्या अनन्यसाधारण निष्ठेमुळे,
उन्हातान्हाची पर्वा न करता ते मंत्रालयाच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहेत. त्यांच्या भळभळत्या जखमांवर उपचार व्हावा म्हणुन मी, माझी मुलगी डॉ. सुप्रिया निकम, पुतण्या विशाल निकम ह्यांच्यासह दिनांक 04/02/2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक जिल्ह्यातील विंचूर या गावी औषधाचे वाटप करून आमचा खारीचा वाटा उचलला आहे. तुम्ही कधी करणार आहात ?
. अरुण निकम.
06/02/2025.
0 टिप्पण्या