Top Post Ad

पुण्यातील आंबेडकरी चळवळीतील पक्ष-संघटनांच्या ऐक्याचा विजय

 पुण्यातील आंबेडकरी चळवळीतील पक्ष-संघटनांनी व जनतेने एकोप्याने लढलेला लढा यशस्वी नियोजित आरक्षित २ एकर जागेत आता उभारणार " संविधान भवन "

"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन" शेजारील व ससून हॉस्पिटल पुणे, समोरील जवळपास २ एकर जागा विस्तारित स्मारकासाठी शासनाने द्यावी याकरिता २५ वर्षांपासूनची आंबेडकरी अनुयायांनीची मागणी होती.. परंतु शासनाने मागील काही दिवसापुर्वी ही जागा कवडीमोल दराने खाजगी बिल्डरला दिली आहे व यात खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे, तो ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित स्मारकासाठीच्या जागेवर.. ही बाब जेंव्हा पुणे शहरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्तेंच्या निदर्शनास आली व त्यांनी ही घटना आंबेडकरी जनतेच्या समोर ठेवली गेली. याबाबत आंबेडकरी अनुयायांमध्ये प्रचंड असंतोष पसरला. यातुन शुक्रवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी माता रमाईच्या जयंती दिवशी आंदोलन कलेक्टर कचेरी समोर भव्य धरणे घोषित करण्यात आले. हे आंदोलन प्रचंड व्हायरल झाले पुणे शहरातील आंबेडकरी जनता या आंदोलनात स्वंयस्फूर्तीने सहभागी झाली. हे आंदोलन जनतेने हातात घेतले आपणहुन शहरात बैठकांचे सत्र सुरू झाले, याचा परिणाम असा झाला,आंबेडकर चळवळीतील सर्व पक्ष संघटना व त्यांचे नेते,आप आपसातील राजकीय मतभेद, व्यक्तिगत मतभेद, बाजूला ठेवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी एकत्र आल्या.
प्रत्येकजण आपआपले योगदान देण्यासाठी पुढे सरसावले कोणी आर्थिक योगदान देण्यासाठी, कोणी प्रशासनातील त्याच्या अनुभवाचा फायदा करून देण्यासाठी, पोलीस खात्यातील कार्यपद्धतीचा फायदा करून देण्यासाठी, कोणी प्रसार माध्यमातील त्यांचे स्किल वापरताना दिसला आणि आजचे भव्यदिव्य धरणे आंदोलन यशस्वी झाले. पोलीस प्रशासनाने त्यांचं काम केलं, शासनाने आंदोलनाची गंभीर दखल घेत आज माननीय कलेक्टर यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाची चर्चा करून ही सव्वा दोन दोन एकर जागा संविधान भवनासाठी/आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी देण्याचे मान्य केले.ही बाब शिष्टमंडळाने आजच्या सभेचे अध्यक्ष वसंतदादा साळवे यांना सांगितली व अध्यक्षांनी आंदोलकांना सांगितले, तेव्हा एकच जल्लोष झाला.पुढे जावुन अध्यक्षांनी सांगितले जिल्हाधिकारी यांनी आश्वासन दिले असले गाफील राहून चालणार नाही. याचा नक्कीच पाठपुरावा केला जाईल. केवळ आश्वासनावर बोलवण करून प्रशासन आंबेडकरी आंदोलनच नव्हे तर एकंदरीत सर्व आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. हे प्रकार सध्या अधिक वाढले आहेत. तेव्हा याबाबत पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे मत अनेकांनी यावेळी व्यक्त केले. राजकारणात जरी आंबेडकरी अनुयायी एकत्र येत नसले तरी सामाजिक आंदोलनात जरी एकत्र आले तरी बरेच प्रश्न मार्गी लागू शकतात असं यात आजच्या धरणे आंदोलनाने समोर आले. या धरणे आंदोलनकरिता पुणे शहरातील आंबेडकरी चळवळीतील पक्ष-संघटना, जयंती मंडळे, बुद्ध विहार समित्या यांच्याशी समन्वय करण्याचे काम नागेश भोसले व शैलेश चव्हाण यांनी मोठ्या परिश्रमाने केले. त्यांचे योगदान नाकारुन चालणार नाही. "लड़ेंगे और जीतेंगे " या आंदोलनाचे घोषवाक्य सत्यात उतरवले.
राहुल नागटिळक, पुणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com